Wednesday, 31 August 2022

व्हाईस ऑफ मीडियाच्या लोणार तालुकाध्यक्षपदी उमेश कुटे यांची नियूक्ती


व्हाईस ऑफ मीडियाच्या लोणार  तालुकाध्यक्षपदी  उमेश कुटे यांची नियूक्ती 

लोणार - ( प्रणव वराडे )

लोणार-तमाम पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून देशातील १७ राज्यांमध्ये कार्यरत असलेली संघटना म्हणून 'व्हाईस ऑफ मीडिया' या संघटनेची ओळख आहे.संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शणाखाली विदर्भ अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी बुलढाणा जिल्हा कार्यकारिनीला दिलेल्या निर्देशानूसार जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे,कार्यध्यक्ष अरुण जैन,सिद्धेश्वर पवार यांनी बुलढाणा जिल्हातील तालूक्याचे तालूका अध्यक्ष जाहीर केले .त्यामध्ये व्हाईस आँफ  मीडीयाचे  लोणार तालूका अध्यक्ष म्हणून दैनिक देशोन्नतीचे विशेष प्रतिनिधी उमेश कुटे यांची नियूक्ती पञ देऊन नियूक्ती केली आहे.सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. महाराष्ट्रातही पत्रकार आणि पत्रकारीतेच्या सर्वांगिण विकासासाठी ही संघटना अग्रेसर असून या संघटनेच्या जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांची निवड नुकतीच जाहीर झाली आहे 'व्हाईस ऑफ मीडिया' ही ५० ज्येष्ठ संपादकांनी एकत्र येऊन पत्रकारीता आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी निर्माण केलेली संघटना आहे. देशातील १७ राज्यांमध्ये ही संघटना कार्यरत आहे.व्हाईस आँफ मीडीया या पञकार संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष ,विदर्भ अध्यक्ष अनिल म्हस्के व जिल्हा कार्यकारिनीने माझ्यावर विश्वास दाखवून माझी तालूका अध्यक्षपदी नियूक्ती केली भविष्यात पञकारांना विश्वासात घेऊन त्यांच्या न्यायहक्कासाठी लढा देऊ. व नवीन तालूका कार्यकारणी लवकरच घोषीत करु.

 

Friday, 26 August 2022

तांबोळा येथील शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या.

 

तांबोळा येथील शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या.

लोणार तालुक्यातील तांबोळा येथील रहिवासी उत्तम धोंडू चव्हाण शेतकऱ्यांनी सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्रशांन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस झाली आहे.यबाबत सविस्तर असे की उत्तम धोंडू चव्हाण हे तांबोळा येथील अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे अंदाजे पाच एकर कोरडवाहू शेती असुन शेती ही पावसाच्या भरोशावर असून पावसाच्या लहरीपणामुळे पुन्हा एका शेतकन्याला आत्महत्या करून आपली जिवन यात्रा संपवली. 20 ऑगस्ट २०२२ रोजी उत्तम चव्हाण शेतकरी यांनी विष प्राशन केल्याचे उघडकीस आले तात्काळ ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बुलढाणा रुग्णालयात हलविण्यात आले येथून अकोला येथे सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचार दरम्यान 23 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे चार वाजेच्च सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व चार मुली असा आप्त परिवार आहे. उत्तम चव्हाण यांच्या मृत्युनंतर गावात व परिसरातः हळहळ व्यक्त केली जात आहे.

Friday, 12 August 2022

हिरडव येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शेख जावेद तर उपाध्यक्षपदी रुबीना आनिस शेख यांची निवड...



हिरडव येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शेख जावेद तर उपाध्यक्षपदी रुबीना आनिस शेख यांची निवड...


लोणार

लोणार तालुक्यातील हिरडव येथे 10 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती गठन उद्देशाने पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता,या मेळाव्यात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सदस्य यांची निवड करण्यात आली.शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक आघाडी तालुका अध्यक्ष शेख जावेद यांची अध्यक्षपदी तर रुबीना आनिस शेख यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. सोबतच सर्व समितीचे गठन करण्यात आले त्यामध्ये समाधान तेजराव बाजड,नंदा महादेव कळंबे,पूजा परसराम पुरी,प्रताप लक्ष्मण मुंडे, शेषराव नामदेव घायाळ, कल्पना भागवत पोफळे, सुवर्णा संतोष तुरूकमाने, याप्रमाणे समिती तयार करण्यात आली.या निवडीनंतर शेख जावेद यांचा भारतीय जनता पार्टीच्या टीमकडून त्यांचा सत्कार करून पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा महिला प्रदेश कार्यकारी सदस्य मंदाकिनीताई कंकाळ,आध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष सिताराम महाराज ठोकळ,जिल्हा नेते विजय मापारी,तालुका अध्यक्ष भगवानराव सानप,शहराध्यक्ष गजानन मापारी,किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मारोतराव सुरुशे,जिल्हा सचिव भाजयुमो उद्धव आटोळे,प्रकाश नागरे,बाबाराव गीते, प्रकाश महाराज मुंडे,संजय दहातोंडे,गणेश तांगडे, उमाकांत मिसाळ,शंकर गायकवाड,कृष्णा राठोड व इतर कार्यकर्ते पदाधिकारी हजर होते

 

कै. कू.दुर्गा क.बनमेरू विज्ञान महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ 2022सोहळा संपन्न

 



कै. कू.दुर्गा क.बनमेरू विज्ञान महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ 2022सोहळा संपन्न 

लोणार - प्रणव वराडे 

स्थानिक, लोणार येथील बनमेरू महाविद्यालयात तिसरे पदवी दान समारंभ सोहळ्याचे आयोजन, दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश बंनमेरू सर हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गणेशजी परिहार सर, प्राचार्य एम. इ. एस. कला व वाणिज्य महाविद्यालय मेहकर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात ही विद्यापीठ गीताने करण्यात आली या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. कमलाकर वाव्हल सरांनी भारतामधील शिक्षण प्रणालीची निर्मिती कशाप्रकारे करण्यात आली व उच्च शिक्षणाचे महत्त्व देशासाठी किती महत्त्वाचे आहे असे विद्यार्थ्यांना सांगून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या प्राचार्य डॉ. गणेशजी परिहार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःपुरता न ठेवता समाजासाठी त्याचा उपयोग होईल याची काळजी सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावी तसेच ज्या गोष्टी आपण अनुभवातून शिकतो त्या गोष्टींना आपण कधीच विसरत नाही असे विद्यार्थ्यांना आई व बाळाचे उदाहरण देऊन पटवून सांगितले. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दाशेतच आपल्या जास्तीत जास्त पदवी ग्रहण करून समाजामध्ये आपले नाव लौकिक करावे व पुढील भविष्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात महाविद्यालयातील  26 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच हर घर तिरंगा या योजनेअंतर्गत महाविद्यालयातर्फे प्रत्येक विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना तिरंग्याचे वाटप करण्यात आले. महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनी कु. अभिश्री मोरे या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगता मधुन  महाविद्यालयातील जुन्या आठवणी, शिकवण्याची पद्धत व सर्वांचे सहकार्य कसे लाभले असे तिने सर्वांना सांगितले.  हनुमान ताठे या विद्यार्थ्याने आपल्या मनोगतुन महाविद्यालयातून होणाऱ्या स्वतःच्या जडण घडणी बद्दल कसे सर्वांनी मार्गदर्शन केले याबद्दल आपले विचार सर्वांना सांगितले. कु. सिद्धि बनमेरू या विद्यार्थिनींनी महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्याला कसे सांभाळून घेतले व तसेच मा. डॉक्टर प्रकाश बनमेरू सरांनी हे महाविद्यालय उघडून विद्यार्थिनी साठी एक सामाजिक कार्य केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू सरांनी मान्यवरांचे आभार व्यक्त करत विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील पदवी घेतल्यानंतर एक चांगले नावलौकिक कमावे व देशाच्या पायाभरणीत हातभार लावावा तसेच आपल्या महाविद्यालयाचे नाव उच्च पातळीवर न्यावे अशी अपेक्षा त्यांनी विद्यार्थ्याकडून व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कमलाकर वाहल सरांनी केले तर प्रा. सौरभ गायकवाड सर यांनी आभार व्यक्त केले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले.

Wednesday, 10 August 2022

16,ऑगस्ट ला स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर लोणार तालुक्याच्या दौऱ्यावर


 16,ऑगस्ट ला स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर  लोणार तालुक्याच्या दौऱ्यावर

लोणार - प्रणव वराडे 

महाराष्ट्रातील  शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून संबोधल्या जाणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी राज्यमंत्री रविकांत भाऊ तुपकर व जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर टाले हे 16, ऑगस्ट रोजी लोणार तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी दीली आहे,

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर वेगवेगळे आंदोलन करून सरकारला गुडघे टेकण्यास भाग पाडणार्या  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांचे विश्वासू, स्वाभिमानी संघटनेचे नंबर दोन चे फायर ब्रँड नेते म्हणून महाराष्ट्रभर ज्यांच्या नावाची एक वेगळी ओळख आहे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री रविकांत भाऊ तुपकर हे 16 ऑगस्ट रोजी लोणार तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहे तालुक्यामधील,विवीध गावांमध्ये शाखा ऊद्घाटनाचे कार्यक्रम व किनगाव जट्टू येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी दीली

Tuesday, 9 August 2022

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत सामूहिक राष्ट्रगीत तथा हर घर तिरंगा अभियान



आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत सामूहिक राष्ट्रगीत तथा हर घर तिरंगा अभियान

लोणार - प्रणव वराडे

लोणार येथील मेहकर रोड वरील एल सी सी ग्राउंड येथे सामुदायिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम आज ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता  पार पडला आहे.आझादि चां अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन लोणार तहसील  कार्यालय चे तहसीलदार सैफण नदाफ आणि नगर परिषद लोणार च्या वतीने करण्यात आले होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शहरातील विविध शाळांनी सहभाग नोंदवित राष्ट्रगीत सामुदायिक गाऊन सहभाग नोंदविला.  सामुदायिक राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमाला लोणार तहसील चे तहसीलदार सैफन नदाफ,लोणार पोलिस स्टेशन चे ठाणेदार प्रदीप ठाकूर,लोणार नगर परिषद अध्यक्ष सौ.पुनम पाटोळे ,प्रकाश भाऊ मापारी, शंतनु मापारी,प्रा बळीराम मापारी तथा लोणार शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता.शाळेतील विद्यार्थी मित्रांनी हातात तिरंगा घेऊन आज सकाळी ११ वाजता उपक्रमात उत्साहाने सामिल झाले.  'आजादी का अमृत महोत्सव' अभियानांतर्गत दि. ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधी दरम्यान स्वराज्य महोत्सवाच्या पूर्व तयारीसाठी 'हर घर तिरंगा' या  देशपातळीवर,सुरू असलेल्या अमृत महोत्सवाचे महत्व दि.१३ ते १५ या कालावधीत वाढवून यात जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक, स्त्रिया, विद्यार्थी,कसे सहभाग घेतील याबाबत तहसीलदार सैफण नदाफ यांनी आव्हाहन केले

Thursday, 7 April 2022

लोणार तालुक्यात भाजपच्या किरीट सोमय्या विरोधात शिवसेनेची घोषणाबाजी




लोणार तालुक्यात भाजपच्या किरीट सोमय्या विरोधात शिवसेनेची घोषणाबाजी 


लोणार शहरात आज शिवसेनेच्या वतीने भाजपचे किरीट सोमय्या यांच्या विक्रांत घोटाळा प्रकरणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली# येथील विनायक चौकात आज दुपारी हा कार्यक्रम झाला. विक्रांत घोटाळा चौकशी झालीच पाहिजे, किरीट सोमय्या हाय हाय,शिवसेना झिंदाबाद आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.शिवसेना खासदार प्रतापराव जाधव व शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली  या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी,जि.प.सदस्य भगवान कोकाटे,कु.उ.बा.समितीचे माजी सभापती सुनिल पाटील सुलताने शिवसेना उपतालुखा प्रमुख भगवान पाटील सुलताने, संतोष आघाव, शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग सरकटे, नगरसेवक डॉ.अनिल माघारी, युवासेना तालुका अध्यक्ष गजानन मापारी, गणेश सोसायटी अध्यक्ष गजेंद्र मापारी, नगरसेवक छगन कंकाळ,धरमचंद लुनिया, प्रमोद मापारी,बाबुसिंग जाधव विभाग प्रमुख विठ्ठल घायाळ, अशोक वारे राहुल मापारी, पुरुषोत्तम केंद्रे, सुनील मापारी सह शिवसैनिक हजर होते.यानंतर किरीट सोमय्या यांच्या वर फौजदारी गुन्हे दाखल करुन तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी तहसीलदार  प्रभारी पदी असलेल्या गायकवाड मॅडम यांना निवेदन देण्यात आले
 

Thursday, 24 March 2022

बनमेरू विज्ञान महाविद्यालय, लोणार राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे दत्तकग्राम पिंपळनेर उघाटन.

 



बनमेरू विज्ञान महाविद्यालय, लोणार राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे दत्तकग्राम पिंपळनेर उघाटन.

लोणार - ( प्रणव वराडे )

कै.कु. दुर्गा क.बनमेरू विज्ञान महाविद्यालय लोणार राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरा ची सुरवात दिनांक 22 मार्च 2022 रोजी दत्तक ग्राम पिंपळनेर झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू, उद्घाटक तसेच प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा डॉ. विष्णू पडवाल सर, व श्री संजय सानप सरपंच ग्रामपंचायत पिंपळनेर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यापीठ गीताने व महामानवांच्या प्रतिमा पूजनाने झाली त्यानंतर प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या नंतर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.सूर्यकांत बोरूळ यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये विशेष श्रम शिबिराचे महत्व, उद्देश व शिबिराची रूपरेषा स्पष्ट केला. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. विष्णू पडवाल यांनी विद्यार्थ्यांसाठी श्रम शिबीर ही आयुष्य जगण्याची एक नवीन पर्वणी आहे असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट केले तसेच शिबिराच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ.प्रकाश बनमेरू यांनी विद्यार्थ्यांनी या शिबिरांमधून आयुष्य जगण्याची कला अवगत करावी असे सांगितले.दिनांक 22 मार्च जागतिक जलदिनानिमित्त शिबिरामध्ये "जल है तो कल है" यावर आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पिंपळनेर नगरीचे सरपंच मा. संजय सानप, तसेच गावातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवशंकर मोरे सहकार्यक्रमाधिकारी रासेयो यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. कमलाकर वाव्हाल यांनी केले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 7 March 2022

काँग्रेस पक्षाच्याऑनलाइन सदस्य नोंदणी लोणार येथे जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरवात

   


काँग्रेस पक्षाच्याऑनलाइन सदस्य नोंदणी लोणार येथे जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरवात


लोणार - प्रणव वराडे 

आज लोणार येथे काँग्रेस पक्षाच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियाना संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे लोणार शहरात सदस्य नोंदणीसाठी व लोणार नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत फंड उपलब्ध करून दिल्याबद्दल पत्रकार परिषद घेणात आली असून या बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा नगरसेवक संतोष मापारी, जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष राजेश मापारी,यांच्या उपस्थित ही बैठक माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या अध्यक्षतेत ही बैठक संपन्न  झाली.असून यावेळी काँग्रेस नेते लक्ष्मण घुमरे काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजेश मापारी, नगराध्यक्ष सौ पुनम ताई पाटोळे, नगर उपाध्यक्ष बादशहा खान,नगरसेवक आबेद खान,नगरसेवक गुलाब सरदार,नगरसेवक संतोष मापारी,नगरसेवक शेख रऊफ,उपसरपंच सतीश राठोड, नगरसेवक तोफिक कुरेशी,नगरसेवक प्रा.गजानन खरात,नगरसेवक रमजान,काँग्रेस नेते शांतीलालजी गुगलिया, अंबादास,भारत राठोड,शेख जुनेद,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
 यावेळी लोणार तालुका व शहरातली क्षेत्रातील सुरू असलेल्या सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा अध्यक्ष यांनी घेतला.आढावा घेत असताना काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष राजेश मापारी यांनी केलेल्या व बुध प्रमुखांना दिलेल्या सूचनेचे अहवाल अध्यक्ष समोर दिले अध्यक्षांनी खूप विश्वास दाखवत तालुकाध्यक्ष मी शहर तालुका येथील नेमलेले प्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्याची जास्त काम करून घ्यावे अशी आशा व्यक्


 

Sunday, 6 March 2022

बनमेरू विज्ञान महाविद्यालयाची अजंता फार्मा व हाॅटेल सफ्राॅनला भेट


 


बनमेरू विज्ञान महाविद्यालयाची अजंता फार्मा व हाॅटेल सफ्राॅनला भेट 

लोणार (प्रणव वराडे)
स्थानिक लोणार येथील कै.कु.दुर्गा क.बनमेरू विज्ञान महाविद्यालय लोणार येथील महाविद्यालयाची महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रकाश क.बनमेरू सर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.५ मार्च रोज शनिवारला सहलीचे आयोजन करण्यात आले .यासाठी महाविद्यालयातील प्रा.शिवशंकर मोरे यांनी सदर सहलसोबत  गेले. महाविद्यालयांमध्ये चालत असलेल्या बॅचलर ऑफ व्होकेशनल मध्ये असलेल्या  "टुरिझम ॲन्ड हाॅसपिट्यालिटी " या अंतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांमध्ये विविध हॉटेलला भेटी देणे व तसेच ग्राहकांना कोणकोणत्या सुविधा पुरवाव्या लागतात या बाबतची सखोल माहिती घेण्यासाठी अभ्यासक्रमांमध्ये हॉटेल भेटी व इंडस्ट्रीयल भेटी द्याव्या लागतात. तसेच सोबत  रसायन शास्त्र विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध केमिकल इंडस्ट्रीज मध्ये केमिकल तयार करणे, विविध गोळ्या कशा तयार त्यामध्ये कोणता कच्चामाल वापरला जातो अशा विविध विविध प्रश्नांची माहिती घेण्यासाठी सदर टूरचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी महाविद्यालयाने साफरोन होटेल जालना येथे विद्यार्थ्यांच्या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. हॉटेल सॅफ्रॉन येथील हॉटेलचे मॅनेजर श्री.वाघ सरांनी विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये  ग्राहकाच्या आगमनापासून ते निघण्या पर्यंत कोण कोणत्या सुविधा पुरवल्या लागतात याबद्दल याबद्दल सखोल अशी माहिती सांगितली व सर्व हॉटेल विद्यार्थ्यांना दाखवली तसेच हॉटेलमध्ये विविध रूम किचन फंक्शन हॉल, पार्टीवेअर इ. तत्सम माहिती दिली. त्यानंतर औरंगाबाद येथील चितेगाव येथे असलेल्या अजंठा फार्मासिटिकल कंपनीला भेट दिली या भेटीदरम्यान कंपनीचे ब्रंच हेड मॅनेजर मा.श्री.ओंकार जोशी,तसेच श्री संदीप सर  सरांनी सर्व विद्यार्थ्यांना अजंता फार्मा बद्दल पावर पॉइंट प्रेझेंटेशन दाखवून प्रत्यक्ष कंपनी मध्ये कोणकोणते विभाग असतात व या विभागांतर्गत कंपनीचे कार्य कसे चालते यामध्ये क्वाॅलिटी अशी रन्स क्वाॅलिटी कंट्रोल प्रोडक्शन आधी विभागाची सखोल अशी माहिती दिली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना कॉन्फरन्स हॉल मध्ये बसवून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. यासाठी कंपनीचे मॅनेजर मा.श्री.आशुतोष भालेराव सर यांनी भेटीसाठी अनमोल असे सहकार्य केले. महाविद्यालयातील प्रा.शिवशंकर मोरे यांनी कंपनीतील सर्व माहिती देणाऱ्या स्टाफचे महाविद्यालय मार्फत आभार व्यक्त केले व यापुढेही आपण असेच सहकार्य करावे अशी आशा व्यक्त केली. यासाठी महाविद्यालयातील  श्री.किरण काळे यांचे सहकार्य लाभले.

Friday, 4 March 2022

लोणार तालुक्यातील सरस्वती येथे ३८ वर्षीय युवकाचा मृतदेह

 


लोणार तालुक्यातील सरस्वती येथे ३८ वर्षीय युवकाचा मृतदेह

लोणार : (प्रणव वराडे)
लोणार तालुक्यातील सरस्वती येथे ३८ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळल्याची घटना दिनांक ४ मार्च २०२२ रोजी घटना उघडीस आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की सरस्वती येथील युवक कैलास अश्रू इंगोले वय ३८ वर्षे याचा मृतदेह गावालगतच मातमळ रस्त्या जवळ सकाळी सात वाजता आढळून आल्याची माहिती लोणार पोलिस स्टेशनचे लेखनीक चंद्रशेखर मुरडकर यांना मिळाली त्यांनी ही बाब तत्काळ प्रभारी पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांना सांगितली घटनेची गांभीर्य ओळखत प्रभारी पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांना पोलिस उपनिरीक्षक सुरज काळे लेखनिक चंद्रशेखर मुरडकर नितीन खर्डे पो का विशाल धोंडगे पोका गजानन सानप गोपनीय विभागाचे संतोष चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन सूक्ष्म पाहणी करत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयात लोणार येथे पाठवला फिर्यादी साहेबराव इंगोले यांच्या फिर्यादीवरून लोणार पो लीस स्टेशनला मर्ग दाखल केला आहे सदर मृतदेहाच्या डोक्यावर गंभीर मार असल्याने सदर मृतक युवकाचा घातपात झाल्याची चर्चा दबक्या आवाजात ग्रामस्थ करीत आहे या घटना स्थळाला उपविभागीय पो लीस अधिकारी विलास यामावर यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज काळे करीत आहे.

Thursday, 24 February 2022

कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालयात संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी




 कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालयात संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी 

लोणार (प्रणव वराडे)

स्थानिक लोणार येथील कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय, लोणार जि. बुलढाणा दि. २३ फेब्रुवारी २०२२ बुधवार ला राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने संत गाडगे बाबा यांच्या जयंती उत्सवात साजरा करण्यात आला. सर्व प्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू यांनी संत गाडगे बाबा यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू यांनी आपल्या मार्गदर्शनात संत गाडगे बाबा यांच्या दशसुत्री बद्दल माहिती दिली, तसेच आताच्या काळात गाडगे बाबा त्यावेळी दिलेली दशसुत्री किती महत्वाची आहे हे सांगितले.विद्यार्थ्यांना संत गाडगे बाबा यांच्या कार्याची माहिती व्हावी तसेच त्यांनी दिलेल्या दशसुत्री संदेश प्रत्येकापर्यंत जावा यासाठी राष्ट्रीय सेवा योजने च्यावतीने संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त संत गाडगे बाबा यांच्या जीवन कार्यावर online प्रश्न मंजुषेचे  आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू यांच्या मार्गदर्शनात  राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमधिकारी डॉ. सुर्यकांत भा. बोरूळ यांनी केले.  सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील रासेयो स्वंयसेवक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते

Monday, 21 February 2022

बनमेरू महाविद्यालयात शिवजन्मोत्सव साजरा


बनमेरू महाविद्यालयात शिवजन्मोत्सव साजरा

लोणार - (प्रणव वराडे)स्थानिक लोणार येथील कै. कु. दुर्गा क.बनमेरू विज्ञान महाविद्यालय व कै.कमलाबाई महिला महाविद्यालय लोणार येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी महाविद्यालयात शिवजन्मोत्सव साजरा  करण्यात आला. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन अमृत सेवाभावी संस्था सचिव डॉ. संतोष बनमेरू व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.सुर्यकांत बोरुळ यांच्या  हस्ते करण्यात आले. डॉ.संतोष बनमेरू यांनी आपल्या भाषणात सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराजांच्या विचारांची खास गरज आहे, तसेच त्यांनी दिलेली एकात्मतेची शिकवण व सर्व धर्म समभाव ही आता काळाची गरज आहे असे विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क.बनमेरू यांच्या मार्गदर्शनात रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.सुर्यकांत बोरुळ यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


 

Wednesday, 9 February 2022

नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावल्या बद्दल टिटवी येथील श्रावण जाधव चा सत्कार


 नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावल्या बद्दल टिटवी येथील श्रावण जाधव चा सत्कार

लोणार - प्रणव वराडे

लोणार तालुक्यातील टिटवी येथील श्रावण जाधव हा बिकट परिस्थितीवर मात करून गोवा येथे झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये दुस-या क्रमांकाच्या रौप्य पदकाचा मानकरी ठरला. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. श्रावण भिकाजी जाधव हा भूमिहीन शेतमजूर कुटूंबातील विद्यार्थी असून लहानपणीच त्यांचे पितृछत्र हरवल्याने अत्यंत गरिब परिस्थितीत शिक्षण घेत आहे. घरात आईच मोलमजुरी करून प्रपंच सांभाळते. तो बी. कॉमचा विद्यार्थी आहे. त्याला खेळाची सुध्दा आवड आहे. नुकत्याच गोवा येथे झालेल्या नॅशनल चॅम्पियन शिप १०० मिटर धावण्याच्या स्पर्धेत त्याने दुस-या क्रमांकाचे रौप्य पदक पटकावले असून इन्टरनॅशनल स्पर्धेसाठी जम्मू येथे होणाऱ्या निवड चाचणीसाठी जावे लागणार आहे. टिटवी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच भगवानराव कोकाटे यांनी श्रावण जाधवचा सत्कार करुन १ हजार ५०० रुपये आर्थिक मदत केली असल्याची माहिती ७ फेब्रुवारी रोजी देण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर डोळे, एकनाथ घाटे, बबन कोकाटे, भगवान नामदेव कोकाटे, फकिरा तनपुरे,गेंदु राऊत,विशाल राऊत, संतोष राऊत,राम तनपुरे व ग्रामस्थ उपस्थित होते

मोका पाहणी झालेल्या रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावावेस्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष संजय चाटे यांची मागणी


 मोका पाहणी झालेल्या रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावावेस्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष संजय चाटे यांची मागणी

लोणार - (प्रणव वराडे)

लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे येथील अडवलेल्या शेतरस्त्याची मागील वर्षी मोका पाहणी झाली आहे. तरी सदर रस्ता लवकरात लवकर खुला करून द्यावा. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक आघाडी तालुकाध्यक्ष संजय चाटे यांनी तहसिलदारांना निवेदन दिले आहे. चिंचोली सांगळे येथील गट नंबर ३१८ ते गट नंबर २७० पर्यंतचा संपूर्ण रस्ता काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेला आहे या दोन्ही गटांमधुन जाणारा शेत रस्ता नकाशाप्रमाणे सरकारी आहे. सदर रस्त्यावरून किमान ५० ते ७० शेतकऱ्यांना ये-जा करावी लागते. रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे शेतामध्ये जनावरे, बैलगाडी, खते बी-बियाणे व इतर शेती संबंधी अवजारे नेण्यास शेतकऱ्यांना फार तारेवरची कसरत करावी लागते, तरी सदर रस्त्याची मागील वर्षी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून पाहणी झालेली आहे, तरी यावर्षी सदर रस्ता मोकळा करून सदर रस्त्याचे पांदन रस्ता योजनेमध्ये समावेश करून रस्ता करून द्यावा ही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक आघाडी तालुकाध्यक्ष संजय चाटे यांनी दि. ०८ फेब्रुवारी निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती आज देण्यात आली आहे.

Sunday, 30 January 2022

राष्ट्रपीता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.


राष्ट्रपीता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

लोणार (प्रणव वराडे)

स्थानिक लोणार येथील कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय व कै.कमलाबाई बनमेरू कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय, लोणार येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू यांच्या मार्गदर्शनात हुतात्मा दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी अमृत सेवाभावी संस्थेचे सचिव मा. डॉ. संतोष बनमेरू व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमअधिकारी डॉ. सुर्यकांत बोरूळ उपस्थित होते. सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस हार घालून पूजन करण्यात आले व त्यानंतर दोन मिनिटाचे मौन ठेवून स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करण्यात आले.सदर सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Saturday, 29 January 2022

अखेर लोणार खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध


 अखेर लोणार खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध


लोणार (प्रणव वराडे) 

लोणार खरेदी-विक्री संघाची निवडणूक हे पहिल्यांदाच अविरोध झाली असून सर्वपक्षीय व सर्व समाजाला प्रतिनिधित्व मिळाल्याने ही अविरोध निवडून निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे लोणार खरेदी विक्री संघाचे तत्कालीन संचालक मंडळ 2019 ला बरखास्त झाले होते मध्यंतरी कोरोना महामारी मुळे निवडणुका समोर ढकलल्या गेल्या त्यानंतर ४ जानेवारीला२०२२रोजी निवडणूक लागली अर्ज भरण्याची तारीख ही चार ते दहा जानेवारी २०२२दरम्यान होती परंतु खासदार प्रतापराव जाधव मेहकर मतदार संघाचे आमदार संजय रायमुलकर सिंदखेड मतदारसंघाचे माजी आमदार तोताराम कायंदे शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश राव मापारी शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक बळीराम मापारी संस्थेचे माजी अध्यक्ष विजय सानप यांच्या पुढाकाराने ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली

यामध्ये महिला मतदार संघासाठी दोन जागा होत्या त्यासाठी 5 अर्ज प्राप्त झाले होते परंतु 1 अर्ज मागे घेतल्याने 4 कायम राहिले होते परंतु सर्वांच्या संमतीने चार अर्जाची दोन जागा साठी ईश्वर चिट्टी टाकण्यात आली यामध्ये तारामती जायभाये व ज्योती रमेश मुंडे यांची निवड करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून म्हणून ए आर ऑफिस से गितेशचंद्र साबळे होते यावेळी सोसायटी मतदार संघातून शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक बळीराम मापारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून भास्कर मोरे इतर मागास वर्गीय मधून ज्ञानेश्वर जाधव विमुक्त भटक्या जाती मधून केशवराव तुकाराम आघाव सर्वसाधारण प्र वर्गातून हिम्मतराव सानप मुक्ताजी सोनुने गणेश कुटे विजय डोईफोडे गजानन मुर्तडकर भगवान सानप युवराज सोनुने संतोष आघाव उद्धवराव बुधवत विष्णू केंद्रे नारायण सानप यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी लोणार नगरपालिकेचे नगरसेवक डॉक्टर अनिल मापारी शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग सरकटे काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य सुभाष सोनुने भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विजय मापारी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रकाश महाराज मुंढे राहुल मापारी सुधाकर नरवाडे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Thursday, 27 January 2022

टिटवी ते नांद्रा रोडवर मोटरसायकलचा भीषण अपघात एक जण ठार


टिटवी ते नांद्रा रोडवर मोटरसायकलचा भीषण अपघात एक जण ठार

लोणार - प्रणव वराडे

लोणार तालुक्यातील टिटवी ते नांद्रा रोडवर मोटरसायकलचा भीषण अपघात घेऊन एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज 27 जानेवारी रोजी घडली आहे.सावरगाव मुंढे येथील अनिरुद्ध रामकिसन मुंढे यांनी लोणार पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की टिटवी ते नांद्रा रोडवरील नांद्रा शिवारात अरुण भगवान कुटे राहणार देऊळगाव वायसा यांनी त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच 19 बी एस 6489 भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवून पाठीमागून जोरदार धडक दिल्याने राजू ज्ञानबा मुंढे यांच्या मोटरसायकलला धडक बसल्याने राजु ज्ञानोबा मुंढे गंभीर जखमी झाले तर मोटरसायकलवर पाठीमागून बसलेले एकनाथ ज्ञानोबा मुंढे हे जखमी होऊन मृत झाले अनिरुद्ध रामकिसन मुंढे यांच्या फिर्यादीवरून अरुण भगवान कुटे यांच्याविरुद्ध लोणार पोलीस स्टेशनला अप क्रमांक 24/ 2022 कलम 279 ,337 ,338 ,304अ, 427 भाधवी नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार प्रदिप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बन्शी पवार करीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

Tuesday, 25 January 2022

कै. कू दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालयात "राष्ट्रीय मतदार दिवस" साजरा




 कै. कू दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालयात "राष्ट्रीय मतदार दिवस" साजरा

लोणार (प्रणव वराडे)

स्थानिक लोणार येथील कै. कू दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय लोणार येथे दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने “राष्ट्रीय मतदार दिवस” साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी मा. सैपन नदाफ साहेब तहसीलदार लोणार, मा. श्री अशोक बोरे साहेब निवडणूक विभाग, तहसील कार्यालय लोणार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मतदार दिवसानिमित्त प्रतिज्ञा घेतली.यानंतर मध्ये महाविद्यालयाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे, अध्यक्षांचे स्वागत करण्यात आले. आपल्या प्रास्ताविकामध्ये रासेयो कार्यक्रमधिकारी डॉ. सुर्यकांत बोरुळ यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा तसेच दत्तक गाव पिंपळनेर येथे घेण्यात आलेली मतदार जनजागृती रॅली व नवीन मतदार नोंदणी अभियान, इत्यादी कार्यक्रमाची माहिती प्रमुख पाहुणे व विद्यार्थी यांना दिली. मा. तहसीलदार सैपन नदाफ साहेब यांनी महाविद्यालयाने केलेल्या मतदान जनजागृती, नवीन मतदार नोंदणी कार्याचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू यांनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला मजबूत व बळकट करण्यासाठी सर्वांनी आपण घेतलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे कोणत्याही आमिषाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता आपले मतदान कार्य नि:पक्षपाती केले पाहिजे यासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.तसेच राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये प्रश्नमंजुषा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सूर्यकांत बोरूळ तर आभार प्रदर्शन प्रा. शिवशंकर मोरे यांनी केले यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते.

Monday, 24 January 2022

राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाच्या वतीने लोणार तहसिलदारांना निवेदन

 


राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाच्या वतीने लोणार तहसिलदारांना निवेदन

लोणार/सतीश मुलंगे

राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाच्या वतीने लोणार तहसिलदारांना निवेदन, राज्यात अनेक ठिकाणी पत्रकार बांधवांवर प्राणघातक हल्ले झाले आहे.संघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष सतीश भालेराव व यवतमाळ जिल्ह्य़ातील पत्रकारांवर देखील प्राणघातक हल्ला झाला आहे. गुन्हेगारांवर पत्रकार अधिनियमाच्या अंतर्गत कडक कारवाई करावी व पत्रकारांच्या विविध समस्या संदर्भात केलेल्या मागण्या पूर्ण कराव्या यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम सर यांच्या नेतृत्वाखाली वार सोमवार दिनांक 24 जानेवारी 2022 रोजी पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना तहसीलच्या मार्फत निवेदन देण्यात आले,यावेळी जिल्हाध्यक्ष शेख सज्जाद,जिल्हा उपाध्यक्ष लुकमान कुरेशी, तालुका अध्यक्ष उध्दव आटोळे,शहराध्यक्ष भुषण शेटे,विजय मापारी,मयूर सरकटे,प्रमेश्वर मापारी, गणेश कुटे,सालार पठाण,जगन मोरे,सतिष मुलंगे,विजय महाजन व इतर पत्रकार बांधव उपस्थित होते....

Sunday, 23 January 2022

मौजे जामठी येथे ३१ लक्ष रुपयांच्या दोन सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन मा जालिंधर बुधवत यांच्या हस्ते संपन्न.


 




मौजे जामठी येथे ३१ लक्ष रुपयांच्या दोन सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन मा जालिंधर बुधवत यांच्या हस्ते संपन्न.

( प्रणव वराडे )

मौजे जामठी येथील ग्रामस्थांनी जि प बुलडाणा येथे मागील आठवड्यात मा जालिंधर बुधवत यांची भेट घेऊन २ सभागृहाची मागणी केली होती. त्याचवेळी त्यांना सभागृह तात्काळ मंजूर करून कामाला सुरुवात करू अशी ग्वाही दिली होती. आज दि २४/१/२२ रोजी मा जालिंधर बुधवत यांनी जामठी येथील हनुमान मंदिरा समोरील जागेत व मंगल कार्यालयाच्या जागेत अश्या ३१ लक्ष रुपयांच्या दोन सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन केले. "जे बोलतो ते करतो," निवडणूक जवळ आली म्हणूनच नाही तर आम्ही नेहमी लोकांच्या सुख दुःखात सहभागी होतो. विकास कामांच्या मध्ये आम्ही कधीही राजकारण आडवे आणत नाही, घाणेरडे राजकारण आम्ही करत नाही बरोबरी करायची तर विचारांची करा, विकासकामांची करा असे मनोगत यावेळी मा जालिंधर बुधवत यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी लखन गाडेकर, पैनगंगा सो अध्यक्ष श्रीकांत पवार, पं स सदस्य दिलीप सिनकर, द आ उप जि प्र दादाराव महाले, उप ता प्र अमोल शिंदे, विजय इतवारे, वै आ ता प्र डॉ अरुण पोफळे, यु से उप ता प्र हरिभाऊ कड शिवहरी मांटे, बाळासाहेब सिनकर, दिलीप माळोदे,कविजय  गाढवे, समाधान बुधवत, शेषराव बुधवत, सदाशिव बुधवत, संदीप पालकर, गणेश पालकर, राजु पालकर, रामू पालकर, शेख हुसेन, एकनाथ पालकर, आशिष बुधवत, किरण वाघ, रामेश्वर बुधवत, गजानन आघाव, सुगदेव वाघ, अविनाश डोईफोडे, देवानंद दांडगे, सुधाकर वाघ, किशोर कानडजे, दिपक पिंपळे, रामकृष्ण पाटील पिंपळे, विठ्ठलराव पिंपळे, विक्रम पिंपळे, शालीकराम पिंपळे, कारभारी पिंपळे, स्वप्नील पिंपळे, संदीप डोईफोडे, नेताजी पिंपळे, गजानन धंदर, सतीश धंदर, नामदेव धंदर, प्रभाकर पवार, नारायण, पडोळ, लक्ष्मण पडोळ, नरेंद्र पायघन, विजय सिनकर, विशाल कोथळकर, सतिश जंजाळ, योगेश पायघन, योगेश बोडखे, शिवहरी पायघन, शुभम पायघन, गजानन रिसोद, रमेश देवकर, केशव सपकाळ, गजानन पायघन, ज्ञानेश्वर जाधव, राजेंद्र सिनकर, शिवाजी पाटील, रवी गोरे, प्रभाकर मघाडे, गोविंद मघाडे, मुकुंदा काळे, मधुकर महाले, संभाजी देशमुख, किरण उगले, सतिश नागपुरे, हरिदास दांडगे, भास्करराव देशमुख, जलील बेग, नामदेव नरोटे, श्रावण बोरकर, निलेश निकाळजे, शिवा बोरकर, संतोष पाटील, मंगलसिंग कवाळ, ज्ञानेश्वर पोफळे,  निलेश शेळके, भगवान शेळके, निलेश गायकवाड, सिंकदर बागुल, शुभम शेळके, विनोद सपकाळ शिवाजी शेळके, प्रकाश लोखंडे, विशाल गायकवाड, तसेच जामठी येथील बबन पाटील, वामनराव तायडे, मधुकर सोनुने, रामराव तायडे, पांडुरंग तायडे, प्रकाश तायडे, प्रभाकर तायडे, लक्ष्मण तायडे, सुदाम पाटील, प्रभाकर तायडे, आत्माराम तायडे, उत्तम नामदेव मस्के, मोहन तायडे, किशोर तायडे, रामेश्वर सुसर, तानाजी तायडे, समाधान तायडे, मोहन तायडे, शरद तायडे, ज्ञानेश्वर काकडे, अमोल तायडे, प्रमोद तायडे, निलेश तायडे, प्रशांत तायडे, आकाश तायडे, विष्णू तायडे, अरुण पाटिल, रमेश पाटील, गजानन पाटील, भुजंगराव अंभोरे, विजत तायडे, ज्ञानेश्वर तायडे, सागर गायकवाड, संदेश तायडे, विकास पाटिल, जीवन अंभोरे, रेवण तायडे, विशाल प्रकाश तायडे, मधुकर सोनुने, प्रकाश तायडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, जामठी येथील महिला भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.

लोणार सरोवर पर्यटन विकासासाठी १६ कोटींचा निधी मंजूर


 लोणार सरोवर पर्यटन विकासासाठी १६ कोटींचा निधी मंजूर 

लोणार :- (प्रणव वराडे) 

मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे आ . डॉ . संजय रायमुलकर यांनी शासन व प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता . त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून पर्यटन विभागातंर्गत असलेल्या या मोठ्या पर्यटन विकास आराखड्यातील कामांसाठी सन २०२१-२२ आर्थिक वर्षात निधी उपलब्ध करून देण्यास शासन स्तरावरुन मान्यता देण्यात आल्याने लोणार सरोवरासाठी १६ कोटी मंजूर करण्यात आले आहे लोणारचे सरोवर खाऱ्या पाण्याचे जगप्रसिध्द सरोवर असून याची निर्मिती उल्कापातामुळे झाली . लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषीत करण्यात आले . लोणार सरोवर पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात . जिल्हा नियोजन विभाग बुलडाणा यांनी ९ ऑगस्ट २०२१ रोजी प्रस्ताव सादर केले होते . त्या अनुषंगाने लोणार सरोवर पर्यटन विकास आराखड्यांतील कामास मान्यता देण्यात आली असून लोणार सरोवर विकासाठी १६ कोटी रुपयांचा निधीस शासन स्तरावरून विकास आराखड्यातील कामांसाठी जिल्हाधिकारी यांना पर्यटन संचालनाय यांनी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे . सदर निधी ३१ मार्च २०२२ पर्यंत खर्च करून कामे मार्गी लावावा लागणार आहे .

कै. कु. दुर्गा क.बनमेरू विज्ञान महाविद्यालय लोणार येथे सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी


 कै. कु. दुर्गा क.बनमेरू विज्ञान महाविद्यालय लोणार येथे सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

 लोणार (प्रणव वराडे)

स्थानिक लोणार येथील कै. कु. दुर्गा क.बनमेरू विज्ञान महाविद्यालय लोणार येथे राष्ट्रीय सेवा योजना च्यावतीने आज दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क बनमेरू यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमृत सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतोष क बनमेरू हे होते सर्वप्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सूर्यकांत बोरूळ यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले व कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये थोर महापुरुषांचे आचार-विचार जनमानसात रुजावे व त्यांच्या कार्याचे स्मरण असावे यासाठी आपण अशा कार्यक्रमाचे आयोजन करत असतो हे स्पष्ट केले. आपल्या मार्गदर्शनात डॉ.संतोष क. बनमेरू यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या कार्यावर प्रकाश टाकला त्यांनी केलेले कार्य किती महान आहे हे उदाहरणासह सांगितले यानंतर राष्ट्रीय सेवा योजना सह कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक शिवशंकर मोरे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.यावेळी महविद्यायतील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, व रासेयो स्वयंसेवक उपस्थित

Friday, 21 January 2022

दाभा ते बोरखेडी रस्त्याची दुरावस्था नागरिकांची डांबरीकरणाची मागणी

 




दाभा ते बोरखेडी रस्त्याची दुरावस्था नागरिकांची डांबरीकरणाची  मागणी 

( लोणार किशोर मोरे  )

दाभा ते बोरखेडी रिसोड मार्गे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे यासाठी दाभा येथील नागरिकांची मागणी जोर धरीत आहे हा रस्ता वाशिम जिल्ह्याला जोडणारा खूप जवळ मार्ग असून लोणार वरून रिसोड ला जाण्यासाठी दहा किलोमीटरचे अंतर कमी होते बोरखेडी पासून डांबरीकरण बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील दाभा या गावाच्या या हद्दीपर्यंत आलेला आहे परंतु तेथून दाभा या गावापर्यंत पर्यंत कच्चा रस्ता असल्या मुळे वाशीम जिल्ह्यात जाण्यासाठी खडतर प्रवास करून जावे लागते लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून या रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर प्रदीप मोरे यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे

Thursday, 20 January 2022

लोणारमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ३ दुचाकी लंपास. चोरटे सीसीटीव्हीत कैद

 


लोणारमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ३ दुचाकी लंपास. 

चोरटे सीसीटीव्हीत कैद

लोणार ( प्रणव वराडे ) :- 
                                       शहरामध्ये दिनांक २० जानेवारी पहाटे दोन ते पाच दरम्यान अज्ञात चार ते पाच दरोडेखोरांनी एक ऑटोमोबाईल दुकान फोडत दुकानातील साडेतीन लाख रुपये वर डल्ला मारत इतर हॉटेल व विविध प्रतिष्ठान शहरातील तीन दुचाकी चोरून नेल्याची घटना पहाटे उघडीस आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेगाव – पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जय कमळजा स्पेअर पार्ट दुकानाचे कुलूप व शटर वाकवून गल्यातील साडेतीन लाख रुपये व १२ हजार किमतीच्या डीव्हीआर चोरून नेला. त्याचबरोबर बायपासवरील कपील विजय खिवंसरा यांचे हॉटेल फिस्टा फोडून गल्यातील नगदी ३२ हजार पाचशे रुपये व ९ हजार रुपये किमतीचा डी व्ही आर , पटेल नगर मधील विजय उत्तमराव सानप यांची दुचाकी नंबर एम एच २८ ए जी ५२६५ किमती अंदाजे चाळीस हजार रुपयांची तसेच ओम प्रकाश मंगलदास मुवाल, राहणार लोणार यांची हिरोहोंडा स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच २८ ए ७८१८ किंमत पंचवीस हजार रुपये व स्टार सिटी कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच २८ ए टी ८४८० किंमत २० हजार रुपये अशा एकूण तीन मोटरसायकल ८५ हजार रुपयाच्या एकूण ४ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी दि. १९ जानेवारी रोजी रात्री आठ वाजता ते दि. २० जानेवारी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान चोरून नेले. पुढील तपास फिर्यादी पंकज वसंतराव मापारी यांच्या फिर्यादीवरून लोणार पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक ४६१/३८०/३७९ भादवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज काळे, बीट जमादार रामकिसन गीते, पो. काँ. जगदीश सानप करीत आहेत. यावेळी फिंगरप्रिंट एक्सपर्ट आर. एच. गाढवे तपासणीस पीएस वैद्य, फोटोग्राफर ए. पी. चित्ते, श्वान पथकाचे गजानन राजपूत यांनी घटनास्थळी भेट देत सूक्ष्म निरीक्षण करत महत्त्वाचे धागेदोरे जमा केले आहे.


अनुसूचीत जमातीच्या जिल्हा परिषद सदस्य संख्या वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन

 



अनुसूचीत जमातीच्या जिल्हा परिषद सदस्य संख्या वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन

लोणार (प्रणव वराडे)

जिल्हा परीषद, पंचायत समिती मधिल अनुसूचीत जमातीच्या लोकप्रतिनीधीच्या सदस्य संख्या वाढविण्याचा निर्णय राज्यमंत्री मंडळाच्या बैठकित घेण्यात आलेला आहे. तसेच लोकसंख्येच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाच्या अंतिम मंजुरीने सदस्य संख्या निश्चीत करण्यात येणार आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्हयातील आदिवासी समाजाची लोकसंख्या पाहता आजपर्यंत सदस्य संख्येत अन्याय झाल्याचे दिसून येत आहे. राज्य मंत्रीमंडळात सदस्य संख्या वाढीचा निर्णय झाला असल्यामुळे बुलडाणा जिल्हयातील अनुसूचीत जमातीच्या लोकसंख्येचा विचार करून सदस्य लोकप्रतिनीधीच्या सदस्य संख्या वाढविण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हा परिषद सदस्या सौ. गोदावरीताई कोकाटे, आदिवासी विकास प्रकल्प समितीच्या अध्यक्षा नंदिनीताई टारपे, नियोजन समितीचे सदस्य भगवानराव कोकाटे यांनी १८ जानेवारी रोजी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गौरी सावंत यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले असल्याची माहिती २० जानेवारी रोजी देण्यात आली आहे.



Wednesday, 19 January 2022

अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्याच्या विभागीय अध्यक्षपदी भारत रामराव राठोड यांची निवड

 



अखिल भारतीय  फार्मासिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्याच्या  विभागीय अध्यक्षपदी भारत रामराव राठोड  यांची निवड  

लोणार (प्रणव वराडे)

अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या  महाराष्ट्र राज्य  विदर्भ विभाग प्रवक्ते  फार्मासिस्ट भारत रामराव राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे,

 फार्मासिस्ट क्षेत्रांमधील फार्मासिस्ट वर होणार अन्याय दूर व्हावा व त्यांना न्याय कसा मिळवता येईल यासाठी त्यांनी विदर्भ विभागातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची धडपड चालू होती व  करोना  काळामध्ये  सामाजिक बांधिलकी जपत यांनी आपले कर्तव्य बजावले आहे त्यांचे हे कार्य बघून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा.दत्ता खराटे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ.पंकज चौधरी,प्रदेश सचिव रोहित वाघ यांच्या शिफारशीनुसार व सर्वांच्या एकमताने करण्यात आली त्यांची ही निवड करण्यात आली आहे.ही निवड होताच त्यांच्यावर विविध शैक्षणिक,अध्यात्मिक व राजकीय  क्षेत्रामधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत, विदर्भ विभाग प्रमुख फार्मासिस्ट योगेश मुंडे विदर्भ विभाग उपाध्यक्ष रवि राठोड राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर पायघन प्रदेश कार्याध्यक्ष नासीर पठाण प्रदेश कोषाध्यक्ष राम घोटकर प्रदेश सहसचिव महादेव मुंडे प्रदेश प्रवक्ते हनुमान गरुड  प्रवक्ते बाळ राहुल पारखे   खानदेश विभाग अध्यक्ष प्राध्यापक सुशील महाराज  राज्य कार्यकारिणी सदस्य मुंबई विभाग अध्यक्ष हर्षराज आहिरे यांनी पण त्यांचे कौतुक केले आहे येणाऱ्या काळामध्ये विदर्भ  विभागाच्या नाहीतर पूर्ण महाराष्ट्र मध्ये फार्मासिस्टच्या येणार्‍या विविध अडचणी  फार्मासिस्ट भारत रामराव राठोड हे सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष दत्ता खराटे,प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर पंकज चौधरी व सचिव रोहित वाघ प्रदेश सहसचिव महादेव मुंडे प्रदेश कार्याध्यक्ष नासीर पठाण राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर पायघन व सोशल मीडिया प्रमुख प्रा. अविनाश ढोबळे   यांनी व्यक्त केला आहे

दाभा ते वढव शेतरास्ता शेतकऱ्यांन साठी होतोय सुखकर




 दाभा ते वढव शेतरास्ता शेतकऱ्यांन साठी  होतोय सुखकर 

(दाभा प्रतिनिधी किशोर मोरे)

आपला भारत देश कृषी प्रधान म्हणून ओळखला जातो व शेत रस्ते हे कृषी विकासा च्या मुख्य धमन्या आहेत ग्रामीण भागातील पारंपारिक गावजोड रस्ते पाधन रस्ते हे मजबूत असणे  शेतकरी प्रगती साठी  गरजेचे आहे .त्यासाठी   शासन स्तरावर विविध योजनां आहेत परंतु या योजनांची अंमलबजावणी करण्याससाठी ग्रामीण भागातील मायबाप जनतेचा  मोठा पुढाकार असलायला पाहिजेत .याचा प्रत्यय दाभा गावातील समस्त शेतकरी बांधवांनी घेतला आहे .बुलढाणा जिल्ह्यच्या अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या दाभा गावातील जुनी वढव वाट म्हणून प्रसिद्ध आलेली पांधी म्हणजे अगदी भयावह भेसूर रस्ता सर्वेत काटे चिखल पावसाळ्यात कमरे एवढे   पाणी यातूनच मार्ग काढून मार्गाने शेतात जाऊन शेतकरी वर्गाला शेतमशागतीची कामे करावी लागतअसल्याने  सरकारची ग्रामीण भागातील गाव जोड रस्ते मोकळे करण्यासाठी  राजस्व अभियानाअंतर्गत  मोकळे करून देण्यात आले त्यामुळे दाभा गावातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन सदर शेत रस्ता मोकळा करून सर्व शेतकरी बांधवांनी आपली शेतावर जाण्याची फरफट टाळण्यासाठी हंगामात शेत मालाची  वाहतूक सुखकर होण्यासाठी   व्यवस्थित  कोणत्याच सरकारी योजनांवर विसंबून न राहता पुढाकार घेऊन   लोकवर्गणीतून माती भराव काम केले परंतु सदर मातीभराव रस्ता खराब झाल्याने .पुन्हा शेतकरी वर्गाने  दाभा येथील कर्तव्य दक्ष सरपंच सौ.वर्षा किशोर मोरे यांना वढव रस्त्याचे खडीकरण करून  मजबुतीकरण करण्याची मागणी केली ।दाभा येथील कर्तव्य दक्ष  सरपंच वर्षा मोरे यांनी त्वरित दखल घेऊन मा.खा .प्रतापराव  जाधव .व मेहकर मतदारसंघाचे आमदार मा.डॉ संजय रायमूलकर यांच्या मार्गदर्शनाखाली  पालकमंत्री पांधनरस्ते योजनेत समाविष्ट करून  मंजूर करून  दाभा ते वढव सीमेपर्यंत 2.5 किमी रस्ता  कामाला सुरुवात केली असून आज रोजी रस्त्यावर मजबुती करणाचे काम प्रगती पथावर आहे सरपंच वर्षा मोरे यांच्या प्रयत्ना तुन लवकरच  सदर रस्ता मजबुतीकरणं करून शेतकऱ्यासाठी  सुखकर  होताना दिसत आहे . दाभा येथील शेतकऱ्याची हंगामाच्या दिवसात होणारी फरफट पाहता  दाभा ते वढव  सीमेपर्यंत   2.5 kmशेत रस्ता  पालक मंत्री पाधणं रस्ता योजनेतून  मजूर करून मजबुती करणाचे काम चालू असून सोबतच दाभा ते गुंजखेड 1किमी शेत रस्त्याचे खडीकरण व मजबुती करणाचे काम लवकरच सुरू करणार असल्याचे दाभा येथील सरपंच वर्षा किशोर मोरे यांनी दै .पुण्यनगरी शी बोलताना  माहिती दिली आहे .सर्व शेत रस्त्यासाठी  कृषि उत्पन्न बाजारसमितीचे माजी सभापती डॉ  मारोती मोरे  यांचे मार्गदर्शन  लाभत असल्याने सोबतच ग्रामपंचायत उपसरपंच उषा बाजड.सदस्या संगीताताई  मोरे मंगलाताई मोरे उषाताई मोरे सदस्य दत्ता भाऊ मोरे विठ्ठल  बोखारे  रवी रणबावरे शोभाबाई प्रधान नवं नियुक्त सदस्य गणेश अजगर ग्रामसेवक किशोर भाग्यवंत व गावातील शेतकऱ्या चे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

लोणार तहसीलदार यांनी ठोठावला स्टेट बँक कर्मचाऱ्यांना ५ हजाराचा दंड

 



लोणार तहसीलदार यांनी ठोठावला स्टेट बँक कर्मचाऱ्यांना ५ हजाराचा दंड

( लोणार प्रणव वराडे )

लोणार शहरातील भारतीय स्टेट बँकेत तहसीलदार सैपन नदाफ यांनी अचानक बँकेला भेट दिली असता संबंधित बँकेतील कर्मचाऱ्यांना व तेथील ग्राहकांना माक्स नव्हते तसेच कोणतीही सेनिटायजर सुविधा नव्हती बँकेमध्ये शिस्तीचे पालन होत नव्हते त्यामुळे कोवीड नियमाचे पालन होत नसल्यामुळे न प चे कर्मचारी शेख सलीम यांनी ५ हजार रुपयाची दंड ठोठावण्यात आली. सध्या कोरोना निर्बंध असतांना कुठल्याही प्रकारचे नियम न पाळल्यामुळे कोरोना चा फैलाव होत आहे . शासन वेळोवेळी नागरिकांना सूचना देऊनही नागरिक नियमाचे पालन करीत नाही त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे तहसीलदार सैपन नदाफ यांनी १८ जानेवारी रोजी सांगितले . यावेळी तहसील कर्मचारी आघाव व तलाठी व इतर उपस्थित होते .

Wednesday, 12 January 2022

कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व्याखान

 




कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व्याखान 

लोणार (प्रणव वराडे)

स्थानिक कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालय, लोणार येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने “महाराष्ट्र शासनाच्या जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राचे लेकीचा” या अभियानांतर्गत १२ जानेवारी २०२२ वार बुधवार रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त  ऑनलाईन व्याख्यानाचे   आयोजन करण्यात आले. “राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार” या विषयावर व्याख्यानाचे ऑनलाईन आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू, कार्यक्रमाचे उदघाटक संस्थेचे सचिव डॉ. संतोष क. बनमेरू हे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. डॉ. श्रीहरी र. पितळे, इतिहास विभाग प्रमुख, स्व. पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, रिसोड जि. वाशिम हे होते. या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात केली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.राष्ट्रीय सेवा योजना, कार्यक्रमधिकारी तसेच कार्यक्रमाचे समन्वयक  डॉ. सुर्यकांत बोरुळ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक माननीय डॉ. श्रीहरी र. पितळे सर यांनी “राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार” विषयावर मार्गदर्शन केले यामध्ये त्यांनी राजमाता, वीरमाता, मासाहेब जिजाऊ यांचा आदर्श सर्व माता भगिनींनी आत्मसात करावा तर स्वामी विवेकानंद हे युवकांचे प्रेरणास्थान आहे यांचे विचार हेच येणाऱ्या युगाला तारणार आहे. अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. हे स्वामी विवेकानंदांचे विचार त्यांनी विद्यार्थ्यासमोर मांडले.यावेळी गणित दिवसानिमित्त संपन्न झालेल्या Poster Presentation स्पर्धेचा निकाल प्रा. सौरभ गायकवाड  यांनी जाहीर केला. यामध्ये प्रथम क्र. कु. निकिता रुणवाल, व्दितीय क्र. कु. मनिषा खरात व तृतीय क्र. कु. शुभांगी सुरुशे यांनी मिळवला. अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू सर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या व या सर्व थोर महामानवांचे विचार आपण आत्मसात करावे असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना, कार्यक्रमधिकारी डॉ. सुर्यकांत बोरुळ तर आभार प्रदर्शन प्रा.शिवशंकर मोरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने रासेयो स्वंयसेवक विद्यार्थी उपस्थित होते.

Monday, 10 January 2022

कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालयात मुलींसाठी आत्मनिर्भरता शिबीर संपन्न

 



कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालयात मुलींसाठी आत्मनिर्भरता शिबीर संपन्न  

लोणार - (प्रणव वराडे)

स्थानिक कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालय, लोणार जि. बुलढाणा येथे राष्ट्रीय सेवा योजना वतीने दि. ६ जानेवारी २०२२ वार गुरुवार रोजी दुपारी १.३०pm वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. प्रकाश क. बनमेरू यांच्या मार्गदर्शनात “मुलींसाठी आत्मनिर्भरता” शिबीराचे आयोजन करण्यात आले. सर्व प्रथम राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमधिकारी यांनी प्रशिक्षक श्री. प्रशांत रामावत यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत केले व शिबिरार्थीना त्यांचा परिचय करून दिला. आजही मुलीवर बलात्कार, लैंगिक शोषणाच्या घटना मोठ्याप्रमाणात कानावर पडतात, त्यामुळे स्वसंरक्षणसाठी मुलीनी आता प्रशिक्षण किंवा आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. त्यामुळे मुलींनी आता हतबल न होता अन्यायाच्या विरोधात पुढे येण्याची गरज आहे. हाच संदेश देण्यासाठी महाविद्यालयात महिला हिंसाचार विरोधी अभियान हाती घेण्यात आले. यासाठी महाविद्यालयात “मुलींसाठी आत्मनिर्भरता” शिबीराचे आयोजन प्राचार्य मा. डॉ. प्रकाश क. बनमेरू यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले असे शिबिराविषयी माहिती देतांना डॉ. सुर्यकांत बोरुळ यांनी सांगितले. यामध्ये महाविद्यालयातील बि. एस्सी. प्रथम, व्दितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या. श्री. प्रशांत रामावत यांनी महाविद्यालयातील सहकारी विद्यार्थी लक्ष्मन भंगार याच्या सहाय्याने स्वसंरक्षणाचे विविध प्रात्यक्षिके दाखविली.  सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना, सहकार्यक्रमधिकारी प्रा. शिवशंकर मोरे महाविद्यालयातील व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Friday, 7 January 2022

पञकारांनी गोरगरीब सर्वसामान्यांच्या प्रशनांना वाच्या फोडुन प्रामाणिकपणे त्यांना आपल्या लेखनीतुन न्याय द्यावा असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम

 


पञकारांनी गोरगरीब सर्वसामान्यांच्या प्रशनांना वाच्या फोडुन प्रामाणिकपणे त्यांना आपल्या लेखनीतुन न्याय द्यावा असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम

लोणार - प्रणव वराडे

पञकारांनी गोरगरीब सर्वसामान्यांच्या प्रशनांना वाच्या फोडुन प्रामाणिकपणे त्यांना आपल्या लेखनीतुन न्याय द्यावा असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम यांनी केले तसेच जिल्हा शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील पञकारांच्या पञकार दिनानिमित्त सत्कार केला यावेळी पञकार संघाचे मार्गदर्शक तथा शिवसेना नगरसेवक डॉ.अनिल मापारी, पञकार संघाचे अध्यक्ष समदभाई, शिवसेना उपतालुकाप्रमुख भगवान पाटील सुलताने, शिवसेना नगरसेवक गजानन मापारी व तालुक्यातील सर्व पञकार बांधव यावेळी उपस्थित होते

कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालयात पत्रकार दिन साजरा

 

कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालयात पत्रकार दिन साजरा

लोणार - (प्रणव वराडे) 

स्थानिक कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालय, लोणार येथे राष्ट्रीय सेवा योजना वतीने दि. ६ जानेवारी २०२२ वार गुरुवार रोजी “पत्रकार दिन” साजरा करण्यात आला. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो यासाठी महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू हे तर प्रमुख अतिथी म्हणून लोणार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मा. शेख शमद शेख अहमद व सचिव मा. पवन शर्मा व कार्यक्रमधिकारी डॉ. सुर्यकांत बोरुळ हे मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क.बनमेरू यांच्या हस्ते मान्यवर लोणार शहर व ग्रामीण भागातील सर्व पत्रकार बंधुंचे स्वागत करण्यात आले. यावेळी पत्रकार बंधू मधील मा. उमेश पटोकार व मा. राहुल सरदार यांनी पत्रकारिता किती कठीण आहे चित्र विशद केले तसेच पूर्वीच्या काळातील पत्रकारांना आय टी साधणाचा अभावामुळे अपार कष्ट घ्यावे लागतअसे, परंतु आता कॉम्पुटर युगात व स्मार्ट मोबाईल काळात हे थोडे सोपे झाले आहे. असे संगितले. यानंतर प्रमुख अतिथी, लोणार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मा. शेख शमद शेख अहमद यांनी आपले विचार व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू यांनी माहिती प्रसारणाच्या माध्यमामुळे पत्रकारितेला वेग आला आहे. कारण त्यामुळे सामान्य जनतेच्या भावना ह्या लोक प्रशासनापर्यंत सहजतेने पोहोचतात व त्यांच्या अडचणी सोडविण्याची एक उत्तम साधन म्हणजे पत्रकारिता होय असे संगितले व सर्व पत्रकार बंधूंचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी लोणार शहरातील तसेच ग्रामीण भागातील सर्व पत्रकार बंधूंना आमंत्रित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी सर्व पत्रकार उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना, सहकार्यक्रमधिकारी प्रा. शिवशंकर मोरे व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना, कार्यक्रमधिकारी डॉ. सुर्यकांत बोरुळ केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

पत्रकार दिनानिमित्त बुलढाणा अर्बन तर्फे सत्कार

पत्रकार दिनानिमित्त बुलढाणा अर्बन तर्फे सत्कार

लोणार (प्रणव वराडे)
दि. 6 जानेवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून लोणार येथील  अध्यक्ष.मा.भाईजी चिफ मॅनेजिंग डायरेक्टर मा. सुकेशजी झंवर साहेब यांचे मार्गदर्शनानुसार विभागीय व्यवस्थापक मा.देशमाने साहेब यांनी पत्रकारांचा पुष्पगुच्छ व पत्रकारितेची ओळख म्हणून असलेली लेखणी पेन तसेच चहापान व फराळ देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी शाखा लोणार येथे सर्वप्रथम आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून लोणार पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मा. समदभाई, लोणार पत्रकार संघांचे मार्गदर्शक डॉ.श्री.अनिलभाऊ मापारी, उपाध्यक्ष श्री. संदिपभाऊ मापारी, सचिव श्री. पवनकुमार शर्मा, लोणार पत्रकार संघटनेचे श्री.राहुलजी सरदार तसेच लोणार पत्रकार संघटनेचे सर्व सदस्य यांचा यथोचित सत्कार केला.
सदर कार्यक्रमाच्या वेळी श्री.राहुलजी सरदार,श्री. गजाननजी रिंढे,श्री. शामभाऊ सोनुने.श्री. सुनिलभाऊ पटोकार यांनी मनोगत व्यक्त करून मा.भाईजी, मा. सुकेशजी झंवर साहेब यांचे करीत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल आभार मानले.
मा. विभागीय व्यवस्थापक श्री. देशमाने साहेब यांनी मनोगत व्यक्त करून सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच शा. व्यवस्थापक श्री. गोपाल सावळे यांनी पत्रकार दिनानिमित्त उपस्थित राहून संस्थेच्या वतीने सत्कार स्वीकारल्याबद्दल आभार प्रदर्शन केले.
सदर कार्यक्रमासाठी मा. समदभाई (अध्यक्ष लोणार पत्रकार संघ),श्री. प्रमोद वराडे (कार्याध्यक्ष प्रतिनिधी),डॉ.अनिल मापारी(प्रमुख मार्गदर्शक),श्री.संदिपभाऊ मापारी(उपाध्यक्ष),श्री.पवनकुमार शर्मा(सचिव),श्री.राहुलजी सरदार(प्रवक्ते),किशोर मोरे(कोषाध्यक्ष), श्री.अशोक इंगळे श्री.गोपालजी तोष्णवाल, श्री. अविनाशजी शुक्ला,श्री.उमेश पटोकार,श्री.सचिन गोलेच्छा,श्री.शामभाऊ सोनुने,श्री प्रणव वराडे यावेळी उपस्थित होते.

Tuesday, 4 January 2022

पोलिस स्थापना दिनानिमित्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार

 पोलिस स्थापना दिनानिमित्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार






लोणार (प्रणव वराडे)
पोलिस स्थापना दिनानिमित्त लोणार येथील प्रतिष्ठित नागरिक शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाशराव मापारी सागर शिरसाट विठ्ठल मापारी गौतम मोरे यांनी लोणार पोलीस स्टेशन मधील कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात आला जनतेसाठी जिवाची पर्वा न करता अहोरात्र झटणाऱ्या पोलीस बांधवांचा सन्मान व्हावा हा दृष्टिकोन समोर ठेवून  वतीने  पोलीस  स्थापना दिनानिमित्त लोणार पोलिस स्टेशनचेवरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर,साहाय्यक पोलीस निरीक्षक शरद आहेर,पोलीस उपनिरीक्षक सुरज काळे,सहायक पोलिस उपनिरीक्षक बन्शी पवार,लेखनिक चंद्रशेखर मुरुडकर पोलीस कॉन्स्टेबल गजानन धोंडगे,रामकिशन गीते,अरुण खनपटे,रतन वाणी, रोहिदास जाधव,कृष्णा निकम,ज्ञानेश्वर निकम, चंद्रशेखर मुरुडकर, जालिंदर मुंडे,गजानन डोईफोडे,सर्जेराव तवर जगदीश सानप,तेजराव भोकरे,राहुल कायंदे गोपनीय विभागाचे संतोष चव्हाण,विठ्ठल चव्हाण,संतोष चव्हाण, रवींद्र बोरे,चालक हरीभाऊ ढाकणे गजानन ठाकरे पोलीस बांधवांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली   यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक तथा शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाशराव मापारी शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग सरकटे माजी शहर प्रमुखअशोक वारे उपस्थित होते

Monday, 3 January 2022

कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्री गोविंद दळवी यांचे व्याखान

 कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्री गोविंद दळवी यांचे व्याखान







( लोणार - प्रणव वराडे )
कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्री गोविंद दळवी यांचे व्याखान स्थानिक कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालय, लोणार येथे राष्ट्रीय सेवा योजना वतीने “महाराष्ट्र शासनाच्या जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राचे लेकीचा” या अभियानांतर्गत ३ जानेवारी २०२२ वार सोमवार रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयांमध्ये “सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य व आजच्या युगातील स्त्री” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क.बनमेरू हे होते तर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. गोविंद दळवी, उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य तर प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. विजय नागरे, प्राचार्य, नारायणराव नागरे महाविद्यालय दुसरबीड हे होते. या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने तसेच विद्यापीठ गीताने करण्यात केली तसेच मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमधिकारी डॉ. सुर्यकांत बोरुळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक थोडक्यात स्पष्ट केले. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री गोविंद दळवी सर यांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य व आजच्या युगातील स्त्री या विषयावर आपले विचार मांडले, सावित्रीबाई फुले यांनी समाजाच्या विरोधाला न जुमानता स्त्री शिक्षणासाठी, महात्मा फुले यांच्या सोबतीने तन-मन-धनाने स्त्रियांना शिकवण्याचा वसा उचलला व स्त्री शिक्षण चालू ठेवले आज स्त्रिया उच्चपदस्थांनी कार्यरत आहे हे यातून आपणास दिसून येते. कोणत्याही समाजाची उन्नती व्हायची असेल तर प्रथम स्त्री साक्षर झाली. शिक्षणाने माणूस हुशार होतो, हुशार माणूस विचार करतो, विचार करणारा माणूस कुणाचाही गुलाम होत नाही अशी कल्पना त्यांची होती असे ते म्हणाले.
त्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले प्राचार्य डॉ.नागरे सर यांनी यांच्या जीवनावरील काही दाखले दिले संपूर्णपुणे आपले समाजकार्यासाठी देऊन प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी अनाथ दीनदुबळ्या रोग्यांची सतत सेवा केली सेवा करता करता त्यांना प्लीज च्या साथीने मृत्यू आला. आपणासाठी कोरोणाकाळामध्ये आदर्श घेण्यासारखे आहे.
अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू सर यांनी सावित्रीबाई फुले यांनी सर्व तत्कालीन समाजबंधने  झुगारून कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निरंतर स्त्री शिक्षण चालूच ठेवले तसेच सती जाण्याच्या प्रथेला त्यांनी विरोध केला असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.महेंद्र भिसे तर आभार प्रदर्शन प्रा.शिवशंकर मोरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी मा. श्री निलेश जाधव, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी   तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी, परीसरतील नागरिक , प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ

  डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ लोणार - प्रणव वराडे उपमुख्यमंत्री कार्यालय ...