कै. कू दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालयात "राष्ट्रीय मतदार दिवस" साजरा
लोणार (प्रणव वराडे)
स्थानिक लोणार येथील कै. कू दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय लोणार येथे दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने “राष्ट्रीय मतदार दिवस” साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी मा. सैपन नदाफ साहेब तहसीलदार लोणार, मा. श्री अशोक बोरे साहेब निवडणूक विभाग, तहसील कार्यालय लोणार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मतदार दिवसानिमित्त प्रतिज्ञा घेतली.यानंतर मध्ये महाविद्यालयाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे, अध्यक्षांचे स्वागत करण्यात आले. आपल्या प्रास्ताविकामध्ये रासेयो कार्यक्रमधिकारी डॉ. सुर्यकांत बोरुळ यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा तसेच दत्तक गाव पिंपळनेर येथे घेण्यात आलेली मतदार जनजागृती रॅली व नवीन मतदार नोंदणी अभियान, इत्यादी कार्यक्रमाची माहिती प्रमुख पाहुणे व विद्यार्थी यांना दिली. मा. तहसीलदार सैपन नदाफ साहेब यांनी महाविद्यालयाने केलेल्या मतदान जनजागृती, नवीन मतदार नोंदणी कार्याचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू यांनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला मजबूत व बळकट करण्यासाठी सर्वांनी आपण घेतलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे कोणत्याही आमिषाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता आपले मतदान कार्य नि:पक्षपाती केले पाहिजे यासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.तसेच राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये प्रश्नमंजुषा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सूर्यकांत बोरूळ तर आभार प्रदर्शन प्रा. शिवशंकर मोरे यांनी केले यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते.
No comments:
Post a Comment