कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व्याखान
स्थानिक कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालय, लोणार येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने “महाराष्ट्र शासनाच्या जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राचे लेकीचा” या अभियानांतर्गत १२ जानेवारी २०२२ वार बुधवार रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. “राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार” या विषयावर व्याख्यानाचे ऑनलाईन आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू, कार्यक्रमाचे उदघाटक संस्थेचे सचिव डॉ. संतोष क. बनमेरू हे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. डॉ. श्रीहरी र. पितळे, इतिहास विभाग प्रमुख, स्व. पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, रिसोड जि. वाशिम हे होते. या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात केली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.राष्ट्रीय सेवा योजना, कार्यक्रमधिकारी तसेच कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. सुर्यकांत बोरुळ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक माननीय डॉ. श्रीहरी र. पितळे सर यांनी “राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार” विषयावर मार्गदर्शन केले यामध्ये त्यांनी राजमाता, वीरमाता, मासाहेब जिजाऊ यांचा आदर्श सर्व माता भगिनींनी आत्मसात करावा तर स्वामी विवेकानंद हे युवकांचे प्रेरणास्थान आहे यांचे विचार हेच येणाऱ्या युगाला तारणार आहे. अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. हे स्वामी विवेकानंदांचे विचार त्यांनी विद्यार्थ्यासमोर मांडले.यावेळी गणित दिवसानिमित्त संपन्न झालेल्या Poster Presentation स्पर्धेचा निकाल प्रा. सौरभ गायकवाड यांनी जाहीर केला. यामध्ये प्रथम क्र. कु. निकिता रुणवाल, व्दितीय क्र. कु. मनिषा खरात व तृतीय क्र. कु. शुभांगी सुरुशे यांनी मिळवला. अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू सर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या व या सर्व थोर महामानवांचे विचार आपण आत्मसात करावे असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना, कार्यक्रमधिकारी डॉ. सुर्यकांत बोरुळ तर आभार प्रदर्शन प्रा.शिवशंकर मोरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने रासेयो स्वंयसेवक विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment