बनमेरू विज्ञान महाविद्यालयाची अजंता फार्मा व हाॅटेल सफ्राॅनला भेट
लोणार (प्रणव वराडे)
स्थानिक लोणार येथील कै.कु.दुर्गा क.बनमेरू विज्ञान महाविद्यालय लोणार येथील महाविद्यालयाची महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रकाश क.बनमेरू सर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.५ मार्च रोज शनिवारला सहलीचे आयोजन करण्यात आले .यासाठी महाविद्यालयातील प्रा.शिवशंकर मोरे यांनी सदर सहलसोबत गेले. महाविद्यालयांमध्ये चालत असलेल्या बॅचलर ऑफ व्होकेशनल मध्ये असलेल्या "टुरिझम ॲन्ड हाॅसपिट्यालिटी " या अंतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांमध्ये विविध हॉटेलला भेटी देणे व तसेच ग्राहकांना कोणकोणत्या सुविधा पुरवाव्या लागतात या बाबतची सखोल माहिती घेण्यासाठी अभ्यासक्रमांमध्ये हॉटेल भेटी व इंडस्ट्रीयल भेटी द्याव्या लागतात. तसेच सोबत रसायन शास्त्र विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध केमिकल इंडस्ट्रीज मध्ये केमिकल तयार करणे, विविध गोळ्या कशा तयार त्यामध्ये कोणता कच्चामाल वापरला जातो अशा विविध विविध प्रश्नांची माहिती घेण्यासाठी सदर टूरचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी महाविद्यालयाने साफरोन होटेल जालना येथे विद्यार्थ्यांच्या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. हॉटेल सॅफ्रॉन येथील हॉटेलचे मॅनेजर श्री.वाघ सरांनी विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये ग्राहकाच्या आगमनापासून ते निघण्या पर्यंत कोण कोणत्या सुविधा पुरवल्या लागतात याबद्दल याबद्दल सखोल अशी माहिती सांगितली व सर्व हॉटेल विद्यार्थ्यांना दाखवली तसेच हॉटेलमध्ये विविध रूम किचन फंक्शन हॉल, पार्टीवेअर इ. तत्सम माहिती दिली. त्यानंतर औरंगाबाद येथील चितेगाव येथे असलेल्या अजंठा फार्मासिटिकल कंपनीला भेट दिली या भेटीदरम्यान कंपनीचे ब्रंच हेड मॅनेजर मा.श्री.ओंकार जोशी,तसेच श्री संदीप सर सरांनी सर्व विद्यार्थ्यांना अजंता फार्मा बद्दल पावर पॉइंट प्रेझेंटेशन दाखवून प्रत्यक्ष कंपनी मध्ये कोणकोणते विभाग असतात व या विभागांतर्गत कंपनीचे कार्य कसे चालते यामध्ये क्वाॅलिटी अशी रन्स क्वाॅलिटी कंट्रोल प्रोडक्शन आधी विभागाची सखोल अशी माहिती दिली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना कॉन्फरन्स हॉल मध्ये बसवून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. यासाठी कंपनीचे मॅनेजर मा.श्री.आशुतोष भालेराव सर यांनी भेटीसाठी अनमोल असे सहकार्य केले. महाविद्यालयातील प्रा.शिवशंकर मोरे यांनी कंपनीतील सर्व माहिती देणाऱ्या स्टाफचे महाविद्यालय मार्फत आभार व्यक्त केले व यापुढेही आपण असेच सहकार्य करावे अशी आशा व्यक्त केली. यासाठी महाविद्यालयातील श्री.किरण काळे यांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment