कै. कु. दुर्गा क.बनमेरू विज्ञान महाविद्यालय लोणार येथे सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी
लोणार (प्रणव वराडे)स्थानिक लोणार येथील कै. कु. दुर्गा क.बनमेरू विज्ञान महाविद्यालय लोणार येथे राष्ट्रीय सेवा योजना च्यावतीने आज दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क बनमेरू यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमृत सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतोष क बनमेरू हे होते सर्वप्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सूर्यकांत बोरूळ यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले व कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये थोर महापुरुषांचे आचार-विचार जनमानसात रुजावे व त्यांच्या कार्याचे स्मरण असावे यासाठी आपण अशा कार्यक्रमाचे आयोजन करत असतो हे स्पष्ट केले. आपल्या मार्गदर्शनात डॉ.संतोष क. बनमेरू यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या कार्यावर प्रकाश टाकला त्यांनी केलेले कार्य किती महान आहे हे उदाहरणासह सांगितले यानंतर राष्ट्रीय सेवा योजना सह कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक शिवशंकर मोरे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.यावेळी महविद्यायतील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, व रासेयो स्वयंसेवक उपस्थित
No comments:
Post a Comment