Friday, 7 January 2022

कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालयात पत्रकार दिन साजरा

 

कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालयात पत्रकार दिन साजरा

लोणार - (प्रणव वराडे) 

स्थानिक कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालय, लोणार येथे राष्ट्रीय सेवा योजना वतीने दि. ६ जानेवारी २०२२ वार गुरुवार रोजी “पत्रकार दिन” साजरा करण्यात आला. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो यासाठी महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू हे तर प्रमुख अतिथी म्हणून लोणार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मा. शेख शमद शेख अहमद व सचिव मा. पवन शर्मा व कार्यक्रमधिकारी डॉ. सुर्यकांत बोरुळ हे मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क.बनमेरू यांच्या हस्ते मान्यवर लोणार शहर व ग्रामीण भागातील सर्व पत्रकार बंधुंचे स्वागत करण्यात आले. यावेळी पत्रकार बंधू मधील मा. उमेश पटोकार व मा. राहुल सरदार यांनी पत्रकारिता किती कठीण आहे चित्र विशद केले तसेच पूर्वीच्या काळातील पत्रकारांना आय टी साधणाचा अभावामुळे अपार कष्ट घ्यावे लागतअसे, परंतु आता कॉम्पुटर युगात व स्मार्ट मोबाईल काळात हे थोडे सोपे झाले आहे. असे संगितले. यानंतर प्रमुख अतिथी, लोणार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मा. शेख शमद शेख अहमद यांनी आपले विचार व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू यांनी माहिती प्रसारणाच्या माध्यमामुळे पत्रकारितेला वेग आला आहे. कारण त्यामुळे सामान्य जनतेच्या भावना ह्या लोक प्रशासनापर्यंत सहजतेने पोहोचतात व त्यांच्या अडचणी सोडविण्याची एक उत्तम साधन म्हणजे पत्रकारिता होय असे संगितले व सर्व पत्रकार बंधूंचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी लोणार शहरातील तसेच ग्रामीण भागातील सर्व पत्रकार बंधूंना आमंत्रित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी सर्व पत्रकार उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना, सहकार्यक्रमधिकारी प्रा. शिवशंकर मोरे व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना, कार्यक्रमधिकारी डॉ. सुर्यकांत बोरुळ केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment

डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ

  डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ लोणार - प्रणव वराडे उपमुख्यमंत्री कार्यालय ...