Monday, 3 January 2022

कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्री गोविंद दळवी यांचे व्याखान

 कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्री गोविंद दळवी यांचे व्याखान







( लोणार - प्रणव वराडे )
कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्री गोविंद दळवी यांचे व्याखान स्थानिक कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालय, लोणार येथे राष्ट्रीय सेवा योजना वतीने “महाराष्ट्र शासनाच्या जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राचे लेकीचा” या अभियानांतर्गत ३ जानेवारी २०२२ वार सोमवार रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयांमध्ये “सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य व आजच्या युगातील स्त्री” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क.बनमेरू हे होते तर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. गोविंद दळवी, उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य तर प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. विजय नागरे, प्राचार्य, नारायणराव नागरे महाविद्यालय दुसरबीड हे होते. या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने तसेच विद्यापीठ गीताने करण्यात केली तसेच मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमधिकारी डॉ. सुर्यकांत बोरुळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक थोडक्यात स्पष्ट केले. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री गोविंद दळवी सर यांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य व आजच्या युगातील स्त्री या विषयावर आपले विचार मांडले, सावित्रीबाई फुले यांनी समाजाच्या विरोधाला न जुमानता स्त्री शिक्षणासाठी, महात्मा फुले यांच्या सोबतीने तन-मन-धनाने स्त्रियांना शिकवण्याचा वसा उचलला व स्त्री शिक्षण चालू ठेवले आज स्त्रिया उच्चपदस्थांनी कार्यरत आहे हे यातून आपणास दिसून येते. कोणत्याही समाजाची उन्नती व्हायची असेल तर प्रथम स्त्री साक्षर झाली. शिक्षणाने माणूस हुशार होतो, हुशार माणूस विचार करतो, विचार करणारा माणूस कुणाचाही गुलाम होत नाही अशी कल्पना त्यांची होती असे ते म्हणाले.
त्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले प्राचार्य डॉ.नागरे सर यांनी यांच्या जीवनावरील काही दाखले दिले संपूर्णपुणे आपले समाजकार्यासाठी देऊन प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी अनाथ दीनदुबळ्या रोग्यांची सतत सेवा केली सेवा करता करता त्यांना प्लीज च्या साथीने मृत्यू आला. आपणासाठी कोरोणाकाळामध्ये आदर्श घेण्यासारखे आहे.
अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू सर यांनी सावित्रीबाई फुले यांनी सर्व तत्कालीन समाजबंधने  झुगारून कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निरंतर स्त्री शिक्षण चालूच ठेवले तसेच सती जाण्याच्या प्रथेला त्यांनी विरोध केला असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.महेंद्र भिसे तर आभार प्रदर्शन प्रा.शिवशंकर मोरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी मा. श्री निलेश जाधव, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी   तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी, परीसरतील नागरिक , प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ

  डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ लोणार - प्रणव वराडे उपमुख्यमंत्री कार्यालय ...