अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्याच्या विभागीय अध्यक्षपदी भारत रामराव राठोड यांची निवड
लोणार (प्रणव वराडे)
अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य विदर्भ विभाग प्रवक्ते फार्मासिस्ट भारत रामराव राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे,
फार्मासिस्ट क्षेत्रांमधील फार्मासिस्ट वर होणार अन्याय दूर व्हावा व त्यांना न्याय कसा मिळवता येईल यासाठी त्यांनी विदर्भ विभागातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची धडपड चालू होती व करोना काळामध्ये सामाजिक बांधिलकी जपत यांनी आपले कर्तव्य बजावले आहे त्यांचे हे कार्य बघून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा.दत्ता खराटे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ.पंकज चौधरी,प्रदेश सचिव रोहित वाघ यांच्या शिफारशीनुसार व सर्वांच्या एकमताने करण्यात आली त्यांची ही निवड करण्यात आली आहे.ही निवड होताच त्यांच्यावर विविध शैक्षणिक,अध्यात्मिक व राजकीय क्षेत्रामधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत, विदर्भ विभाग प्रमुख फार्मासिस्ट योगेश मुंडे विदर्भ विभाग उपाध्यक्ष रवि राठोड राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर पायघन प्रदेश कार्याध्यक्ष नासीर पठाण प्रदेश कोषाध्यक्ष राम घोटकर प्रदेश सहसचिव महादेव मुंडे प्रदेश प्रवक्ते हनुमान गरुड प्रवक्ते बाळ राहुल पारखे खानदेश विभाग अध्यक्ष प्राध्यापक सुशील महाराज राज्य कार्यकारिणी सदस्य मुंबई विभाग अध्यक्ष हर्षराज आहिरे यांनी पण त्यांचे कौतुक केले आहे येणाऱ्या काळामध्ये विदर्भ विभागाच्या नाहीतर पूर्ण महाराष्ट्र मध्ये फार्मासिस्टच्या येणार्या विविध अडचणी फार्मासिस्ट भारत रामराव राठोड हे सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष दत्ता खराटे,प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर पंकज चौधरी व सचिव रोहित वाघ प्रदेश सहसचिव महादेव मुंडे प्रदेश कार्याध्यक्ष नासीर पठाण राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर पायघन व सोशल मीडिया प्रमुख प्रा. अविनाश ढोबळे यांनी व्यक्त केला आहे
अभिनंदन
ReplyDelete