Wednesday, 9 February 2022

नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावल्या बद्दल टिटवी येथील श्रावण जाधव चा सत्कार


 नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावल्या बद्दल टिटवी येथील श्रावण जाधव चा सत्कार

लोणार - प्रणव वराडे

लोणार तालुक्यातील टिटवी येथील श्रावण जाधव हा बिकट परिस्थितीवर मात करून गोवा येथे झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये दुस-या क्रमांकाच्या रौप्य पदकाचा मानकरी ठरला. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. श्रावण भिकाजी जाधव हा भूमिहीन शेतमजूर कुटूंबातील विद्यार्थी असून लहानपणीच त्यांचे पितृछत्र हरवल्याने अत्यंत गरिब परिस्थितीत शिक्षण घेत आहे. घरात आईच मोलमजुरी करून प्रपंच सांभाळते. तो बी. कॉमचा विद्यार्थी आहे. त्याला खेळाची सुध्दा आवड आहे. नुकत्याच गोवा येथे झालेल्या नॅशनल चॅम्पियन शिप १०० मिटर धावण्याच्या स्पर्धेत त्याने दुस-या क्रमांकाचे रौप्य पदक पटकावले असून इन्टरनॅशनल स्पर्धेसाठी जम्मू येथे होणाऱ्या निवड चाचणीसाठी जावे लागणार आहे. टिटवी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच भगवानराव कोकाटे यांनी श्रावण जाधवचा सत्कार करुन १ हजार ५०० रुपये आर्थिक मदत केली असल्याची माहिती ७ फेब्रुवारी रोजी देण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर डोळे, एकनाथ घाटे, बबन कोकाटे, भगवान नामदेव कोकाटे, फकिरा तनपुरे,गेंदु राऊत,विशाल राऊत, संतोष राऊत,राम तनपुरे व ग्रामस्थ उपस्थित होते

No comments:

Post a Comment

डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ

  डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ लोणार - प्रणव वराडे उपमुख्यमंत्री कार्यालय ...