Friday, 12 August 2022

कै. कू.दुर्गा क.बनमेरू विज्ञान महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ 2022सोहळा संपन्न

 



कै. कू.दुर्गा क.बनमेरू विज्ञान महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ 2022सोहळा संपन्न 

लोणार - प्रणव वराडे 

स्थानिक, लोणार येथील बनमेरू महाविद्यालयात तिसरे पदवी दान समारंभ सोहळ्याचे आयोजन, दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश बंनमेरू सर हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गणेशजी परिहार सर, प्राचार्य एम. इ. एस. कला व वाणिज्य महाविद्यालय मेहकर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात ही विद्यापीठ गीताने करण्यात आली या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. कमलाकर वाव्हल सरांनी भारतामधील शिक्षण प्रणालीची निर्मिती कशाप्रकारे करण्यात आली व उच्च शिक्षणाचे महत्त्व देशासाठी किती महत्त्वाचे आहे असे विद्यार्थ्यांना सांगून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या प्राचार्य डॉ. गणेशजी परिहार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःपुरता न ठेवता समाजासाठी त्याचा उपयोग होईल याची काळजी सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावी तसेच ज्या गोष्टी आपण अनुभवातून शिकतो त्या गोष्टींना आपण कधीच विसरत नाही असे विद्यार्थ्यांना आई व बाळाचे उदाहरण देऊन पटवून सांगितले. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दाशेतच आपल्या जास्तीत जास्त पदवी ग्रहण करून समाजामध्ये आपले नाव लौकिक करावे व पुढील भविष्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात महाविद्यालयातील  26 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच हर घर तिरंगा या योजनेअंतर्गत महाविद्यालयातर्फे प्रत्येक विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना तिरंग्याचे वाटप करण्यात आले. महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनी कु. अभिश्री मोरे या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगता मधुन  महाविद्यालयातील जुन्या आठवणी, शिकवण्याची पद्धत व सर्वांचे सहकार्य कसे लाभले असे तिने सर्वांना सांगितले.  हनुमान ताठे या विद्यार्थ्याने आपल्या मनोगतुन महाविद्यालयातून होणाऱ्या स्वतःच्या जडण घडणी बद्दल कसे सर्वांनी मार्गदर्शन केले याबद्दल आपले विचार सर्वांना सांगितले. कु. सिद्धि बनमेरू या विद्यार्थिनींनी महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्याला कसे सांभाळून घेतले व तसेच मा. डॉक्टर प्रकाश बनमेरू सरांनी हे महाविद्यालय उघडून विद्यार्थिनी साठी एक सामाजिक कार्य केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू सरांनी मान्यवरांचे आभार व्यक्त करत विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील पदवी घेतल्यानंतर एक चांगले नावलौकिक कमावे व देशाच्या पायाभरणीत हातभार लावावा तसेच आपल्या महाविद्यालयाचे नाव उच्च पातळीवर न्यावे अशी अपेक्षा त्यांनी विद्यार्थ्याकडून व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कमलाकर वाहल सरांनी केले तर प्रा. सौरभ गायकवाड सर यांनी आभार व्यक्त केले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ

  डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ लोणार - प्रणव वराडे उपमुख्यमंत्री कार्यालय ...