राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने लोणार तहसिलदारांना निवेदन
लोणार/सतीश मुलंगे
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने लोणार तहसिलदारांना निवेदन, राज्यात अनेक ठिकाणी पत्रकार बांधवांवर प्राणघातक हल्ले झाले आहे.संघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष सतीश भालेराव व यवतमाळ जिल्ह्य़ातील पत्रकारांवर देखील प्राणघातक हल्ला झाला आहे. गुन्हेगारांवर पत्रकार अधिनियमाच्या अंतर्गत कडक कारवाई करावी व पत्रकारांच्या विविध समस्या संदर्भात केलेल्या मागण्या पूर्ण कराव्या यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम सर यांच्या नेतृत्वाखाली वार सोमवार दिनांक 24 जानेवारी 2022 रोजी पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना तहसीलच्या मार्फत निवेदन देण्यात आले,यावेळी जिल्हाध्यक्ष शेख सज्जाद,जिल्हा उपाध्यक्ष लुकमान कुरेशी, तालुका अध्यक्ष उध्दव आटोळे,शहराध्यक्ष भुषण शेटे,विजय मापारी,मयूर सरकटे,प्रमेश्वर मापारी, गणेश कुटे,सालार पठाण,जगन मोरे,सतिष मुलंगे,विजय महाजन व इतर पत्रकार बांधव उपस्थित होते....
पत्रकारांवर हल्ला केल्यास काय होऊ शकते याचे हे एक उदाहरण... आजच्या राज्यव्यापी निवेदनातून लक्षात आले असेलच....
ReplyDelete