पत्रकार दिनानिमित्त बुलढाणा अर्बन तर्फे सत्कार
लोणार (प्रणव वराडे)
दि. 6 जानेवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून लोणार येथील अध्यक्ष.मा.भाईजी चिफ मॅनेजिंग डायरेक्टर मा. सुकेशजी झंवर साहेब यांचे मार्गदर्शनानुसार विभागीय व्यवस्थापक मा.देशमाने साहेब यांनी पत्रकारांचा पुष्पगुच्छ व पत्रकारितेची ओळख म्हणून असलेली लेखणी पेन तसेच चहापान व फराळ देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी शाखा लोणार येथे सर्वप्रथम आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून लोणार पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मा. समदभाई, लोणार पत्रकार संघांचे मार्गदर्शक डॉ.श्री.अनिलभाऊ मापारी, उपाध्यक्ष श्री. संदिपभाऊ मापारी, सचिव श्री. पवनकुमार शर्मा, लोणार पत्रकार संघटनेचे श्री.राहुलजी सरदार तसेच लोणार पत्रकार संघटनेचे सर्व सदस्य यांचा यथोचित सत्कार केला.
सदर कार्यक्रमाच्या वेळी श्री.राहुलजी सरदार,श्री. गजाननजी रिंढे,श्री. शामभाऊ सोनुने.श्री. सुनिलभाऊ पटोकार यांनी मनोगत व्यक्त करून मा.भाईजी, मा. सुकेशजी झंवर साहेब यांचे करीत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल आभार मानले.
मा. विभागीय व्यवस्थापक श्री. देशमाने साहेब यांनी मनोगत व्यक्त करून सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच शा. व्यवस्थापक श्री. गोपाल सावळे यांनी पत्रकार दिनानिमित्त उपस्थित राहून संस्थेच्या वतीने सत्कार स्वीकारल्याबद्दल आभार प्रदर्शन केले.
सदर कार्यक्रमासाठी मा. समदभाई (अध्यक्ष लोणार पत्रकार संघ),श्री. प्रमोद वराडे (कार्याध्यक्ष प्रतिनिधी),डॉ.अनिल मापारी(प्रमुख मार्गदर्शक),श्री.संदिपभाऊ मापारी(उपाध्यक्ष),श्री.पवनकुमार शर्मा(सचिव),श्री.राहुलजी सरदार(प्रवक्ते),किशोर मोरे(कोषाध्यक्ष), श्री.अशोक इंगळे श्री.गोपालजी तोष्णवाल, श्री. अविनाशजी शुक्ला,श्री.उमेश पटोकार,श्री.सचिन गोलेच्छा,श्री.शामभाऊ सोनुने,श्री प्रणव वराडे यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment