अनुसूचीत जमातीच्या जिल्हा परिषद सदस्य संख्या वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन
जिल्हा परीषद, पंचायत समिती मधिल अनुसूचीत जमातीच्या लोकप्रतिनीधीच्या सदस्य संख्या वाढविण्याचा निर्णय राज्यमंत्री मंडळाच्या बैठकित घेण्यात आलेला आहे. तसेच लोकसंख्येच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाच्या अंतिम मंजुरीने सदस्य संख्या निश्चीत करण्यात येणार आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्हयातील आदिवासी समाजाची लोकसंख्या पाहता आजपर्यंत सदस्य संख्येत अन्याय झाल्याचे दिसून येत आहे. राज्य मंत्रीमंडळात सदस्य संख्या वाढीचा निर्णय झाला असल्यामुळे बुलडाणा जिल्हयातील अनुसूचीत जमातीच्या लोकसंख्येचा विचार करून सदस्य लोकप्रतिनीधीच्या सदस्य संख्या वाढविण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हा परिषद सदस्या सौ. गोदावरीताई कोकाटे, आदिवासी विकास प्रकल्प समितीच्या अध्यक्षा नंदिनीताई टारपे, नियोजन समितीचे सदस्य भगवानराव कोकाटे यांनी १८ जानेवारी रोजी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गौरी सावंत यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले असल्याची माहिती २० जानेवारी रोजी देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment