मोका पाहणी झालेल्या रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावावेस्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष संजय चाटे यांची मागणी
लोणार - (प्रणव वराडे)
लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे येथील अडवलेल्या शेतरस्त्याची मागील वर्षी मोका पाहणी झाली आहे. तरी सदर रस्ता लवकरात लवकर खुला करून द्यावा. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक आघाडी तालुकाध्यक्ष संजय चाटे यांनी तहसिलदारांना निवेदन दिले आहे. चिंचोली सांगळे येथील गट नंबर ३१८ ते गट नंबर २७० पर्यंतचा संपूर्ण रस्ता काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेला आहे या दोन्ही गटांमधुन जाणारा शेत रस्ता नकाशाप्रमाणे सरकारी आहे. सदर रस्त्यावरून किमान ५० ते ७० शेतकऱ्यांना ये-जा करावी लागते. रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे शेतामध्ये जनावरे, बैलगाडी, खते बी-बियाणे व इतर शेती संबंधी अवजारे नेण्यास शेतकऱ्यांना फार तारेवरची कसरत करावी लागते, तरी सदर रस्त्याची मागील वर्षी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून पाहणी झालेली आहे, तरी यावर्षी सदर रस्ता मोकळा करून सदर रस्त्याचे पांदन रस्ता योजनेमध्ये समावेश करून रस्ता करून द्यावा ही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक आघाडी तालुकाध्यक्ष संजय चाटे यांनी दि. ०८ फेब्रुवारी निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती आज देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment