बनमेरू महाविद्यालयात शिवजन्मोत्सव साजरा
लोणार - (प्रणव वराडे)स्थानिक लोणार येथील कै. कु. दुर्गा क.बनमेरू विज्ञान महाविद्यालय व कै.कमलाबाई महिला महाविद्यालय लोणार येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी महाविद्यालयात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन अमृत सेवाभावी संस्था सचिव डॉ. संतोष बनमेरू व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.सुर्यकांत बोरुळ यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ.संतोष बनमेरू यांनी आपल्या भाषणात सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराजांच्या विचारांची खास गरज आहे, तसेच त्यांनी दिलेली एकात्मतेची शिकवण व सर्व धर्म समभाव ही आता काळाची गरज आहे असे विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क.बनमेरू यांच्या मार्गदर्शनात रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.सुर्यकांत बोरुळ यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment