तांबोळा येथील शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या.
लोणार तालुक्यातील तांबोळा येथील रहिवासी उत्तम धोंडू चव्हाण शेतकऱ्यांनी सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्रशांन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस झाली आहे.यबाबत सविस्तर असे की उत्तम धोंडू चव्हाण हे तांबोळा येथील अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे अंदाजे पाच एकर कोरडवाहू शेती असुन शेती ही पावसाच्या भरोशावर असून पावसाच्या लहरीपणामुळे पुन्हा एका शेतकन्याला आत्महत्या करून आपली जिवन यात्रा संपवली. 20 ऑगस्ट २०२२ रोजी उत्तम चव्हाण शेतकरी यांनी विष प्राशन केल्याचे उघडकीस आले तात्काळ ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बुलढाणा रुग्णालयात हलविण्यात आले येथून अकोला येथे सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचार दरम्यान 23 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे चार वाजेच्च सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व चार मुली असा आप्त परिवार आहे. उत्तम चव्हाण यांच्या मृत्युनंतर गावात व परिसरातः हळहळ व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment