बनमेरू विज्ञान महाविद्यालय, लोणार राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे दत्तकग्राम पिंपळनेर उघाटन.
लोणार - ( प्रणव वराडे )
कै.कु. दुर्गा क.बनमेरू विज्ञान महाविद्यालय लोणार राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरा ची सुरवात दिनांक 22 मार्च 2022 रोजी दत्तक ग्राम पिंपळनेर झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू, उद्घाटक तसेच प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा डॉ. विष्णू पडवाल सर, व श्री संजय सानप सरपंच ग्रामपंचायत पिंपळनेर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यापीठ गीताने व महामानवांच्या प्रतिमा पूजनाने झाली त्यानंतर प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या नंतर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.सूर्यकांत बोरूळ यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये विशेष श्रम शिबिराचे महत्व, उद्देश व शिबिराची रूपरेषा स्पष्ट केला. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. विष्णू पडवाल यांनी विद्यार्थ्यांसाठी श्रम शिबीर ही आयुष्य जगण्याची एक नवीन पर्वणी आहे असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट केले तसेच शिबिराच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ.प्रकाश बनमेरू यांनी विद्यार्थ्यांनी या शिबिरांमधून आयुष्य जगण्याची कला अवगत करावी असे सांगितले.दिनांक 22 मार्च जागतिक जलदिनानिमित्त शिबिरामध्ये "जल है तो कल है" यावर आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पिंपळनेर नगरीचे सरपंच मा. संजय सानप, तसेच गावातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवशंकर मोरे सहकार्यक्रमाधिकारी रासेयो यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. कमलाकर वाव्हाल यांनी केले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment