Monday, 10 January 2022

कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालयात मुलींसाठी आत्मनिर्भरता शिबीर संपन्न

 



कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालयात मुलींसाठी आत्मनिर्भरता शिबीर संपन्न  

लोणार - (प्रणव वराडे)

स्थानिक कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालय, लोणार जि. बुलढाणा येथे राष्ट्रीय सेवा योजना वतीने दि. ६ जानेवारी २०२२ वार गुरुवार रोजी दुपारी १.३०pm वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. प्रकाश क. बनमेरू यांच्या मार्गदर्शनात “मुलींसाठी आत्मनिर्भरता” शिबीराचे आयोजन करण्यात आले. सर्व प्रथम राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमधिकारी यांनी प्रशिक्षक श्री. प्रशांत रामावत यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत केले व शिबिरार्थीना त्यांचा परिचय करून दिला. आजही मुलीवर बलात्कार, लैंगिक शोषणाच्या घटना मोठ्याप्रमाणात कानावर पडतात, त्यामुळे स्वसंरक्षणसाठी मुलीनी आता प्रशिक्षण किंवा आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. त्यामुळे मुलींनी आता हतबल न होता अन्यायाच्या विरोधात पुढे येण्याची गरज आहे. हाच संदेश देण्यासाठी महाविद्यालयात महिला हिंसाचार विरोधी अभियान हाती घेण्यात आले. यासाठी महाविद्यालयात “मुलींसाठी आत्मनिर्भरता” शिबीराचे आयोजन प्राचार्य मा. डॉ. प्रकाश क. बनमेरू यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले असे शिबिराविषयी माहिती देतांना डॉ. सुर्यकांत बोरुळ यांनी सांगितले. यामध्ये महाविद्यालयातील बि. एस्सी. प्रथम, व्दितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या. श्री. प्रशांत रामावत यांनी महाविद्यालयातील सहकारी विद्यार्थी लक्ष्मन भंगार याच्या सहाय्याने स्वसंरक्षणाचे विविध प्रात्यक्षिके दाखविली.  सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना, सहकार्यक्रमधिकारी प्रा. शिवशंकर मोरे महाविद्यालयातील व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment

डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ

  डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ लोणार - प्रणव वराडे उपमुख्यमंत्री कार्यालय ...