Monday, 14 December 2020

गणेश प्रकाश मापारी यांनी केली गरजू व्यक्ती ला मदत

 

गणेश प्रकाश मापारी यांनी केली गरजू व्यक्ती ला मदत



लोणार 14/12/2020 (प्रणव वराडे)

लोणार येथील छत्रपती शिवराय प्रतिष्ठान मधील युवा नेतृत्व गणेश प्रकाश मापारी हे त्यांच्या कामावरून रात्री च्या सुमारास घरी जात असताना त्यांना एक वृद्ध व्यक्ती रस्त्यावर कडाक्याच्या थंडीत कुडकडत दिसताच त्यांनी स्वतःचे श्वेटर काढून त्या वृद्ध व्यक्ती ला देऊन त्यांना मदत केली येवढेच नाही तर त्यांना भूक लागली असे समजताच त्यांना खाण्यासाठी अन्न व पाण्याची व्यवस्था करून दिली अश्याच प्रकारची मदत या छत्रपती शिवराय प्रतिष्ठान  च्यां माध्यमातून  या पुढे होत राहील असे या वेळी त्यांनी सांगितले व हे छत्रपती शिवराय प्रतिष्ठान लोणार यांच्या वतीने गरजू लोकांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर राहील असे  छत्रपती शिवराय प्रतिष्ठान  चे अध्यक्ष श्री बंडू दादा मापारी यांनी सांगितले . या वेळी छत्रपती शिवराय प्रतिष्ठान मधील विठ्ठल मापारी,महेंद्र मोरे,रितेश फंगाळ,अनुप थोरवे,आकाश मापारी,बाला मापारी,समाधान पवार असे बरेच असे लोक उपस्थित होते.





Sunday, 27 September 2020

मालवाहू गाडीने दुचाकीस्वारास उडवले अपघात मध्ये ३ वर्षीय बालक ठार

मालवाहू गाडीने दुचाकीस्वारास उडवले अपघात मध्ये ३ वर्षीय बालक ठार 

लोणार - (प्रणव वराडे)
लोणार - महिंद्रा सुप्रीम मालवाहू पिकअप  गाडीने दुचाकी स्वारास समोरून उजव्या बाजूने उडविल्या मुळे दुचाकी वरील पती पत्नी व ३ वर्षीय मुलगा गाडीला 
धडकल्याने या मध्ये ३ वर्षीय बालक जागीच ठार झाल्याची घटना दि २७/०९/२०२०  लोणार रायगाव रोडवरील प्राथमिक आरोग्य केंद्र जवळ घडली आहे या बाबत सविस्तर वृत्त असे कि लोणार तालुक्यातील गोत्रा येथील दुचाकि  स्वार हे आपल्या होंडा शाईन गाडी क्रमांक MH १४ fh ६८९१ वर पत्नी व ३ वर्षीय मुला  सोबत जिंतूर कडे निघाले असताना यांच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या विमा क्रमांक मालवाहू पिकअप ने दुचाकी स्वाराला समोरून उजव्या बाजूने धडक दिली हि धडक एवढी भीषण होती कि दुचाकी  समोर बसलेला बालक कार्तिक कृष्णां धोत्रे वय ३ वर्ष याचे डोके मालवाहू गाडीच्या लोखंडी रॉड ला धडकले व त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला तर दुचाकी स्वार कृष्णा सूर्यभान धोत्रे वय ३५ यांची पत्नी पार्वती कृष्णां वय ३२  धोत्रे हे गंभीर जखमी असून यांना परिसरातील ग्रामस्थांनी १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने लोणार ग्रामीण रुग्णाल येथे दाखल करण्यात आले असून यांना पुढील उपचाराकरिता मेहकर येथे रवाना केले असून या अपघाताची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळताच यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख,लेखनिक चंद्रशेखर मुरडकर पोलीस नाईक रामू गीते,पो.हे.कॉ रामदास वैराळ,पो.कॉ विशाल धोंडांगे,भगवान नागरे यांना घटना स्थळी पोहचताच पंचनामा करत सदर मालवाहू चालक सदाशिव गणपत   निकाळजे रा बोरखेडी ता सेनगाव जी हिंगोली याला ताब्यात घेत मालवाहू जप्त करून लोणार पोलीस स्टेशन ला जमा केली असून मालवाहू चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु असून पुढील तपास लोणार पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मागर्दर्शनाखाली पो.हे.कॉ  रामदास वैराळ करीत असून ३ वर्षीय बालकाच्या अपघाती मृत्यू मुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ  व्यक्त होत आहे

Thursday, 24 September 2020

पांग्रा डोळे येथे शेतकऱ्याची आत्महत्या

 पांग्रा डोळे येथे शेतकऱ्याची आत्महत्या 



लोणार दि २४/०९/२० सतीश मुलंगे                                                                                                                                      लोणार तालुकयातील पांग्रा डोळे येथील एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील झोपडी मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि २४/०९/२०२० रोजी उघडकीस आली. या बाबत सविस्तर वृत्त असे कि पांग्रा डोळे येथील शेतकरी अशोक आश्रुबा कांगणे वय ४० वर्ष यांनी गोत्रा शिवरामधील स्वताच्या शेतामधील झोपडीत गळफास लावून आत्महत्या केली. या बाबत ची माहिती परिसरातील शेतकऱयांनी लोणार पोलीस स्टेशन ला कळविले असता लोणार पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी बिट जमदार बन्सी पवार,पो.कॉ रवींद्र बोरे,पो.कॉ विशाल धोंडगे यांना घटनास्थळी पाठविले सादर अधिकारी कर्मच्यार्यानी घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला व सादर मृतदेह हा शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय लोणार येथे पाठविण्यात आला असून फिर्यादी गजानन विठ्ठल कांगणे यांच्या फिर्यादीवरून लोणार पोलीस स्टेशन ला अपराध क्रमांक ३०/२० प्रमाणे कलाम १७४ जा.फौ प्रमाणे मार्ग दाखल केला ऑन पुढील तपास लोणार पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शन खाली बिट जमदार बन्सी पवार,पो.कॉ रवींद्र बोरे, पो.कॉ  विशाल धोंडगे करीत आहे

लोणार शहरात ५० वर्षीय इसमाचा संशयाद्स्पद मृतदेह आढळला


 


लोणार शहरात ५० वर्षीय इसमाचा संशयाद्स्पद मृतदेह आढळला 

लोणार २४/०९/२०२० (प्रणव वराडे )                                                                                                                                    लोणार शहरात एका ५० वर्षीय इसमाचा मृतदेह संशयाद्स्पद स्थितीत आढळल्याने घटना दि २४ सप्टें  २०२० रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली  या बाबत सविस्तर वृत्त असे कि शहरातील झोपडपट्टी मधील मज्जीद जवळील न.पा च्या नाली मध्ये एका सिमेंट च्या पाईपा मध्ये सदर मृतदेह जो संपूर्ण पणे सिमेंट पाईप मध्ये अडकलेल्या अवस्तेथ लहान मुलांना खेळतांना दिसला मृतकाचा फक्त एक पायच  दिसत  होता  हि बाब मुलांनी तेथीलच रहिवासी अन्नू सर कुरेशी यांना सांगितली केरेशी यांनी तात्काळ या घटनेची माहिती लोणार पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना दिली असून यांनी आपले सहकारी पोलस उपनिरीक्षक अजहर शेख,लेखनिक चंद्रशेखर मुरडकर,पोलीस नाईक रामू गीते,गोपनीय विभागाचे कैलास चत्तरकर,विठ्ठल चव्हाण यांना घटनास्थळी पाठवले सादर अधिकारी कर्मरच्यार्यांनी न.प आरोग्यविभागाचे आरोग्य निरीक्षक अशोक नीचांग,सलीम शेख व सफाई कर्मच्यार्याच्या मदतीने नाली मधील मृतदेह बाहेर काढले असता तो इसम शहरातीलच रामकिसन तुकाराम गावंडे असून याची ओळख मृतकाच्या मुलाने पाटविल्याने मृतकाचे प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय लोणार कडे पाठविल्यास आले असून फिर्यादी राजेश रामकिसन गावंडे याच्या फिर्यादीवरून लोणार पोलीस स्टेशन ला अपराध क्रमांक २९/२० नुसार कलाम १७४ जा.पो प्रमाणे मार्ग दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शन खाली पो.हे.कॉ सुरेश काळे,पो.कॉ कृष्ण निकम करीत आहे सदर मृतकाचा घातपात किंवा दारू च्या नशेत पडून मृत्यू झाला याचे आव्हान लोणार पोलीसा पुढे उभे ठाकले आहे

Tuesday, 22 September 2020

धाड येथील शेतकऱ्याचा नदीत पडुन दुर्देवी मुत्यू

 




धाड येथील शेतकऱ्याचा नदीत पडुन दुर्देवी मुत्यू 

लोणार :- प्रणव वराडे 

लोणार तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या विदर्भ व मराठवाडयाच्या सिमेवरील मौजे  धाड येथील शेतकऱ्याचा पाण्यात पडुन दुर्देवी मुत्यू झाल्याची घटना  22 सष्टेबर 2020 रोजी उघडकीस आली आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे की धाड येथील शेतकरी केशव रामराव ताठे वय 40 वर्षे हे नेहमीप्रमाणे स्वताचे शेता‍त कामानिमीत्त  जात असताना धाड येथील नदीत त्याचा पाय घसरून पाण्यात बुडुन दुर्देवी मुत्यू झाला त्याचे प्रेत तब्बल एक किमी पर्यत वाहत गेले होते गावकऱ्याची शोध मोहीम राबवत तिन घंटयाच्या अथक प्रयत्नाने त्यांचे प्रेत सापडले  याबाबत तेजराव अहेलाजी ताठे यांनी पोलीस स्टेशन लोणार ला फिर्याद दिली असता वरिष्ठ पेालीस निरीक्षक रविंद्र देशमुख, त्याचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख, लेखनिक चंद्रशेखर मुरडकर, बिट जमादार बन्सी पवार, पोका भागवत खाडे, यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्नालय येथे पाठविण्यात आला.  अकस्मीत मुत्यूची नोद करण्यात आली  सदर मृतक शेतकरी याच्या मुत्यू पाश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा मोठा आप्त परिवार आहे या घटनेमुळे धाड गाववर शोककळा पसरली आहे.

Monday, 21 September 2020

पिंपळनेर येथील हरविलेला मुलगा अखेर २१ तासांनी सापडला - नातेवाईकांची अपहरणाची शंका

पिंपळनेर येथील हरविलेला मुलगा अखेर २१ तासांनी सापडला - नातेवाईकांची अपहरणाची शंका  

   
लोणार दि २१/०९/२०२० (सतीश मुलंगे)
तालुक्यातील पिंपळनेर येथील ३ वर्षीय मुलगा दिनांक २० सप्टें  २०२० रोजी सकाळी ९ वाजेदरम्यान त्याच्या राहत्या घरासमोरून हरविला होता तो दि २१  सप्टें  २०२० रोजी तब्ब्ल २१ तासांनी पिंपळनेर येथील ज्ञानेश्वर  सानप यांच्या शेतात यांचा मुलगा श्रीकांत सानप याला आढळून आला या बाबत ची माहिती सदर मुलाच्या नातेवाईकाना व लोणार पोलिसांना दिली 
 या बाबत सविस्तर वृत्त असे कि पिंपळनेर येथील फकिरा दराडे यांचा ३ वर्षाचा मुलगा कार्तिक घरा समोरील अंगणात खेळात असताना अचानक गायब झाला होता त्याचा नातेवाईकानी  सर्वत्र शोध घेतला होता तरी तो दिवस भर मिळून आला नव्हता या बाबत ची माहिती लोणार पोलीस स्टेशन ला कळविली होती लोणार पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख,लेखनिक चंद्रशेखर मुरडकर,बिट जमदार बन्सी पवार,पो.कॉ. प्रदीप सौभागे,विशाल धोंडगे,जगदीश सानप,भागवत खाडे,कृष्णां  निकम,गोपनीय विभागाचे कैलास चत्तरकार,विठ्ठल चव्हाण,महिला पोलीस सीमा उन्हाळे,अनुसया नांदे यांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेत शोध मोहीम सुरु केली तसेच या मुला  बाबत  माहिती सर्व समाज माध्यमावर दिली मात्र दि २१ सप्टें  २०२०  रोजी सादर बालक आढळून आल्याने त्याला ग्रामीण रुग्णालय लोणार येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यानी पुढील उपचारा करीत मेहकर इथे रवाना केले असून सादर बालकाची प्रकृती चांगली आहे मात्र सदर बालकाचे  हे अपहरण करण्यात आले असून भीतीपोटी  अपहरण कर्त्याने त्या बालकास परत शेतात आणून सोडले अशी पिंपळनेर ग्रामस्थ दबक्या आवाजात चर्चा करत असून हा बालक खरंच हरविला होता कि अज्ञात आरोपीने अपहरण केले याचा शोध घेणाचे आव्हान लोणार पोलिसांसमोर उभे ठाकले आहे

Sunday, 20 September 2020

लोणार नगरपरिषद ची धडक कारवाई

लोणार नगरपरिषद ची धडक कारवाई 

         लोणार (सतीश मुलंगे) 
         लोणार नगरपरिषद तर्फे मागील २ दिवसामध्ये जनता कर्फ्यू दरम्यान विविध प्रकारच्या कारवाई करण्यात आल्या. या मध्ये लोणार शहरातील दुकानधारकांनी निर्धारित वेळेपूर्वी व वेळेनंतर दुकान सुरु ठेवले अशी ११ दुकाने सील करण्यात आली 
या मध्ये भोलेनाथ किराणा ,दिलीप चोरडिया यांचे दुकान,अविनाश शिंदे,आत्माराम खोटे,अंबादास नेवारे,निलेश कोठारी,यांचा समावेश आहे असेच 
दीपक कापड केंद्र यांना ५००० रु चा दंड आकारण्यात आला आहे तसेच मास्क न घालून फिरणारे सोशल डिस्टन्स च पालन न करणारे  यांच्या कडून १४००० रुपयांचा दंड वसून करण्यात आला. 
नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व कोरोना पासून आपला बचाव करावा असे आपले कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी  विठ्ठल केदारे यांनी सांगितले व दुकानाच्या नेमून दिलेल्या कालावधीतच दुकाने सुरु ठेवावी असे हि सांगितले आहे 

Saturday, 19 September 2020

जनावरावरील आजाराच्या अफवेने बीफ व्यवसायावर मोठा परिणाम. अफवेवर कोणी ही विश्वास ठेवू नका. प्रा लुकमान कुरेशी

जनावरावरील आजाराच्या अफवेने बीफ व्यवसायावर मोठा परिणाम. अफवेवर कोणी ही विश्वास ठेवू नका. प्रा लुकमान कुरेशी

लोणार - (सतीश मुलंगे)
जनावरावर, बैल. गाय. म्हशी व इतर वर आलेल्या लम्पी आजारामुळे दर दिवशी होणाऱ्या लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली त्यातच या आजारा विषय सोशल मीडियावर विविध अफवा पसरवल्या जात असल्याने बीफ च्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. या शिवाय शेतकरी बाधवही हवालदिल झाले आहे त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महाराष्ट्र मुस्लिम खाटीक समाज विकास समिती महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष प्रा लुकमान कुरेशी यांनी केले आहे या संदर्भात त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की लम्पी हा आजार आपल्या कडे नाही पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विभागाने काही जनावरांचे सँम्पल चाचणी साठी भोपळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते याचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहे पंरतु सोशलमीडियावर पसरलेल्या अफवां मुळे बीफ व्यवसाय ठप्प झाला आहे. पशुसंवर्धन विभागाकडुन योग्य औषधोपचार केले जात असल्याने शेतकर्‍यांना व व्यापाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्याने जनावरावरील त्वचा रोग पसरला नाही. तरी या अफवांवर कोणी ही विश्वास ठेवू नये शहरात येणारे बिफ प्रयोग शाळा व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतरच भाकड जनावरे कत्तल खाण्यात पाठवली जातात. लम्पी हा आजार येथे नाही. अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रा लुकमान कुरेशी म्हणाले मांसाहार खाणाऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. येथे हा आजार नाही. व संपूर्ण तपासणी झाल्यानंतर भाकड जनावरांचा उपयोग केला जातो शोसल मिडियावर पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

हिरडव येथील पत्नीचा खुन करून फरार झालेल्या युवकाचे प्रेत झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळुन आले

 हिरडव येथील पत्नीचा खुन करून फरार झालेल्या युवकाचे प्रेत झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळुन आले 

लोणार - (सतीश मुलंगे)
तालुक्यांतील हिरडव येथे 3 सष्टेबर 2020 रोजी दारूडया पतीने पत्नीचा गळा आवळुन खुन केल्याची घटना घडली होती यामध्ये तिचा पती विकास शेषराव घायाळ याचा मुत्यदेह पळसखेड शिवारात एका लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. मृतकाचे शिर हे झाडाला लटकलेले असुन बाकी थड हे खाली गळुन पडलेल्या अवस्थेत आहे. या घटनेची माहीती परिसरातील शेतकऱ्याना जेव्हा दुर्गधी आली त्यावेळी पोलीसाना दिली यावेळी घटनेची माहीती मिळताच पोलीसानी यांनी घटनास्थळी भेट देउन पंचनामा केला असता सदर युवक हा हिरडव येथील पत्नीचा खुन करून फरार झालेला विकास शेषराव घायाळ असल्याचे त्याच्या जवळील पाकीट आधार कार्ड वरून स्पष्ट झाले सदर युवकाची आत्महत्या का हत्या याबाबत नागरिकामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. सदर युवकाचे मृतदेह हे कुजलेल्या अवस्थेत असल्याकारणाने घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले. गेल्या अनेक दिवसापासुन तालुक्यामध्ये खुन व आत्महत्येचे प्रकार घडत असुन लोणार पोलीसाच्या मागे शुक्लकाष्ठ संपता संपेना या घटनेवरून अधेरेखीत होते. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सदर युवकाची हत्या का आत्महत्या हे समोर येणार आहे या  प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे.

Friday, 18 September 2020

लोणार तालुक्यातील पहुर येथील मुलाने केला दारूडया बापाचा गळा आवळुन केला खुनदारूडया बापाने आईच्या गळयातील सोन्याची गहुपोथ लोडल्याचा होता राग


लोणार तालुक्यातील पहुर येथील मुलाने केला दारूडया बापाचा गळा आवळुन केला खुन
दारूडया बापाने आईच्या गळयातील सोन्याची गहुपोथ लोडल्याचा होता राग


लोणार (सतीश मुलंगे):
दारूडया बापाने दारू पिण्यासाठी आईच्या गळयातील सोन्याची गहुपोथे तोडल्याचा राग अनावर झाल्याने मुलाने दारूडया बापाचा गळा आवळुन खुन
केल्याची घटना लोणार तालुक्यातील पहुर येथे 17 सष्टेबर 2020 रोजी सायंकाळी 7 वाजता उघडकीस आली याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहुर येथील मृतक रामभाउ मारोती मारकड वय 55 हा आरोपी च्या आईस नेहमी दारू पिउन मारझोड करत होता दारू पिण्यास पैसे न दिल्यास त्रास देत होता घटनेच्या दिवशी मृतक हा त्याचे पत्नीस दारू पिण्यासाठी पैसे मागत होता दारूसाठी पैसे न मिळाल्याने मृतकाचे त्याचे पत्नी चे गळयातील सोन्याची गहुपोथ तोडुन घेतली ही माहीती मृतकाचा मुलगा विठठल रामभाउ मारकड वय 32 याला मारोती मिळताच त्याचा राग अनावर झाला व रागाच्या भरात त्याने वडीलांना काठीने पाठीत मारहाण करत त्यांचा गळा आवळुन खुन केला या घटनेची माहीती लोणार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस
निरीक्षक रविद्र देशमुख , पोलीस उपनिरीक्षक अझहर शेख, लेखनिस चंद्रशेखर मुरडकर, हिरडव बिटचे बद्रीनाथ डिघोळे , पो का रविद्र बोरे, तेजराव भोकरे, विशाल धोंडगे, गोपनिय विभागाचे कैलास चतरकर, गजानन बनसोड, पोहका भगवान नागरे आदी कर्मचाऱ्यानी तात्काळ घटनास्थळी पोहचुन आरोपी विठठल मारकड, ला मोठया शिताफितीने अटक करत घटनास्थळावर पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्नालयात पाठविला असुन सौ.गंगाधर कुंडलीक जुमडे यांनी दिलेल्या फियार्दीवरून लोणार पो स्टे मध्ये आरोपी विरूध्द अप न 291/20 कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दखल केला असुन पुढील तपास उपविभागीय अधिकारी दिलदार तडवी यांचे मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख , लेखनिक चंद्रशेखर मुरडकर, हिरडव बिटचे बद्रीनाथ डिघोळे हे करीत असुन दारूडयामूळे तालुक्यातील लागोपाठ तिन घटना घडल्या यापुर्वी खुरमपुर येथे नातवाने आजीचा दारूसाठी केला होता खुन तर हिरडव येथील दारूडया पतीने केला होता पत्नीचा खुन अशा दोन घटना होत नाही तोच पुन्हा दारूडया पतीने पत्नीला त्रास दिल्याच्या रागातुन मुलाने केला बापाचा खुन अशा घटना घडत असल्यामुळे तालुक्यात दारू चा महापुर वाहत असुन सदर प्रमाण हे यातुनच घडत आहे. यावर अंकुश लावणे निंतात गरजेचे आहे.


दाभा ग्राम पंचायतीच्या वतीने माझे कुटुंब,माझी जबाबदारी' घरोघरी जाऊन तपासणी

दाभा ग्राम पंचायतीच्या वतीने  माझे कुटुंब,माझी जबाबदारी' घरोघरी जाऊन तपासणी

किशोर मोरे दाभाप्रतिनिधी.
दाभा ग्राम पंचायतीच्या वतीने माझे कुटुंब,माझी जबाबदारी' घरोघरी जाऊन तपासणी
दाभा प्रतिनिधी दि 16सप्टेंबर  रोजी   दाभा येथील सरपंच पती किशोर पाटील मोरे यांच्याहस्ते *'माझे कुटुंब,माझी जबाबदारी'  या मोहिमेची दाभा गावात सुरुवात करण्यात आली..
शहरा सह ग्रामीण भागात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे. येणाऱ्या काळात तो आणखी वाढण्याची शक्यता  नाकारता येत नाही   कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेणं महत्वाचे आहे .
 या अनुसंघाने दाभा गावातील ग्रामस्थांची आरोग्य पथक घरोघरी जाऊन  आरोग्य तपासनी  करण्यात येतआहे.
15 सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत ही माझे कुटूंब माझी जबादारी मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक घरात महिन्यात दोन वेळा आरोग्याची तपासणी करण्यासाठी आरोग्य सेवक चिरमाडे .आशा स्वयंसेविका रत्नमाला प्रधान, अंगणवाडी सेविका कमलाबाई कांबळे रंजना दिपके  मदतनीस उज्वला मोरे अयोध्या मोरे ,तसेच  स्थानिक लोकप्रतिनिधींनी  माजी सभापती डॉ .मारोती मोरे ग्रामसेवक किशोर भाग्यवंत ,स्वयंसेवकका मार्फत घरोघर सर्वेक्षण कसरण्यात येत असून 
प्रत्येक व्यक्तीची इन्फ्रारेड थर्मोमीटर  व पल्स ऑक्सिमिटर ने तपासणी येत आहे  मोफत कोरोना तपासणी ,उपचार व शास्त्रशुद्ध माहिती प्रबोधन कोरोनाचा प्रसाराला आळा घालून  , लवकर निदान करून मृत्यू प्रमाण कमी करणे ,लोकांच्या मनातील भीती दूर करून नागरिकांनी नियमित .. मास्कचा वापर स्वतःच्या सुरक्षेसाठी   शिवाय बाहेरून आल्यानंतर कुटुंबाला विषाणूचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी. अशी माहिती माजी सभापती डॉ मारोती मोरे दिली .दाभा गावातील ग्रामस्थांनी सुद्धा माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेला  सकरात्मक प्रतिसाद दिला आहे.

Wednesday, 16 September 2020

प्राथमिक आरोग्य केंद्र हिरडव येथे माझे कुटुंब,माझी जबाबदारी' या मोहिमेचे उदघाटन ...

 प्राथमिक आरोग्य केंद्र हिरडव येथे माझे कुटुंब,माझी जबाबदारी' या मोहिमेचे उदघाटन ...

दाभा प्रतिनिधी (किशोर मोरे)
 दि 15 सप्टेंबर 15.09.2020 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र हिरडव येथे रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद सदस्य श्री राजेशभाऊ मापारी यांच्याहस्ते 'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' या मोहिमेचे उदघाटन ...
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे. येणाऱ्या काळात तो आणखी वाढण्याची शक्यता  नाकारता येत नाही   कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेणं महत्वाचे आहे .
 प्राथमिक आरोग्य केंद्र हिरडव येथे दि 15सप्टेंबर रोजी'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेचे  उदघाटन जि.प.सदस्य तथा रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष राजेश मापारी यांच्या हस्ते करण्यात आले
15 सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत ही मोहिम राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक घरात महिन्यात दोन वेळा आरोग्याची चौकशी करण्यासाठी सरकारची एक टीम जाईल. 
आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका,मदतनीस तसेच  स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेले स्वयंसेवक मार्फत घरोघर सर्वेक्षण
प्रत्येक व्यक्तीची इन्फ्रारेड थर्मोमीटर  व पल्स ऑक्सिमिटर ने तपासणी
संशयित व्यक्तींना तात्काळ संदर्भ सेवा व मोफत कोरोना तपासणी ,उपचार व शास्त्रशुद्ध माहिती प्रबोधन कोरोनाचा प्रसाराला आळा घालणे , लवकर निदान करून मृत्यू प्रमाण कमी करणे ,लोकांच्या मनातील भीती दूर करणे ... हे उद्दीष्ट
मास्कचा वापर आता स्वतःच्या सुरक्षेसाठी  'ब्लॅक बेल्ट' म्हणून करावा. सदा सर्वदा मास्क लावावा. शिवाय बाहेरून आल्यानंतर कुटुंबाला विषाणूचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी. अशी माहिती   हिरडव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रल्हाद जायभाये  यांनी विशद केली  आहे . 
येत्या काळात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येवू नये म्हणून सोशल डिस्टंसिंगचं पालन होणं आवश्यक आहे. शासनच्या वतीने आवाहन केलं  आहे.  
 करोना विरुद्धच्या नव्या मोहिमेत सर्वांनी  सहभाग घ्यावा असं आवाहन  जि प सदस्य तथा रुग्ण  कल्याण समिती अध्यक्ष राजेश मापारी यांनी मोहिमेच्या उदघाटन प्रसंगी केलं आहे. आणि मोहीम यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी  डॉ प्रल्हाद जायभाये वै अ ,डॉ विशाल सुरुशे वै अ  सर्व आरोग्य कर्मचारी तसेच आशा स्वयंसेविका व अंगणवाडी स्वयंसेविका .उपस्थित होत्या.



दाभा प्रतिनिधी (किशोर मोरे) 9921355513

Monday, 7 September 2020

कृषिदूतांनी पटवून दिले निंबोळी अर्काचे फायदे


कृषिदूतांनी पटवून दिले निंबोळी अर्काचे फायदे

दाभा प्रतिनिधी (किशोर मोरे)
लोणार :- तालुक्यातील गायखेड येथे समर्थ कृषी महाविद्यालयाच्या दे.राजा वतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत निंबोळी अर्क कसा बनवावा? व त्याचा शेतीला कसा व किती प्रमाणात फायदा होतो? याबद्दलची सविस्तर माहिती कृषीदूतांनी दिली. दिवसेंदिवस शेतकर्याद्वारे रासायनिक खतांचा  व कीटकनाशकांचा खुप जास्त प्रमाणात वापर करण्यात येतो त्यामुळे जमीनीची सुपीकता कमी होते आणि त्या विषारी रासायनिक खतांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठमोठ्या आजाराला सामोरे जावे लागत आहे कीटकनाशकांमुळे शेतीचा खर्चही वाढत आहे . या कीटकनाशकांमुळे जे शेतीसाठी उपयोगी किडे आहेत त्यांची संख्या सुद्धा कमी होत आहे यावेळी समर्थ कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांनी निंबोळी अर्क कसा बनवावा व त्याचा वापर कसा व किती प्रमाणात करावा याबद्दल प्रात्यक्षिक करुन शेतकर्याना माहिती दिली शेतकर्यानी त्यांच्या मनातील असलेल्या अनेक शंकांचे प्रश्न विचारुन निवारण करुन घेतले. यावेळी कृषीदूतांना महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे, रावे समन्वयक प्राचार्य मोहजीतसिंग राजपूत, प्रा.विलास चव्हाण यांचे मार्गदर्शन

Saturday, 5 September 2020

दारूडया पतीने केला पत्नीचा गळा आवळुन खुन


 लोणारदिंनाक 04/09/2020

दारूडया पतीने केला पत्नीचा गळा आवळुन खुन
लोणार तालुकयातील हिरडव येथील घटना
लोणार तालुक्यात खुनाचे सुत्र सुरूच  पोलीस यंत्रणेवर ताण

लोणार :-  (राहुल सरदार)
तालुकयातील खुरमपुर येथील दारूडया नातवाने आजीचा खुन केल्याची घटना दिं 3 सष्टेबर रोजी उघडकीस आली तया वृत्ताची शाई वाळत नाही तोच सध्याकाळी  3 सष्टेबरच्या रोजी हिरडव येथील दारूडया पतीने आपल्या पत्नीचा स्वताच्याशेतात साडीने गळा आवळुन खुन केल्याची घटना उघडकीस आली असुन सदर आरोपी हा खुन करून फरार झाला आहे. एकाच दिवशी दोन खुनाच्या घडल्याने पोलीस यंत्रनेवर ताण वाढल्याचे दिसत आहे.
हिरडव येथील विकास शेषराव घायाळ वय 35 वर्षे याने त्याची पत्नी मृतक लक्ष्मी विकास घायाळ वय 34 वर्षे हिला तिच्या माहेरी बारेखेडी ता. मेहकर येथुन हिरडव येथील शेतातुन पाहाणी करण्याच्या बहाण्याने हिरडव येथे आणले त्या सोबत तत्याचा एक मुलगा व एक मुलगी सोबत होते हिरडव येथील घरी दोन्ही मुंलाना सोडुन 3 सष्टेबर च्या दुपारी 3 वाजेच्या दरम्यान दोघे पती पत्नी शेतात पाहणी करण्यासाठी गेले असता दारूडया पती विकास याने पत्नी लक्ष्मी हिचा तिच्या साडीने गळा आवळुन  खुन करून फरार झाला हि घटना रात्री 9 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली हिरडव येथील पोलीस पाटील रूपाली घायाळ यांनी तात्काळ ही माहीती लोणार पो स्टे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख 'यांनी तात्काळ या घटनेची गांर्भीय लक्षात येताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख, हिरडव बिट जमादार गुलाबराव झोटे, पेाहेका सुरेश काळे, पोका कृष्णा निकम , सुनिल केसरकर , भागवत खाडे , गोपनिय विभागाचे कैलास चतरकर, विठल चव्हाण चालक जगदीश सानप लेखनिस चंद्रशेखर मुरडकर यांनी घटनास्थळी धाव घेत  त्यानी घटनास्थळी धाव घेत सुक्ष्म निरीक्षण  करत पंचनामा केला सदर मृतकाचे प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्नालयासत दाखल केले मृतक महीलेचा भाउ संतोष भास्कर शहाणे रा बोराखेडी ता मेहकर यांनी तक्रार दिली त्यावरून पोलीसानी कलम 302 नुसार पतीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुंजबळ उपविभागीय पोलीस अधिकारी दिलदार तडवी यांच्या मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख , पोहेका गुलाबराव झोटे, लेखनिस चंद्रशेखर मुरडकर, सुनील केसरकर करती असुन एकाच दविसानदोन खुनाच्या घ्ज्ञटना घडल्याने लोणार पोलीसावर प्रंचड ताण आल्याने दिसत असुन फरार आरोपीला लवकरात लवकर गजाआड करण्यात येईल अशी माहीती वरिष्ठ अधिकारी रविंद्र देशमुख यांनी दिली आहे. 

लोणार :-  (राहुल सरदार)

Tuesday, 18 August 2020

माजी मुख्यमंत्री आदरणीय कै.वसंतरावजी नाईक साहेब यांची लोणार येथे पुण्यतिथि साजरी करण्यात आली.

 


माजी मुख्यमंत्री आदरणीय कै.वसंतरावजी नाईक साहेब यांची लोणार येथे पुण्यतिथि साजरी करण्यात आली.

याप्रसंगी सौ.सुशिलाताई बाबुसिंग जाधव (मा.नगराध्यक्ष)हया अध्यक्षस्थानी होत्या.प्रमुख अतिथी बाबुसिंग जाधव सर,मा.माघाडे साहेब,डॉ.संतोष आडे साहेब,श्री जंगलसींग राठोड सर ,निरज जाधव सर व ईतर कर्मचारी उपस्थित होते. मा.वसंतरावजी नाईक यांच्या कारकीर्दवर जाधव सर यानी प्रकाश टाकला,सविस्तर माहिती सांगितली. आभारप्रदर्शन डॉ.संतोष आडे यानी केले.

लोणार शहर प्रतिनिधी:- सतीश मुलंगे. 

Sunday, 9 August 2020

मुख्यमंत्र्यांच्या डिजिटल महाराष्ट्राचे शिलेदार ग्रामपंचायत संगणक परिचालक हे आजरोजी कोरोना महामारीच्या संकटात गावपातळीवर काम करीत असतांना कामाचा मोबदला तीन महिन्यापासून न मिळाल्यामुळे त्यांच्यावर आली उपासमारीची वेळ

 

मुख्यमंत्र्यांच्या डिजिटल महाराष्ट्राचे शिलेदार ग्रामपंचायत संगणक परिचालक हे आजरोजी कोरोना महामारीच्या संकटात गावपातळीवर काम करीत असतांना कामाचा मोबदला तीन महिन्यापासून न मिळाल्यामुळे त्यांच्यावर आली उपासमारीची वेळ

लोणार:- तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पा अंतर्गत कंत्राटी स्वरूपात काम करीत असणारे संगणक परिचालक यांच्या कामाचा मोबदला रक्कम ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग निधी मधून जिल्हा परिषदेस धनादेश देणे बाबत शासनाने जिल्हा परिषदेस कळवून सुद्धा ग्रामपंचायतींनी धनादेश न दिल्यामुळे संगणक परिचालक यांच्यासह कुटुंबावर आली उपासमारीची वेळ याबाबत सविस्तर असे की, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून २०११ पासून संग्राम (संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र व सध्या आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात नेमणूक असलेले संगणक परिचालक पंचायत समिती लोणार अंतर्गत ग्रामीण भागातील ग्रामपंचायतस्तरावर जनतेला विविध शासकीय दाखले देण्याचे व माहिती ऑनलाइन प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याचे तसेच वेळोवेळी शासनाने दिलेल्या कामे, सर्व्हे, योजनांची कामे यासह ग्रामपंचायत सांगेल ते काम संगणक परिचालक प्रामाणिकपणे करतात. परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे प्रकल्प सुरू झाले तेव्हा पासून तुटपुंजे मानधन सुद्धा वर्ष-वर्ष मिळाले नाही. तरी देखील शासनाने नेमून दिलेले काम संगणक परिचालक करीत आहे. त्यातच आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पाची मुदत 31 मार्च 2020 रोजी संपलेली आहे, परंतु कोरोनामुळे पुढील निर्णय होईपर्यंत आहे तीच व्यवस्था सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेवून माहे एप्रिल, मे, जुन 2020 या तीन महिन्यांच्या कालावधीची आगाऊ रक्कम ग्रामपंचायतीचे चौदाव्या वित्त आयोगाच्या अखर्चित निधी मधुन जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याच्या सुचना देऊन आज रोजी तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा पंचायत समिती कार्यालय लोणार कडून
100 टक्के ग्रामपंचायतीचे निधीचे धनादेश जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आले नसून आजरोजी 16 ग्रामपंचायतीचे धनादेश पाठविणे बाकी असल्याची धक्का दायक बाब उघडकिस आली आहे. सध्या कोरोना महामारीचे संकट जागतीक स्तरावर सुरू आहे या संकटाचा मुकाबला करण्याकरीता सर्व यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. अश्या परिस्थितीत संगणक परीचालकांना कामाच्या मोबदल्या पासून वंचीत ठेवणे योग्य नाही. शासनाचे निर्देश असतांना सुद्धा पंचायत समितीच्या नियोजनशून्य कारभारामुळे 100 टक्के धनादेश जिल्हा परिषदेकडे जमा न झाल्यामुळे संगणक परिचालक यांचा तीन महिन्यांच्या पगार झाला नाही. यामुळे कुटुंब उदरनिर्वाहसाठी कर्जबाजारी होऊन उपासमारीची वेळ त्यांच्यासह त्यांच्या कटुंबावर आली आहे. आता पुन्हा शासनाने जुलै ते मार्च 2021 या 9 महिने कालावधीची रक्कम पंधराव्या वित्त आयोग निधी ग्रामपंचायत खात्यात जमा झाल्या नंतर निधीचे समायोजन करून तात्काळ जमा करणे बाबत शासनाने ८ जुलै रोजीच्या पत्रात नमूद केले आहे. परंतु शासनाने काढलेल्या पत्रानुसार
कार्यवाही का होत नाही याकडे शासनाचे लक्ष नाही का ? शासनाने पत्र काढले असतांना व चौदावा वित्त आयोगात निधी ग्रामपंचायतीस उपलब्ध असतांना जिल्हा परिषदेकडे वर्ग केला जात नाही तरी सुद्धा शासन चूप का हे शासनास दिसत नाही का ? असा प्रश्न संगणक परिचालक यांच्या मनात उपस्थीत होत आहे. संगणक परिचालक हा नियमीतपणे व आज रोजी कोरोनाच्या काळात ग्रामपंचायत पातळीवर पंचायत समिती, ग्रामसेवक व इतर विभागाने सांगितलेले काम करत असतांना गावातील नागरीक यांच्या सोबत त्यांचा संपर्क होत असतो तरी सुद्धा मनामध्ये कुठलीही भीती न बाळगता तुटपुंज्या 6000 रु. मानधन मिळण्यासाठी काम करीत आहे. पण ते मानधन सुद्धा त्यांना मिळण्यासाठी पंचायत समिती स्तरावरून कुठलेही ठोस पाठपुरावा होत नसल्याने अद्याप धनादेश जमा झाले नसल्याची चर्चा आहे. आज रोजी सन वार करीता तसेच आमचे पोट जगविण्यासाठी आमच्या केलेल्या कामाचा मोबदला मिळवून द्यावा व नियमित दरमहा मानधन मिळावे अशी मागणी संगणक परिचालक यांच्याकडून मागणी होत आहे. आता शासन यामध्ये लक्ष घालून नियमित दरमहा मानधन मिळवून देणार की ग्रामपंचायत आपला कामाचा मोबदला जिल्हा परिषदेस केव्हा पाठवणार याची प्रतीक्षा संगणक परीचालकास अजून करावी लागणार याकडे सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालक यांच लक्ष लागले आहे.

लोणार तालुका प्रतिनिधी:- प्रणव वराडे

बुलडाणा जिल्हयात आदिवासी असलेले गाव म्हणुन ख्याती असलेल्या टिटवी यागावात जागतीक आदीवासी

 

बुलडाणा जिल्हयात आदिवासी असलेले गाव म्हणुन ख्याती असलेल्या टिटवी यागावात  जागतीक आदीवासी 


लोणार (प्रणव वराडे)

9 ऑगष्ट हा दिन जागतीक आदिवासी गुणगौरव म्हणुन साजरा केला जातो बुलडाणा जिल्हयातील 

लोणार तालुक्यातील बहुसंख्य आदीवासी म्हणुन प्राश्यात असलेल्या टिटवी गावामध्ये असलेले आदीवासी नेते तथा 

टिटवी गावचे सरपंच तथा माजी पंचायत समिती सभापती  भगवानराव कोकाटे यांनी जागतीक आदिवासी गुणगौरव दिन साजरा केला यावेळी बहुसंख्य आदीवासी बाधव उपस्थीत होते. यावेळी आदिवासी नेते भगवानराव कोकाटे यांनी आपल्या आदीवासी बांधवाना मागदर्शन करताना सांगीतले की  आदिवासी या नावाला फार प्राचीन इतिहास आहे. आदिवासी म्हटले की, आपल्यासमोर  डोंगर दर्‍यात राहणारा, जंगलात राहणारा, उघडा, नागडा असणारा, ओबड धोबड चेहर्‍याचा, जगाशी कुठलाही संपर्क नसणारा समाज येतो. जगाच्या पाठीवर ज्या माणसाने, ज्या जिवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव म्हणजेच आदिवासी. आज जगाच्या पाठीवर ज्या काही कला अस्तित्वात आहेत. त्या सगळ्या कलांचा उद्गाता आदिवासी आहे. आदिवासींची लोककला, चित्रकला, नृत्य, वादन, गायन, शिल्पकला याला तोड नाही. आदिवासी आजही आपली उपजीविका जंगलात मिळणार्‍या रानमेवाव्यावर करीत आहे. अगदी इतिहासकारांनी देखील अन्याय करण्याचे सोडले नाही. इतिहासाच्या बाबतीत आदिवासी समाजावर झालेला अन्याय अशा प्रकारे जागतिक आदिवासी दिवस ख-या अर्थाने कुठे तरी आदिवासी विचारांनी साजरा करू शकलो या समाधानाने हे सर्व इथे मांडत आहे. हा सर्व सोपस्कार इथे मांडण्यापाठीमागे एकच उद्दिष्ट कि असे उपक्रम अधिकाधिक प्रमाणात सादर झाले  त्यासाठी आपल्या मुलांनी पुढाकार घेतला पाहिजे.जगतिक आदिवासी गुणगौरव दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाला जिल्हा परिषद  सदस्य सौ गोदावरी भगवान कोकाटे , सरपंच टिटवी भगवानराव कोकाटे ,ज्ञानेश्वर डोळे उपसरपंच एकनाथ घाटे श्याम तनपुरे शाळा समिती अध्यक्ष राम घोगरे सदस्य एकनाथ तनपुरे शेकडो ग्रामस्थ कार्यक्रमाला हजर होते

 

Monday, 27 July 2020

नादुरुस्त विद्युत डीपी जळाल्यामुळे पाणीपुरवठा बंद



नादुरुस्त विद्युत डीपी जळाल्यामुळे  पाणीपुरवठा बंद  

लोणार (किशोर मोरे)
सध्याच्या परिस्थितीत मानव जातीला कोरोना या महाभयंकर आजाराला सामोरे जावे लागतअसून संपूर्ण जग या महाभयंकर आजाराला हतबल झाले असून शहरासह ग्रामीण भाग सुद्धा या  परिस्थिती चा सामना करत असतानाच ग्रामीण भागातील विविध  समस्या दिवसेन दिवस वाढत अस्तातना दाभा गावात अशीच एक नित्यच समस्या वारंवार होत आहे दाभा गावात 
स्वच्छ पाणी पुरवठा करणारी योजना गेल्या काही दिवसांपासून बंद आहे .याचे मुख्य कारण म्हणजे विजपुरवठा काही दिवसांपासून  विद्युत डीपी नादुरुस्त असल्याने .दाभा येथील ग्रामस्थना ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे .या पावसाळ्याच्या व रोगराईच्या काळात .पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करवी लागत आहे .आता वीजनादुरुस्त असली  तरी    पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला  शेतात वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिनीला जोडला असल्याने शेतातील वीज वारंवार तांत्रिक कारणाने नादुरुस्त होते तर कधी भारनियमन या कारणाने विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने परिणामी दाभा गावाचा पाणीपुरवठा नियमित होत नाही.
 दाभा गावाला स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत डीपीचा विद्युत पुरवठा गावठाण विद्युत वाहिनीला जोडण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थाच्या वतीने डॉ मारोती मोरे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Saturday, 25 July 2020

विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी लोनारमध्ये दिली समज.

विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी लोनारमध्ये दिली समज.

लोणार- (प्रणव वराडे)
          कोरोणा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शनिवार व रविवार कडक लॉक डाऊन करण्यात आले आहे. तरीही काही लोक बिनफिकिर फिरत
असताना लोणारमध्ये पोलिसांनी त्यांना पकडून आज,25 जुलै रोजी समज दिली. काम नसताना घराबाहेर पडू नये,असे आवाहन करूनही नागरिक ते पाळताना आढळत नाहीत. काही लोक दुचाकीवर शहरात फिरतच होते. हे पाहून लोणार पोलिस स्टेशन चे ठाणेदार श्री. देशमुख यांनी त्यांना पकडून समज दिली. विनाकारण बाहेर फिरून कोरोणाला आमंत्रण देऊ नका. असे आव्हाहन केले. यावेळी पोलीस अधिकारी श्री चंद्रशेखर मुरडकर, शेख,कैलास चतरकर,श्री काळे तसेच नगरपालिकेचे कर्मचारी सोबत होते

Thursday, 23 July 2020

मीच माझ्या गावाचा रक्षक या भावनेतुन ग्राम सुरक्षा दलाने काम करावे :- ठाणेदार रविंद्र देशमुख


मीच माझ्या गावाचा रक्षक या भावनेतुन ग्राम सुरक्षा दलाने काम करावे :- ठाणेदार रविंद्र देशमुख


लोणार :- (राहुल सरदार)

मीच माझ्या गावाचा रक्षक या भावनेतुन ग्राम सुरक्षा दलाने काम करावे असे आवाहन
लोणार पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी केले आहे.
लोणार पोलीस स्टेशनच्या आवारात शारा येथील 30 ग्राम सुरक्षा दलाचे जवान यांना मागदर्शन करतांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी सांगीतले की सध्या जगात कोरोना व्हायरस ने थैमान घातले असुन महसुल यंत्रणा , आरोग्य यंत्रणेसोबतच पोलीस प्रशासनावर खुप मोठा भार पडला असुन कोरोना चा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी पोलीस कर्मचारी रात्रदिवस कर्तव्य बजावत आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुंजबळ यांच्या संकल्पनेतुन  तसेच मेहकर उपविभागीय अधिकारी दिलीप तडवी यांच्या मागदर्शनाखाली लोणार
पोलीस स्टेशन हददीत प्रत्येक गावात मीच माझ्या गावाचा रक्षक या उदात हेंतुने गावातील पोलीस पुर्व प्रशिक्षण घेणारे सैन्यदलासाठी तयार करणारे तसेच स्पर्धा परिक्षेचे तयारी करणरे होतकरू विदयार्थी चा ग्राम सुरक्षा दला मध्ये स्व:यपुर्तीने आपला गावासाठी काही तरी आपले ऋुण फेडणे या भावनेतुन सदर सुरक्षा दलामध्ये काम करण्यास तयार झाले असुन या मध्ये प्रामुख्याने गावात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य कराणे गावात नविन व्यक्ती आल्यास त्यांची नोंद घेत त्यांची माहीती संबधीत विभागा देणे त्याच बरोबर रात्री ग्रस्त घालणे अनोळखी वाहन किंवा संशायास्पद वाहने व्यक्ती आल्यास त्याचे सुक्ष्म निरीक्षण करत त्याचे फोटो  मोबाईल मध्ये काढत पोलीस प्रशासनाकडे पाठवणे त्यांची सखोल चौकशी करणे या महत्वपुर्ण बाबीकडे वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक अझहर शेख यांनी ग्रामसुरक्षादलाची आवश्यकता व कार्यपध्दती उपस्थीताना समजावुन सांगीतली व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख उपनिरीक्षक अझहर शेख, रायटर चंद्रशेखर मुरडकर, शाराचे बिट चे बद्रीनाथ डिघोळे , पोहेका गुलाव झोटे , बन्सी पवार , गोपनियविभागाचे कैलास चतरकर,विठठल चव्हाण , वाहतुक शाखेचे गजानन बनसोड , शेखर थोरात, उंकडराव राठोड, चांलक गजानन ठाकरे, तेजराव भोकरे  सह ग्राम शारा येथील सुरक्षा रक्षक उपस्थीत होते.

Wednesday, 22 July 2020

विद्यर्थ्यांची परीक्षा फी परत करा-कुणाल ढेपे


विद्यर्थ्यांची परीक्षा फी परत करा-कुणाल ढेपे

लोणार (प्रणव वराडे)  

फार्मसी कृती अमरावती जिल्हा अध्यक्ष कोरोण विषणू च्या पर्षभुमिवर राज्य सरकारने  शासनाने महाविद्यालयाच्या या वर्षी च्या  परीक्षा  रद्द केल्या आहेत. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांनी   भरलेली  परीक्षा फी  परत घवी, अशी मागणी फार्मसी कुर्ती अमरावती जिल्हा अध्यक्ष कुणाल भाऊ ढेपे  यांनी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे . सरकला  दिलेल्या निवेदनात  यांनी म्हटले  आहे की राज्यातील लॉकडाऊन अंतिम वर्षासाठी परीक्षा फी घेतलेली आहे. या सर्व महाविद्यालय वेगवेगळ्या  विभागातील जवळपास 2.5 लाख  विद्यार्थी आहेत.या सर्व विद्ार्थ्यांना  सरासरी 13.50  कोटी परीक्षा  फी विद्यापीठ  कडे जमा  झालेली आहे . राज्यातील विविध विद्यापीठ मध्ये  असे लाखो विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थी  ची फी माफ होणे  गरजेचे आहे . सर्व विद्यार्थी शेतकरी , शेतमजूर , कामकर  तचेच गरीब  सर्व सामान्य वर्गातील जनतेचे  मुले आहेत. कोरोना विषाणूच्या  प्रादुर्भावामुळे  सध्या  सर्वत्र  मदाची  लाट  शुरु आहे . लाखो लोकांच्या नोकऱ्य गेल्या आहेत . अशी मागणी फार्मसी कुर्ती अमरावती जिल्हा अध्यक्ष कुणाल भाऊ ढेपे यांनी केली

Sunday, 19 July 2020

अबब तलावात ब्रिग्रेट.....तोही 20 किलो चां


अबब तलावात ब्रिग्रेट.....तोही 20 किलो चां


लोणार : सतीश मुलंगे
लोणार तालुक्यातील आदिवासी मच्छीमार संस्था टिटवी येथील तलावात विविध मत्स बिया सोडल्या असून आज सकाळी मच्छीमार तलावात मच्छी मार करायला गेले असता यात ब्रिग्रेट जातीचा मासा अध्यक्ष भगवानराव कोकाटे यांनी पकडला आहे.त्याचे वजन किमान 20 किलो असून तलावात वेगवेगळ्या जातीचे मासे आहे. अश्या नवीनच प्रकारच्या जातीचा मासा लोणार नगरीत प्रथमच पहावयास मिळत आहे

Saturday, 18 July 2020

आता लोणार तालुक्यात जनता संचारबंदी.

आता लोणार तालुक्यात जनता संचारबंदी

(लोणार :- प्रणव वराडे)
 कोरोनाचा वाढता पादुर्भाव पाहता लोणार तालुक्यातील जनतेनी बुधवार पासुन जनता कर्फु लागु करण्यात येणार असल्याचे तहसिल कार्यालयामध्ये झालेल्या बैठकी दरम्यान दिले. यादरम्यान बाहेरगावावरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकावर 14 दिवस कॉरनटाईन करण्यात यईल यांची सुध्दा दक्षता नागरिकानी घ्यावी असे आवाहन तहसिलदार लोणार यांनी केले आहे.
लोणार तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकानी तसेच व्यापारी वर्गानी स्वयफुर्तीने पाच दिवसाचा बंद करण्याचा आग्रह प्रशासनाकडे  धरला होता त्या अनुशंगाने तहसिदार सैपन नदाफ यांनी तहसिल कार्यालय लोणार येथे व्यापारी व शहरातील प्रतिष्ठीत नागरिकाची बैठक बोलाविण्यात आली होती या बैठकीसाठी तहसिलदार सैपन नदाप , मुख्याधिकारी विठठल केंदारे, पोलीस निरीक्षक रविद्र देशमुख, प्रतिष्ठीत नागरिक व सामाजीक कार्यकर्ते प्रकाशराव मापारी, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. बळीराम मापारी, भारतीय कॉग्रेस तालुका अध्यक्ष तथा जि प सदस्य राजेश मापारी, नगरपालीका उपाध्यक्ष बादशाखान नुरमंहमंदखान , नगरपालीका गटनेते भुषण मापारी, कृ. उ. बाजार  , डॉ. अनिल मापारी , साहेबराव पाटोळे,समिती सभापती संतोष  मापारी,मेडीकल असोशीयनचे अध्यक्ष कैलास बचाटे, बबलु बोरा, रोशन गेलडा, प्रंशात बनमेरू , गोपाल तोष्णीवाल , गजाजन खरात, याच्या सह अनेक व्यापारी व राजकीय मंडळी उपस्थीत होते यावेळी या बैठकीमध्ये असे ठरविण्यात आले की लोणार तालुक्यातील सुलतानपुर, हिवराखंड , भुमराळा, अंजनी खुर्द, ब्राम्हणचिकणा या गावामध्ये कोरोना पॉझीटीव रूग्न सापडले त्यामुळे लोणार तालुक्यात याचा प्रादुर्भाव वाढु नये या प्रमुख उददेशासाठी तसेच बाहेर गावावरून येणाऱ्याची संख्या वाढत असल्याने खबरदारी म्हणुन नागरिकानी तसेच व्यापारी बांधवानी आपला लोणार तालुक्यात कोरोना पॉझीटीव संख्या वाढु नये यासाठी पाच दिवसाचा जनता कर्फु पाळण्याचे एकमताने ठरले यामध्ये तहसिलदार सैपन नदाप यांनी नागरिकाच्या व व्यापारी वर्गाच्या भावना लक्षात घेता पाच दिवसाचा जनता कर्फु मध्ये कडक बंद पाळण्यात येणार आहे यामध्ये वैदयकीय सुविधा वगळण्यात आले असुन सर्व व्यापार पेठ कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान शासकीय कार्यालयाचे कामे सुरू राहतील मात्र नागरिकासाठी कार्यालये बंद राहणार असल्याने कोणत्याही व्यक्तीने शासकीय कामासाठी शहरात दाखल होउ नये तसेच बाहेरगावावरुन येणाऱ्या नागरिकाना 14 दिवस कॉरनटाईन करण्यात येणार असल्याची माहीती यावेळी सर्वानुमते ठरविली तसेच बाहेरगावावरून येणाऱ्या व्यक्तीनी स्वता ग्रामीण रूग्नालयात नोद करावी अन्यथा कारवाई करण्यात येईल अशा सुचना या बैठकीत दिल्या आहे.जनता कर्फु दरम्यान प्रशासनाने कारवाई केल्यास यामध्ये कोणत्याही राजकीय पुढारी अथवा लोकप्रतिनिधी यांनी शिफारशी करण्यात येउ नये असे ठरले त्यामुळे राजकीय पुढारी यांनी सुध्दा या सुचनेचे स्वागत केले

Friday, 17 July 2020

लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलचे सीबीएसई दहावी परीक्षेत घवघवीत यश




लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलचे सीबीएसई दहावी परीक्षेत घवघवीत यश


लोणार (भूषण शेटे शहर प्रतिनिधी)
लोणार शहरातील सीबीएसई विद्यालय लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलने आपल्या यशाची परंपरा कायम राखली असुन विद्यालयाचा दहावीचा सलग तिसऱ्या वर्षी १००% निकाल लागला आहे.
लौकिक सचिन बोरा (९२.६०%) या विद्यार्थ्याने शाळेतून बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावले, द्वितीय स्थानी तिलक सुधीर संचेती (८८.६०%) हा विद्यार्थी असुन तृतीय स्थान कुणाल तुलसीदास घेवंदे (८८.४०%) या विद्यार्थ्याने मिळविले. एकुण तेवीस विद्यार्थ्यांपैकी चौदा विद्यार्थ्यांनी ऐंशी टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य दत्तात्रय कुलकर्णी, उपप्राचार्य नबिल शेख व इतर शिक्षकवृंदांना दिले. जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण यांनी विद्यालयाच्या निकालाचा आलेख दरवर्षी कसा उंचावत आहे याचे वर्णन केले.
संस्थेचे अध्यक्ष शेख मसुद शेख उस्मान व संचालक मोहम्मद फैसल यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले व भावी शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

Wednesday, 15 July 2020

चीन सीमेवर बुलडाणा जिल्ह्याचे जवान सतीश पेहरे शहीद; उद्या येणार पार्थिव.

गलवान खोर्‍यात चीनच्या सीमेवर बुलडाणा जिल्ह्याचा जवान शहीद

चिखली ( तालुका प्रतिनिधी)

गलवान खोर्‍यात चीनच्या सीमेवर बुलडाणा जिल्ह्याचा जवान शहीद झाल्याची वार्ता आज, 15 जुलै रोजी सकाळी नऊला जिल्ह्यात धडकली अन् अमोनावासियांना धक्काच बसला. सतीश सुरेश पेहरे (27) असे या जवानाचे नाव असून, ते आठ वर्षांपासून भारतीय सैन्यात कार्यरत होते. काल रात्री सीमेवर सुरू असलेल्या पुलाच्या कामादरम्यान अपघात होऊन ते शहीद झाले. आज सकाळी सैन्याकडून अधिकृत माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. दरम्यान, पार्थिव उद्या, 16 जुलैला रात्रीपर्यंत गावात येणार असून, परवा सकाळी अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती सैन्य दलाच्या स्थानिक सूत्रांनी दिली.

पेहरे कुटुंब अमोन्याचे असून, शेतीनिमित्त वरूड बुद्रूकला सध्या राहते.   वरूड बुद्रूक जालना जिल्ह्यात येत असल्याने जालना आणि बुलडाणा येथील सैन्य दलाचे अधिकारी दुपारी गावात धडकले आणि त्यांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. वरूड बुद्रूक विदर्भ- मराठवाडा सीमेवर आहे. सतीश यांचे वडील सुरेश पेहरे (60) यांना आज सकाळी सैन्याकडून कॉल आला आणि त्यांना सतीश हे शहीद झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर हे कुटुंबच नव्हे तर अवघे गाव सुन्न झाले. सुरेश पेहरे यांना तीन मुले असून, तिघेही  सैन्यात आहेत हे विशेष. या तीन भावांना एक बहीण आहे. सतीश यांचे लग्न तीन वर्षांपूर्वी मेहकर येथील जया यांच्यासोबत झाले असून, त्यांना दीड वर्षाचा अर्णव नावाचा मुलगा आहे. सुरेश पेहरे यांचा व्यवसाय शेती आणि कुंभारकाम आहे. कुंभार काम करताना मूर्ती, मडके घडवतात त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या तीनही मुलांना चांगले शिक्षण देऊन सैन्याच्या सेवेसाठी पाठवले. सतीश यांची आई घरकाम करते व शेतीव्यवसायात मदत करते. 2012 मध्ये सतीश यांनी सैन्यदलात प्रवेश मिळवला. आठ वर्षांची त्यांची सेवा झाली असून, लॉकडाऊनमधध्ये ते दोन महिने घरी होते. त्यानंतर दीड महिन्यापूर्वी ते पुन्हा ड्यूटीवर गेले. त्यानंतर दीर्घकाळ त्यांचा फोन आला नाही आणि लागलाही नाही.
काल सकाळी मात्र त्यांचा कॉल आला आणि त्यांनी पत्नीशी काही वेळ संवादही साधला. त्यानंतर आज सकाळी थेट त्यांच्या शहीद होण्याची वार्ताच कुटुंबियांच्या कानावर आली.  सतीश यांच्या घराचे काम सुरू होते. हे कुटुंब नव्या घरात राहण्याची स्वप्नं सजवत असतानाच ही दुर्दैवी बातमी कानावर आली. अवघ्या गावात सतीश यांच्यासह तीन भावांचे चांगले नाव घेतले जाते. सतीश यांच्या शहीद होण्यामुळे अमोनाच नाही तर वरूडवरही शोककळा पसरली आहे.

किनगाव जट्टू तील अतिक्रमणं काढण्यात यावे कैलास सातपुते.


किनगावजट्टू तील अतिक्रमणं काढण्यात यावे कैलास सातपुते.


लोणार प्रतिनिधी  (प्रणव वराडे )
किनगाव जट्टू गावातील वाढत्या अतिक्रमणामुळे रस्त्यावरून ये जाय करण्यासाठी खूप अडचणीला सामोरे जावे लागत आहे सर्वजण एक सुज्ञान नागरिक असून सुद्धा घर सोडून तिन ते चार फूट रस्त्यावर ताबा करून बसले आहेत यामुळे बैलगाडी टू व्हीलर फोर व्हीलर यांना येण्या-जाण्यासाठी अडचण होत आहे परंतु यामुळे वाद-विवाद वाढत आहे कुणी बिमार असले तर गल्लीत टुविलर सुद्धा आणता येत नाही इतकी द्यनिय   अवस्था अतिक्रमणांमुळे किनगाव जट्टू वासियांची झाली आहे जवळपास सर्वच वार्डत अतिक्रमणधारक वाद घालून जागा आपल्याच मालकीची आहे असे सांगतात म्हणून गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत सचिव नवले साहेब व ग्रामपंचायत सदस्य गजानन मुर्तडकर यांना निवेदन दिले आहे .त्यात ग्रामपंचायत ने अतिक्रमान बाबत लवकरात लवकर ठराव घेऊन अतिक्रमण काढण्यात यावे रस्त्यावरच असलेले नळाचे गड्डे बुजवावीत व स्वतः नागरिकांनी जागृत राहून आपल्यालाच त्रास होणार नाही याची ग्रामपंचायत ने दखल घ्यावी व अतिक्रमण काढावे जर अतिक्रमणाबाबत ठराव मंजूर न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा गावातील नागरिक कैलास सातपुते कैलास गायकवाड  यांनी दिला आहे.

भुमराळा येथील देवानंद सानप यांच्या घरी घर फोडी करणार्यां चोरट्यांना बिबी पोलीसांनी केली अटक


भुमराळा येथील देवानंद सानप यांच्या घरी घर फोडी करणार्यां चोरट्यांना बिबी पोलीसांनी केली अटक

लोणार (प्रणव वराडे) :-
बिबी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भुमराळा येथे दिनांक १४ में  च्या मध्ये रात्री चोरटय़ांनी घर फोडून घरातील एवज लांपस केल्याची घटना घडल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस झाले होते. 
भुमराळा येथील पत्रकार देवानंद सानप यांच्या राहत्या घरी १४ में गुरुवार ला मध्ये रात्री  चोरटय़ांनी चोरी करून 22700 (बावीस हजार सातशे रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. १५ में च्या सकाळी देवानंद सानप ५ वाजता झोपेतून उठले असता घराचा मागचा दरवाजा उघडण्यासाठी गेले असता चोरटय़ांनी घराचा दरवाजा बाहेरुन लॉक केला होता सदर घराचा समोरील दरवाजा उघडून देवानंद सानप यांनी घराच्या पाठीमागे गेले असता धान्य ठेवलेल्या घराचे कुलुप कोंडा तोडून घर उघडेच असल्याचे दिसून आले घरातील सोयाबीन. हरभरा. गहू. अन्न धान्य व घरगुती साहित्य भांडे व इतर साहित्य चोरटय़ांनी चोरून नेल्याचे लक्षात येताच देवानंद सानप यांनी बिबी पोलीस स्टेशन गाठले व सदर घटनेची माहिती दिली बिबी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल डी तावरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन  पंचनामे करून अज्ञात आरोपीविरुद्ध कलम  ४५७ .  ३८० भादवीनुसार गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला होता. 
अतिशय बारकाईने तपास करुन चोरटय़ांच्या मुसक्या आवळणयात बिबी पोलीसांना यश आले असुन परिसरातील अनेक चोरीच्या घटना उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
आज दिनांक १५ /७ /२०२० रोजी आरोपी मधुकर तुळशीराम पवार वय ५२ वर्षे, रवींद्र तुळशीराम पवार वय ३० वर्षे, दोन्ही रा. वझर आघाव ता. लोणार यांना बिबी पोलीसांनी अटक केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एल डी तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सिदीक शेक, पो हे का कलिम देशमुख, मोहम्मद परशुवाले, शेक उमर, सुनिल काकड, करीत आहेत

सिंगी ट्यूशन क्लासेस च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.


सिंगी ट्यूशन क्लासेस च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.     

लोणार (प्रणव वराडे) :-
                        आज १० वी CBSC बोंर्डाचे रिझल्ट आज लागलेले आहे.दर वर्षी प्रमाने याही वर्षी  सिंगी ट्यूशन क्लासेस च्या विद्यार्थिनिनी परंपरा कायम ठेवली आहे. त्यात कु. समृद्धी खिवसरा 95.8% मेहूल तोष्णीवाल 94.2%  कु.आचल संचेती , कु.खूशी शर्मा , कु.सांक्षी इंगोले , कु.साक्षी चव्हान , जिनेद्र चोरडीया , कु. प्राजल दूगड, वरुण खिवसरा या विद्यार्थानी बाजी मारली. त्यांचे श्रेय त्यांनी सिंगी ट्यूशन क्लासेस च्या संचालिका सौ. श्वेता सिंगी व पालकवर्ग यांना देत आहे.

Monday, 13 July 2020

२४ तासाच्या आत ट्रांन्सफार्मर बदलून द्या. -आ.डाँ.संजय रायमुलकर




२४ तासाच्या आत ट्रांन्सफार्मर बदलून द्या -आ.डाँ.संजय रायमुलकर 

 लोणार-दि.१३/७/२०२०
(प्रणव वराडे मुख्य संपादक)
लोणार-ग्रामीण भागातील नागरीकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता.स्थानीक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर दि.१३ जूलै रोजी विद्युत वितरण कंपणीच्या अभियंत्याच्या उपस्थीत  झालेल्या पञकार परीषदेत आ.डाँ.संजय रायमुलकर यांनी सांगीतले की ग्रामीण भागातील ट्रांन्सफार्मर २४ तासात बदलुण द्या.
पञकार परीषदेत बोलताना पुढे आ.रायमुलकर म्हणाले की मेहकर -लोणार साठी ट्रांन्सफार्मर आणण्यासाठी एकाच वाहणाची व्यवस्था असल्याने तीन-चार ट्रांन्सफार्मर फेल निघत आहे.यामुळे ग्रामीण भागातील जनता ञस्त झाली असुन अत्यवश्यक सेवा असतानाही अभियंतेच्या जाणीवपूर्वक व लाचखाऊ धोरणामुळे जनतेला दहा ते पंधरा दिवस अंधारात रहावे लागते.मेनटनसचे कामे करणारे एजन्सी धारक मनमानी कारभार करीत आसुन याकडेही अधीकारी डोळेझाक करीत आहे.तालुक्यातील नांद्रा,सरस्वती ,मातमळ,शारा,टिटवी व ईतरही गावात मागील १५ ते २० दिवसापासुन ट्रांन्सफार्मर बदलुण दिले नाही.ग्रामीण भागातील विजेच्या समस्या लक्षात घेता अभियंता ,कर्मचारी व आँफरेटर नागरीकांचे  फोनही उचलत नाही.जाणीवपूर्वक ञास देणाऱ्या लाईमनवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश आ.रायमुलकर यांनी विद्युत वितरण कंपनीचे अभियंता यांना दिले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळीरामजी मापारी ,सरंपंच संघटनेचे अध्यक्क्ष भगवानराव कोकाटे ,शिवसेना शहराध्यक्ष पांडुरंगजी सरकटे ,नगरसेक डाँ.अनील मापारी,प्रा.गजानन खरात ,युवासेना शहर प्रमुख गजानन मापारी ,अभियंता अजय हाडोळे उपस्थीतीत होते..


नियमाचे उल्लंघन केल्याबाबत १०,००० रुपयाचा दंड वसूल.



लोणार (तालुका प्रतिनिधी सतीश मुलंगे)


नियमाचे उल्लंघन केल्याबाबत १०,५०० रुपयाचा दंड वसूल.

कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी नगर पालिका लोणारच्या वतीने शहरातील सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उघडणे बाबत सूचना देण्यात आल्या आहेत दि. 13 जुलै रोजी नगर परिषद हद्दीतील दुकानावर कायद्याचे उल्लघण करणाऱ्या गजानन कृषी केंद्र आणि सुमित कृषी केंद्र  याना प्रत्येकी ५००० रुपये दंड लावण्यात आला  या वेळेस त्याठिकाणी नगर परिषदेचे कर्मचारी  इंनेवार, शेख सलीम, व्यास, अशोक निचंग, सुधीर काळे, भगवान मोरे हे कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यवाही मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांच्या आदेशानव्ये केली असल्याचे कर्मचारी यांनी सांगितले. लोणार शहरातील सर्व जनतेने कोरोना संसर्गजन्य साथीच्या आजाराचा शिरकाव होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच  याकरिता नगर परिषदेने वेळोवेळी दिलेल्या सुचने प्रमाणे पालन करून नगर पालिका प्रशासनास सहकार्य करावे असे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी सर्व जनतेस आवाहन केले.

उच्च न्यालयाच्या आदेशाने काढलेल्या अतिक्रमण भागांत खोदला खड्डा नागरिकांचे आरोग्य धोक्यात .



उच्च न्यालयाच्या आदेशाने काढलेल्या अतिक्रमण भागांत खोदला खड्डा नागरिकांचे आरोग्य धोक्यात . 

लोणार (तालुका प्रतिनिधी सतीश मुलंगे)
लोणार सरोवर विकासाचा आराखडा हा उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांच्या अखत्यारीत असुन 18 महिण्या पुर्वी लोणार सरोवर जवळिल अतिक्रमण काढण्यात आले ह्या मोकळ्या जागेत लोणार नगर परिषद ने  मोठा खड्डा खोदून नागरिकांचे आरोग्य धोक्यात घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.पाच वर्षांपूर्वी शहरातील साड पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी तिन कोटी रुपये खर्च करून पाच लाख लिटर क्षमता असलेला निरी प्रकल्प पूर्ण केला मात्र राजकीय प्रतिनिधी यांच्या व अधिकारी यांच्या समन्वय अभावामुळे कोटी रुपये शासनाचे माती मोल झालेल्यांचे बोलके चित्र लोणार नगर परिषद मध्ये दिसत आहे. यावर उच्च न्यायालय खंडपीठ समिती ने लोणार सरोवर मध्ये जाणारया पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी सुचना करताच लोणार नगर परिषद नागरिकांच्या जिवाशी खेळत आसुन निरी प्रकल्पचा वापर न करता अतिक्रमण काढण्यात आलेल्या जागेत खड्डा खोदून नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालत आसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Sunday, 12 July 2020

लोणार शहरातील ११ अंगणवाडी प्रस्तावास मान्यता द्या .

लोणार शहरातील नागरीकांची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन शहरातील ११ अंगणवाडी प्रस्तावास मान्यता देण्यात यावी 


लोणार शहरातील नागरीकांची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन शहरातील ११ अंगणवाडी प्रस्तावास मान्यता देण्यात यावी 

लोणार (सतीश मुलंगे तालुका प्रतिनिधी) :
            लोणार : लोणार शहरातील नागरीकांची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन शहरातील ११ अंगणवाडी प्रस्तावास मान्यता देण्यात यावी अशी मागणी नगर पालिकेकडून राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. या वेळी काँग्रेस चे ज्येष्ठ नेते लक्ष्मण घुमरे,प्रकाश धुमाळ,साहेबराव पाटोळे, उपाध्यक्ष बादशहा शेठ,नगरसेवक तोफिक शेठ संतोष मापारी  हे उपस्थित होते.  शहरातील दिवसेनदिवस होत असलेली नागरिकांची वाढती लोकसंख्या यामुळे नवीन ११ अंगणवाडी प्रस्तावात मंजुरात देण्यात यावी. सुरवातीला लोणार मध्ये सहा वार्डा होते आता नवीन १७ वार्ड करण्यात आलेले आहे. शहरात सध्या अस्तित्वात असलेल्या अंगणवाड्याची संख्या कमी पडत आहे या करीता नवीन अंगणवाड्या असने गरजेचे आहे. 

Saturday, 11 July 2020

विद्यार्थ्याचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण कित पत योग्य आहे- फार्मसी कृती अमरावती जिल्हा अध्यक्ष कुणाल ढेपे

विद्यार्थ्याचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण कित पत योग्य आहे का ? फार्मसी कृती अमरावती जिल्हा अध्यक्ष कुणाल ढेपे .


लोणार - (मुख्य संपादक प्रणव वराडे)

विद्यार्थ्याचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण कित पत योग्य आहे का ? फार्मसी कृती अमरावती जिल्हा अध्यक्ष कुणाल ढेप

यूजीसी ने अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्या परीक्षा  घेण्यात याव्यात असेल सागितले गेले आहे. परंतु महाराष्ट्र मध्या राज्य सरकारने आणि फार्मसी कृती  याला विरोध केला आहे. 
काल झालेल्या फार्मसी कृती समिती च्या कार्यकारणी ने या निर्णया विरोधात आंदोलन करण्याचे ठरवले आहे. येत्या 13 जुलै ला फार्मसी कृती समिती महाराष्ट्र भर आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन फक्त फार्मसी विद्यार्थ्या साठीच नाही तर महाराष्ट्रातील सर्व विधायर्थ्याना न्याय मिळवून देण्यासाठी आहे असे फार्मा सी कृती समितीच्या प्रदेश कार्यकारणी ने सागितले अनेक विद्यार्थी संघटना या आंदोलनात पाठिंबा देत आहेत. या आंदोलनातून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणं साठी   हजोरो  संख्या  उपस्थीत राहावे आवाहन फार्मसी कुर्ती अमरावती जिल्हा अध्यक्ष कुणाल भाऊ ढेपे यांनी केली

नियमाचे पालन न केल्यामुळे नगर परिषदेने केले किराणा दुकान सील


नियमाचे पालन न केल्यामुळे नगर परिषदेने केले किराणा दुकान सील.

लोणार :- (सतीश मुलंगे) 
कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी नगर पालिका लोणारच्या वतीने शहरातील सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उघडणे बाबत सूचना देण्यात आल्या आहेत दि. 9 जुलै रोजी सकाळी 8 वाजता नगर परिषद हद्दीतील सहकार नगर मधील ओम किराणा प्रो.प्रा. बि. एम. कांगने यांनी त्यांचे किराणा दुकान सकाळी 9 वाजेच्या पूर्वी उघडल्याचे नगर परिषद कर्मचारी यांना निदर्शनास आल्यामुळे नगर पालिका मार्फत सदर दुकान सील करण्याची कार्यवाही करण्यात आली सील करतांना त्याठिकाणी नगर परिषदेचे कर्मचारी  इंनेवार, खान, व्यास, अशोक निचंग, सुधीर काळे, भगवान मोरे हे कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यवाही मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांच्या आदेशानव्ये केली असल्याचे कर्मचारी यांनी सांगितले. लोणार शहरातील सर्व जनतेने कोरोना संसर्गजन्य साथीच्या आजाराचा शिरकाव होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच  याकरिता नगर परिषदेने वेळोवेळी दिलेल्या सुचने प्रमाणे पालन करून नगर पालिका प्रशासनास सहकार्य करावे असे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी सर्व जनतेस आवाहन केले.

मत्स्यव्यवसाय बांधवानी शासकीय योजनेचा लाभ घ्यावा :- भगवानराव कोकाटे



मत्स्यव्यवसाय बांधवानी शासकीय योजनेचा लाभ घ्यावा :- भगवानराव कोकाटे 

दिनाक 11/07/2020  लोणार :- (सतीश मुलंगे)
आदिवासी मत्स्यव्यवसाय संस्था टिटवी व क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी मत्स्यव्यवसाय संस्था शिवनी जाट यांच्या 
संयुक्त विद्यमाने मौजे टिटवी याठिकाणी जागतिक मत्स्यव्यवसाय दिनानिमित्त शेतकरी मत्स्य व्यवसाय दिनानिमित्त कार्यशाळा 
संपन्न झाली.
जागतिक मत्स्त्यदिनानिमित्त टिटवी येथे आदिवासी मत्स्यव्यवसाय संस्था टिटवी व क्रांतीविर बिरसा मुंडा आदीवासी मत्स्यव्यवसाय 
संस्था टिटवी येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्य शाळेला संबोधित करताना भगवानराव कोकाटे अध्यक्ष 
आदिवासी मच्छिमार संस्था टिटवी यांनी सांगीतले की शासनाकडुन मत्स्यव्यवसाय बांधवासाठी अनेक योजना राबवित आहे मात्र 
हयाचा लाभ प्रत्येक मत्स्यव्यवसाय धारकापर्यत पोहचत नाही तरी शासनाच्या योजनाचा लाभ सर्व मत्स्यबांधवानी घ्यावा जेणे करून 
यातुन आपली प्रगती होउ शकेले यासाठी मी सुध्दा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन व प्रत्येकाला शासकीय योजनेचा लाभ 
मिळवुन देण्याचा प्रयत्न करीन यावेळी  विष्णू कोकाटे अध्यक्ष क्रांतिवीर बिरसा मुंडा  मत्स्यव्यवसाय संस्था शिवनी जाट व आयुब 
पठाण निळकंठ मच्छीमार संस्था पिंपळनेर वतीने संस्थेचे सभासद उद्धव कोकाटे श्याम तनपुरे घोगरे माघाडे इंगळे सर्व सभासद हजर 
होते

कोविड नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करावी- महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर


कोविड नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करावी - महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर

बुलडाणा, दि. 11  (प्रणव वराडे मुख्य संपादक) :

कोरोना संसर्गाला थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासन उत्तम रित्या काम करीत आहे. भविष्याचा वेध घेवून प्रशासनाने समन्वय ठेवून आणखी प्रभावी काम करावे. कोविड संकटात संधी शोधून आपली आरोग्य यंत्रणा सक्षम करून घ्यावी. ग्रामीण रूग्णालयापर्यंत व्हेंटीलेटरची सुविधा द्यावी, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज दिल्या.
  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोविड आजाराबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार राजेश एकडे, जि.प अध्यक्षा मनिषा पवार, उपाध्यक्षा कमलताई बुधवत, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदी उपस्थित होते.
  बुलडाणा येथे लवकरच कोरोना तपासणी प्रयोगशाळा होत असल्याचे सांगत मंत्री म्हणाल्या, यामुळे जिल्ह्यातील तपासण्या जलद होतील. त्याचा लाभ होईल. विलकीकरण कक्षात ठेवलेल्या संशयीत व्यक्तींना चांगल्या सुविधा द्याव्यात. नागरिकांमध्ये मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंग पाळणे, गर्दी न करणे आदी बाबींची सवय लागत आहे. ही सवय पुढे अशीच राहण्यासाठी प्रशासनाने काम करावे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांमध्ये आणखी जनजागृती करावी. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी बैठकीत सादरीकरण केले. 
  यावेळी पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग आदींकडून कोविड नियंत्रणाचा आढावा घेण्यात आला. बैठकीला संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या मेहकर तालुक्यातील आरेगाव येथील रहिवासी

शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या 
मेहकर तालुक्यातील आरेगाव येथील रहिवासी 

११/०७/२०२० प्रणव वराडे मुख्य संपादक 

संग्रामपुर तालुक्यातील आदिवासी बहुल हळ्यामाल येथील जि प मराठी शाळेत शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या 38 वर्षीय शिक्षकाने वरवट बकाल एकलारा रसत्यालगत शेतातील झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि ११ सकाळी १० वाजता उघडकीस आली आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव संतोष रामदास खोरणे असुन मेहकर तालुक्यातील आरेगाव आहे तर ह मु वरवट बकाल असुन वरवट बकाल येथुन आदिवासी बहुल गाव हळयामाल येथील शाळेत ये जा करित होते तर  कोरोनाच्या पाश्वभुमिवर लॉक डाऊन काळात तंत्रस्नेहि म्हणुन शिक्षक खोरणे हे विद्यार्थी ना ऑनलाईन प्रणालीचा वापर करुन प्रवेश प्रक्रिया व शालेय कामकाज निमित सदर शिक्षक वरवट बकाल येथे मुक्कामी होते त्यांनी वरवट बकाल एकलारा रोड लगत शेतातील झाडा ला गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या घटना स्थळी पोलीसांनी भेट देऊन पंचनामा केला सदर शिक्षकाने आत्महत्या का केली याचे कारण समजु शकले नाही त्याच्या पश्चात पत्नी; 2 मुले आहेत

14 वित्त आयोगाच्या कामांना मुदतवाढ मिळण्याची मागणी :- विठठल घायाळ बाजार समिती संचालक

14 वित्त आयोगाच्या कामांना मुदतवाढ मिळण्याची मागणी  :- विठठल घायाळ बाजार समिती संचालक


लोणार :- सतीश मुलंगे  शहर  प्रतिनिधी

14 वित्त आयोगाच्या कामांना मुदतवाढ मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विठठल घायाळ यांनी

एका निवेदनाव्दारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
14 वित्त आयोग निधीचा शेवटचा हप्ता फेब्रवारी 2020 च्या शेवटच्या तारखेला सरपंच / सचिव यांच्य सयुक्त
खात्यात जमा झाला शवेटचा हप्ता जमा होताच सरपंच व सचिव यांनी कृती आराखडयामधील कामाचे अंदापत्रक तयार करून त्या कामांना तांत्रीक व प्रशासकीय मंजुरात त्याच महीण्यात मिळाली कामाला सुरूवात केली असता कामे अर्धवट होत नाही तोच मार्च महीण्याचा लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे सर्व प्रशासकीय कामे बंद करावे लागले याचे कारण असे की लॉकडाउन काळात सिमेंट ,लोखड , इतर मटेरियलचे दुकाने बंद असल्यामुळे मार्च महीन्यात कामे पुर्ण करात आली नाही सरपंच यांनी स्वताचे पैसे गुतवुन बरीच
कामे पुर्ण करण्याचा प्रयत्न केला परंतु मार्च 2020 मध्ये कामे पुर्ण करू शकले नाही व आता शासनाकडुन सदर कामे बंद करण्याचे सांगण्यात आलेले आहे यामुळे महाराष्ट्रातील हजारो सरंपचांनी केलेल्या कामचे बिल निघत नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे तसेच 14 व्या वित्त आयोगाचे कामे बंद केल्याने गावाचा विकास खुटला आहे तरी शासनाने त्वरीत 14 व्या वित्त आयोगाच्या कामांना पुर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक
विठठल घायाळ यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे

विद्यार्थ्याचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण कित पत योग्य आहे-प्रतिक बुरकुल बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष फार्मसी कृती समिती महाराष्ट्र


लोणार - सतीश मुलंगे (लोणार शहर प्रतिनिध)
विद्यार्थ्याचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण कित पत योग्य आहे-प्रतिक बुरकुल बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष फार्मसी कृती समिती महाराष्ट्र .

9 जुलै (महाराष्ट्र)

यूजीसी ने अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्या परीक्षा  घेण्यात याव्यात असेल सागितले गेले आहे. परंतु महाराष्ट्र मध्या राज्य सरकारने आणि फार्मसी कृती समितीने याला विरोध केला आहे.

काल झालेल्या फार्मसी कृती समिती च्या कार्यकारणी ने या निर्णया विरोधात आंदोलन करण्याचे ठरवले आहे. येत्या 13 जुलै ला फार्मसी कृती समिती महाराष्ट्र भर आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन फक्त फार्मसी विद्यार्थ्या साठीच नाही तर महाराष्ट्रातील सर्व विधायर्थ्याना न्याय मिळवून देण्यासाठी आहे असे फार्मा सी कृती समितीच्या प्रदेश कार्यकारणी ने सागितले अनेक विद्यार्थी संघटना या आंदोलनात पाठिंबा देत आहेत. या आंदोलनातून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ प्रतिक बुरकुल बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष आकाश हिवराळे उपाध्यक्ष प्रसाद मदने कार्याध्यक्ष अवेज सय्यद तसेच परमेश्वर खाकरे, प्रसाद मदने, विशाल रासे, किशोर शिंदे यांनी सांगितलं.
आज महाराष्ट्र मध्ये २११९८७ इतकी कोरोणा रुग्णांची संख्या आहे अशा परिस्थितीत खरंच विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेणे शक्य आहे का?? हा विचार केंद्र सरकारने करायला हवा. एकीकडे लोक एकत्र यायला नको म्हणून लॉकडाउन वाढवायचा आणि दुसरीकडेविद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांच्या जिवाला आणि पोचवायची यात कसला आलं शहाणपण हे देखील केंद्र सरकारने स्पष्ट करायला हवं.
या निर्णयाविरोधात अच येणाऱ्या 13 जुलै रोजी फार्मसी कृती समितीतर्फे राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा फार्मसी कृती समितीचे प्रदेश अध्यक्ष आकाश हिवराळे,यांनी दिला आहे.
केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून हातात मेणबत्ती व तोंडावर पट्टी बांधून सोशल मीडियावर राज्यभरातील विद्यार्थी निषेध व्यक्त करणार आहेत.

डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ

  डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ लोणार - प्रणव वराडे उपमुख्यमंत्री कार्यालय ...