


लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलचे सीबीएसई दहावी परीक्षेत घवघवीत यश
लोणार (भूषण शेटे शहर प्रतिनिधी)
लोणार शहरातील सीबीएसई विद्यालय लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलने आपल्या यशाची परंपरा कायम राखली असुन विद्यालयाचा दहावीचा सलग तिसऱ्या वर्षी १००% निकाल लागला आहे.
लौकिक सचिन बोरा (९२.६०%) या विद्यार्थ्याने शाळेतून बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावले, द्वितीय स्थानी तिलक सुधीर संचेती (८८.६०%) हा विद्यार्थी असुन तृतीय स्थान कुणाल तुलसीदास घेवंदे (८८.४०%) या विद्यार्थ्याने मिळविले. एकुण तेवीस विद्यार्थ्यांपैकी चौदा विद्यार्थ्यांनी ऐंशी टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य दत्तात्रय कुलकर्णी, उपप्राचार्य नबिल शेख व इतर शिक्षकवृंदांना दिले. जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण यांनी विद्यालयाच्या निकालाचा आलेख दरवर्षी कसा उंचावत आहे याचे वर्णन केले.
संस्थेचे अध्यक्ष शेख मसुद शेख उस्मान व संचालक मोहम्मद फैसल यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले व भावी शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment