लोणार शहरातील नागरीकांची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन शहरातील ११ अंगणवाडी प्रस्तावास मान्यता देण्यात यावी
लोणार शहरातील नागरीकांची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन शहरातील ११ अंगणवाडी प्रस्तावास मान्यता देण्यात यावी
लोणार (सतीश मुलंगे तालुका प्रतिनिधी) :
लोणार : लोणार शहरातील नागरीकांची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन शहरातील ११ अंगणवाडी प्रस्तावास मान्यता देण्यात यावी अशी मागणी नगर पालिकेकडून राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. या वेळी काँग्रेस चे ज्येष्ठ नेते लक्ष्मण घुमरे,प्रकाश धुमाळ,साहेबराव पाटोळे, उपाध्यक्ष बादशहा शेठ,नगरसेवक तोफिक शेठ संतोष मापारी हे उपस्थित होते. शहरातील दिवसेनदिवस होत असलेली नागरिकांची वाढती लोकसंख्या यामुळे नवीन ११ अंगणवाडी प्रस्तावात मंजुरात देण्यात यावी. सुरवातीला लोणार मध्ये सहा वार्डा होते आता नवीन १७ वार्ड करण्यात आलेले आहे. शहरात सध्या अस्तित्वात असलेल्या अंगणवाड्याची संख्या कमी पडत आहे या करीता नवीन अंगणवाड्या असने गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment