कृषिदूतांनी पटवून दिले निंबोळी अर्काचे फायदे
दाभा प्रतिनिधी (किशोर मोरे)
लोणार :- तालुक्यातील गायखेड येथे समर्थ कृषी महाविद्यालयाच्या दे.राजा वतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत निंबोळी अर्क कसा बनवावा? व त्याचा शेतीला कसा व किती प्रमाणात फायदा होतो? याबद्दलची सविस्तर माहिती कृषीदूतांनी दिली. दिवसेंदिवस शेतकर्याद्वारे रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा खुप जास्त प्रमाणात वापर करण्यात येतो त्यामुळे जमीनीची सुपीकता कमी होते आणि त्या विषारी रासायनिक खतांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठमोठ्या आजाराला सामोरे जावे लागत आहे कीटकनाशकांमुळे शेतीचा खर्चही वाढत आहे . या कीटकनाशकांमुळे जे शेतीसाठी उपयोगी किडे आहेत त्यांची संख्या सुद्धा कमी होत आहे यावेळी समर्थ कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांनी निंबोळी अर्क कसा बनवावा व त्याचा वापर कसा व किती प्रमाणात करावा याबद्दल प्रात्यक्षिक करुन शेतकर्याना माहिती दिली शेतकर्यानी त्यांच्या मनातील असलेल्या अनेक शंकांचे प्रश्न विचारुन निवारण करुन घेतले. यावेळी कृषीदूतांना महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे, रावे समन्वयक प्राचार्य मोहजीतसिंग राजपूत, प्रा.विलास चव्हाण यांचे मार्गदर्शन
No comments:
Post a Comment