मत्स्यव्यवसाय बांधवानी शासकीय योजनेचा लाभ घ्यावा :- भगवानराव कोकाटे
दिनाक 11/07/2020 लोणार :- (सतीश मुलंगे)
आदिवासी मत्स्यव्यवसाय संस्था टिटवी व क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी मत्स्यव्यवसाय संस्था शिवनी जाट यांच्या
संयुक्त विद्यमाने मौजे टिटवी याठिकाणी जागतिक मत्स्यव्यवसाय दिनानिमित्त शेतकरी मत्स्य व्यवसाय दिनानिमित्त कार्यशाळा
संपन्न झाली.
जागतिक मत्स्त्यदिनानिमित्त टिटवी येथे आदिवासी मत्स्यव्यवसाय संस्था टिटवी व क्रांतीविर बिरसा मुंडा आदीवासी मत्स्यव्यवसाय
संस्था टिटवी येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्य शाळेला संबोधित करताना भगवानराव कोकाटे अध्यक्ष
आदिवासी मच्छिमार संस्था टिटवी यांनी सांगीतले की शासनाकडुन मत्स्यव्यवसाय बांधवासाठी अनेक योजना राबवित आहे मात्र
हयाचा लाभ प्रत्येक मत्स्यव्यवसाय धारकापर्यत पोहचत नाही तरी शासनाच्या योजनाचा लाभ सर्व मत्स्यबांधवानी घ्यावा जेणे करून
यातुन आपली प्रगती होउ शकेले यासाठी मी सुध्दा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन व प्रत्येकाला शासकीय योजनेचा लाभ
मिळवुन देण्याचा प्रयत्न करीन यावेळी विष्णू कोकाटे अध्यक्ष क्रांतिवीर बिरसा मुंडा मत्स्यव्यवसाय संस्था शिवनी जाट व आयुब
पठाण निळकंठ मच्छीमार संस्था पिंपळनेर वतीने संस्थेचे सभासद उद्धव कोकाटे श्याम तनपुरे घोगरे माघाडे इंगळे सर्व सभासद हजर
होते
No comments:
Post a Comment