नियमाचे पालन न केल्यामुळे नगर परिषदेने केले किराणा दुकान सील.
लोणार :- (सतीश मुलंगे)
कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी नगर पालिका लोणारच्या वतीने शहरातील सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उघडणे बाबत सूचना देण्यात आल्या आहेत दि. 9 जुलै रोजी सकाळी 8 वाजता नगर परिषद हद्दीतील सहकार नगर मधील ओम किराणा प्रो.प्रा. बि. एम. कांगने यांनी त्यांचे किराणा दुकान सकाळी 9 वाजेच्या पूर्वी उघडल्याचे नगर परिषद कर्मचारी यांना निदर्शनास आल्यामुळे नगर पालिका मार्फत सदर दुकान सील करण्याची कार्यवाही करण्यात आली सील करतांना त्याठिकाणी नगर परिषदेचे कर्मचारी इंनेवार, खान, व्यास, अशोक निचंग, सुधीर काळे, भगवान मोरे हे कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यवाही मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांच्या आदेशानव्ये केली असल्याचे कर्मचारी यांनी सांगितले. लोणार शहरातील सर्व जनतेने कोरोना संसर्गजन्य साथीच्या आजाराचा शिरकाव होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच याकरिता नगर परिषदेने वेळोवेळी दिलेल्या सुचने प्रमाणे पालन करून नगर पालिका प्रशासनास सहकार्य करावे असे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी सर्व जनतेस आवाहन केले.
No comments:
Post a Comment