आता लोणार तालुक्यात जनता संचारबंदी
(लोणार :- प्रणव वराडे)
कोरोनाचा वाढता पादुर्भाव पाहता लोणार तालुक्यातील जनतेनी बुधवार पासुन जनता कर्फु लागु करण्यात येणार असल्याचे तहसिल कार्यालयामध्ये झालेल्या बैठकी दरम्यान दिले. यादरम्यान बाहेरगावावरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकावर 14 दिवस कॉरनटाईन करण्यात यईल यांची सुध्दा दक्षता नागरिकानी घ्यावी असे आवाहन तहसिलदार लोणार यांनी केले आहे.
लोणार तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकानी तसेच व्यापारी वर्गानी स्वयफुर्तीने पाच दिवसाचा बंद करण्याचा आग्रह प्रशासनाकडे धरला होता त्या अनुशंगाने तहसिदार सैपन नदाफ यांनी तहसिल कार्यालय लोणार येथे व्यापारी व शहरातील प्रतिष्ठीत नागरिकाची बैठक बोलाविण्यात आली होती या बैठकीसाठी तहसिलदार सैपन नदाप , मुख्याधिकारी विठठल केंदारे, पोलीस निरीक्षक रविद्र देशमुख, प्रतिष्ठीत नागरिक व सामाजीक कार्यकर्ते प्रकाशराव मापारी, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. बळीराम मापारी, भारतीय कॉग्रेस तालुका अध्यक्ष तथा जि प सदस्य राजेश मापारी, नगरपालीका उपाध्यक्ष बादशाखान नुरमंहमंदखान , नगरपालीका गटनेते भुषण मापारी, कृ. उ. बाजार , डॉ. अनिल मापारी , साहेबराव पाटोळे,समिती सभापती संतोष मापारी,मेडीकल असोशीयनचे अध्यक्ष कैलास बचाटे, बबलु बोरा, रोशन गेलडा, प्रंशात बनमेरू , गोपाल तोष्णीवाल , गजाजन खरात, याच्या सह अनेक व्यापारी व राजकीय मंडळी उपस्थीत होते यावेळी या बैठकीमध्ये असे ठरविण्यात आले की लोणार तालुक्यातील सुलतानपुर, हिवराखंड , भुमराळा, अंजनी खुर्द, ब्राम्हणचिकणा या गावामध्ये कोरोना पॉझीटीव रूग्न सापडले त्यामुळे लोणार तालुक्यात याचा प्रादुर्भाव वाढु नये या प्रमुख उददेशासाठी तसेच बाहेर गावावरून येणाऱ्याची संख्या वाढत असल्याने खबरदारी म्हणुन नागरिकानी तसेच व्यापारी बांधवानी आपला लोणार तालुक्यात कोरोना पॉझीटीव संख्या वाढु नये यासाठी पाच दिवसाचा जनता कर्फु पाळण्याचे एकमताने ठरले यामध्ये तहसिलदार सैपन नदाप यांनी नागरिकाच्या व व्यापारी वर्गाच्या भावना लक्षात घेता पाच दिवसाचा जनता कर्फु मध्ये कडक बंद पाळण्यात येणार आहे यामध्ये वैदयकीय सुविधा वगळण्यात आले असुन सर्व व्यापार पेठ कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान शासकीय कार्यालयाचे कामे सुरू राहतील मात्र नागरिकासाठी कार्यालये बंद राहणार असल्याने कोणत्याही व्यक्तीने शासकीय कामासाठी शहरात दाखल होउ नये तसेच बाहेरगावावरुन येणाऱ्या नागरिकाना 14 दिवस कॉरनटाईन करण्यात येणार असल्याची माहीती यावेळी सर्वानुमते ठरविली तसेच बाहेरगावावरून येणाऱ्या व्यक्तीनी स्वता ग्रामीण रूग्नालयात नोद करावी अन्यथा कारवाई करण्यात येईल अशा सुचना या बैठकीत दिल्या आहे.जनता कर्फु दरम्यान प्रशासनाने कारवाई केल्यास यामध्ये कोणत्याही राजकीय पुढारी अथवा लोकप्रतिनिधी यांनी शिफारशी करण्यात येउ नये असे ठरले त्यामुळे राजकीय पुढारी यांनी सुध्दा या सुचनेचे स्वागत केले
No comments:
Post a Comment