लोणार - (प्रणव वराडे)
लोणार - महिंद्रा सुप्रीम मालवाहू पिकअप गाडीने दुचाकी स्वारास समोरून उजव्या बाजूने उडविल्या मुळे दुचाकी वरील पती पत्नी व ३ वर्षीय मुलगा गाडीला
धडकल्याने या मध्ये ३ वर्षीय बालक जागीच ठार झाल्याची घटना दि २७/०९/२०२० लोणार रायगाव रोडवरील प्राथमिक आरोग्य केंद्र जवळ घडली आहे या बाबत सविस्तर वृत्त असे कि लोणार तालुक्यातील गोत्रा येथील दुचाकि स्वार हे आपल्या होंडा शाईन गाडी क्रमांक MH १४ fh ६८९१ वर पत्नी व ३ वर्षीय मुला सोबत जिंतूर कडे निघाले असताना यांच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या विमा क्रमांक मालवाहू पिकअप ने दुचाकी स्वाराला समोरून उजव्या बाजूने धडक दिली हि धडक एवढी भीषण होती कि दुचाकी समोर बसलेला बालक कार्तिक कृष्णां धोत्रे वय ३ वर्ष याचे डोके मालवाहू गाडीच्या लोखंडी रॉड ला धडकले व त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला तर दुचाकी स्वार कृष्णा सूर्यभान धोत्रे वय ३५ यांची पत्नी पार्वती कृष्णां वय ३२ धोत्रे हे गंभीर जखमी असून यांना परिसरातील ग्रामस्थांनी १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने लोणार ग्रामीण रुग्णाल येथे दाखल करण्यात आले असून यांना पुढील उपचाराकरिता मेहकर येथे रवाना केले असून या अपघाताची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळताच यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख,लेखनिक चंद्रशेखर मुरडकर पोलीस नाईक रामू गीते,पो.हे.कॉ रामदास वैराळ,पो.कॉ विशाल धोंडांगे,भगवान नागरे यांना घटना स्थळी पोहचताच पंचनामा करत सदर मालवाहू चालक सदाशिव गणपत निकाळजे रा बोरखेडी ता सेनगाव जी हिंगोली याला ताब्यात घेत मालवाहू जप्त करून लोणार पोलीस स्टेशन ला जमा केली असून मालवाहू चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु असून पुढील तपास लोणार पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मागर्दर्शनाखाली पो.हे.कॉ रामदास वैराळ करीत असून ३ वर्षीय बालकाच्या अपघाती मृत्यू मुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
No comments:
Post a Comment