नियमाचे उल्लंघन केल्याबाबत १०,५०० रुपयाचा दंड वसूल.
कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी नगर पालिका लोणारच्या वतीने शहरातील सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उघडणे बाबत सूचना देण्यात आल्या आहेत दि. 13 जुलै रोजी नगर परिषद हद्दीतील दुकानावर कायद्याचे उल्लघण करणाऱ्या गजानन कृषी केंद्र आणि सुमित कृषी केंद्र याना प्रत्येकी ५००० रुपये दंड लावण्यात आला या वेळेस त्याठिकाणी नगर परिषदेचे कर्मचारी इंनेवार, शेख सलीम, व्यास, अशोक निचंग, सुधीर काळे, भगवान मोरे हे कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यवाही मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांच्या आदेशानव्ये केली असल्याचे कर्मचारी यांनी सांगितले. लोणार शहरातील सर्व जनतेने कोरोना संसर्गजन्य साथीच्या आजाराचा शिरकाव होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच याकरिता नगर परिषदेने वेळोवेळी दिलेल्या सुचने प्रमाणे पालन करून नगर पालिका प्रशासनास सहकार्य करावे असे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी सर्व जनतेस आवाहन केले.
No comments:
Post a Comment