हिरडव येथील पत्नीचा खुन करून फरार झालेल्या युवकाचे प्रेत झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळुन आले
लोणार - (सतीश मुलंगे)
तालुक्यांतील हिरडव येथे 3 सष्टेबर 2020 रोजी दारूडया पतीने पत्नीचा गळा आवळुन खुन केल्याची घटना घडली होती यामध्ये तिचा पती विकास शेषराव घायाळ याचा मुत्यदेह पळसखेड शिवारात एका लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. मृतकाचे शिर हे झाडाला लटकलेले असुन बाकी थड हे खाली गळुन पडलेल्या अवस्थेत आहे. या घटनेची माहीती परिसरातील शेतकऱ्याना जेव्हा दुर्गधी आली त्यावेळी पोलीसाना दिली यावेळी घटनेची माहीती मिळताच पोलीसानी यांनी घटनास्थळी भेट देउन पंचनामा केला असता सदर युवक हा हिरडव येथील पत्नीचा खुन करून फरार झालेला विकास शेषराव घायाळ असल्याचे त्याच्या जवळील पाकीट आधार कार्ड वरून स्पष्ट झाले सदर युवकाची आत्महत्या का हत्या याबाबत नागरिकामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. सदर युवकाचे मृतदेह हे कुजलेल्या अवस्थेत असल्याकारणाने घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले. गेल्या अनेक दिवसापासुन तालुक्यामध्ये खुन व आत्महत्येचे प्रकार घडत असुन लोणार पोलीसाच्या मागे शुक्लकाष्ठ संपता संपेना या घटनेवरून अधेरेखीत होते. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सदर युवकाची हत्या का आत्महत्या हे समोर येणार आहे या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे.
No comments:
Post a Comment