मीच माझ्या गावाचा रक्षक या भावनेतुन ग्राम सुरक्षा दलाने काम करावे :- ठाणेदार रविंद्र देशमुख
लोणार :- (राहुल सरदार)
मीच माझ्या गावाचा रक्षक या भावनेतुन ग्राम सुरक्षा दलाने काम करावे असे आवाहन
लोणार पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी केले आहे.
लोणार पोलीस स्टेशनच्या आवारात शारा येथील 30 ग्राम सुरक्षा दलाचे जवान यांना मागदर्शन करतांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी सांगीतले की सध्या जगात कोरोना व्हायरस ने थैमान घातले असुन महसुल यंत्रणा , आरोग्य यंत्रणेसोबतच पोलीस प्रशासनावर खुप मोठा भार पडला असुन कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस कर्मचारी रात्रदिवस कर्तव्य बजावत आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुंजबळ यांच्या संकल्पनेतुन तसेच मेहकर उपविभागीय अधिकारी दिलीप तडवी यांच्या मागदर्शनाखाली लोणार
पोलीस स्टेशन हददीत प्रत्येक गावात मीच माझ्या गावाचा रक्षक या उदात हेंतुने गावातील पोलीस पुर्व प्रशिक्षण घेणारे सैन्यदलासाठी तयार करणारे तसेच स्पर्धा परिक्षेचे तयारी करणरे होतकरू विदयार्थी चा ग्राम सुरक्षा दला मध्ये स्व:यपुर्तीने आपला गावासाठी काही तरी आपले ऋुण फेडणे या भावनेतुन सदर सुरक्षा दलामध्ये काम करण्यास तयार झाले असुन या मध्ये प्रामुख्याने गावात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य कराणे गावात नविन व्यक्ती आल्यास त्यांची नोंद घेत त्यांची माहीती संबधीत विभागा देणे त्याच बरोबर रात्री ग्रस्त घालणे अनोळखी वाहन किंवा संशायास्पद वाहने व्यक्ती आल्यास त्याचे सुक्ष्म निरीक्षण करत त्याचे फोटो मोबाईल मध्ये काढत पोलीस प्रशासनाकडे पाठवणे त्यांची सखोल चौकशी करणे या महत्वपुर्ण बाबीकडे वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक अझहर शेख यांनी ग्रामसुरक्षादलाची आवश्यकता व कार्यपध्दती उपस्थीताना समजावुन सांगीतली व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख उपनिरीक्षक अझहर शेख, रायटर चंद्रशेखर मुरडकर, शाराचे बिट चे बद्रीनाथ डिघोळे , पोहेका गुलाव झोटे , बन्सी पवार , गोपनियविभागाचे कैलास चतरकर,विठठल चव्हाण , वाहतुक शाखेचे गजानन बनसोड , शेखर थोरात, उंकडराव राठोड, चांलक गजानन ठाकरे, तेजराव भोकरे सह ग्राम शारा येथील सुरक्षा रक्षक उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment