पांग्रा डोळे येथे शेतकऱ्याची आत्महत्या
लोणार दि २४/०९/२० सतीश मुलंगे लोणार तालुकयातील पांग्रा डोळे येथील एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील झोपडी मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि २४/०९/२०२० रोजी उघडकीस आली. या बाबत सविस्तर वृत्त असे कि पांग्रा डोळे येथील शेतकरी अशोक आश्रुबा कांगणे वय ४० वर्ष यांनी गोत्रा शिवरामधील स्वताच्या शेतामधील झोपडीत गळफास लावून आत्महत्या केली. या बाबत ची माहिती परिसरातील शेतकऱयांनी लोणार पोलीस स्टेशन ला कळविले असता लोणार पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी बिट जमदार बन्सी पवार,पो.कॉ रवींद्र बोरे,पो.कॉ विशाल धोंडगे यांना घटनास्थळी पाठविले सादर अधिकारी कर्मच्यार्यानी घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला व सादर मृतदेह हा शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय लोणार येथे पाठविण्यात आला असून फिर्यादी गजानन विठ्ठल कांगणे यांच्या फिर्यादीवरून लोणार पोलीस स्टेशन ला अपराध क्रमांक ३०/२० प्रमाणे कलाम १७४ जा.फौ प्रमाणे मार्ग दाखल केला ऑन पुढील तपास लोणार पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शन खाली बिट जमदार बन्सी पवार,पो.कॉ रवींद्र बोरे, पो.कॉ विशाल धोंडगे करीत आहे
No comments:
Post a Comment