जनावरावरील आजाराच्या अफवेने बीफ व्यवसायावर मोठा परिणाम. अफवेवर कोणी ही विश्वास ठेवू नका. प्रा लुकमान कुरेशी
लोणार - (सतीश मुलंगे)
जनावरावर, बैल. गाय. म्हशी व इतर वर आलेल्या लम्पी आजारामुळे दर दिवशी होणाऱ्या लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली त्यातच या आजारा विषय सोशल मीडियावर विविध अफवा पसरवल्या जात असल्याने बीफ च्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. या शिवाय शेतकरी बाधवही हवालदिल झाले आहे त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महाराष्ट्र मुस्लिम खाटीक समाज विकास समिती महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष प्रा लुकमान कुरेशी यांनी केले आहे या संदर्भात त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की लम्पी हा आजार आपल्या कडे नाही पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विभागाने काही जनावरांचे सँम्पल चाचणी साठी भोपळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते याचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहे पंरतु सोशलमीडियावर पसरलेल्या अफवां मुळे बीफ व्यवसाय ठप्प झाला आहे. पशुसंवर्धन विभागाकडुन योग्य औषधोपचार केले जात असल्याने शेतकर्यांना व व्यापाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्याने जनावरावरील त्वचा रोग पसरला नाही. तरी या अफवांवर कोणी ही विश्वास ठेवू नये शहरात येणारे बिफ प्रयोग शाळा व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतरच भाकड जनावरे कत्तल खाण्यात पाठवली जातात. लम्पी हा आजार येथे नाही. अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रा लुकमान कुरेशी म्हणाले मांसाहार खाणाऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. येथे हा आजार नाही. व संपूर्ण तपासणी झाल्यानंतर भाकड जनावरांचा उपयोग केला जातो शोसल मिडियावर पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment