Saturday, 11 July 2020

कोविड नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करावी- महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर


कोविड नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करावी - महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर

बुलडाणा, दि. 11  (प्रणव वराडे मुख्य संपादक) :

कोरोना संसर्गाला थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासन उत्तम रित्या काम करीत आहे. भविष्याचा वेध घेवून प्रशासनाने समन्वय ठेवून आणखी प्रभावी काम करावे. कोविड संकटात संधी शोधून आपली आरोग्य यंत्रणा सक्षम करून घ्यावी. ग्रामीण रूग्णालयापर्यंत व्हेंटीलेटरची सुविधा द्यावी, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज दिल्या.
  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोविड आजाराबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार राजेश एकडे, जि.प अध्यक्षा मनिषा पवार, उपाध्यक्षा कमलताई बुधवत, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदी उपस्थित होते.
  बुलडाणा येथे लवकरच कोरोना तपासणी प्रयोगशाळा होत असल्याचे सांगत मंत्री म्हणाल्या, यामुळे जिल्ह्यातील तपासण्या जलद होतील. त्याचा लाभ होईल. विलकीकरण कक्षात ठेवलेल्या संशयीत व्यक्तींना चांगल्या सुविधा द्याव्यात. नागरिकांमध्ये मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंग पाळणे, गर्दी न करणे आदी बाबींची सवय लागत आहे. ही सवय पुढे अशीच राहण्यासाठी प्रशासनाने काम करावे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांमध्ये आणखी जनजागृती करावी. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी बैठकीत सादरीकरण केले. 
  यावेळी पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग आदींकडून कोविड नियंत्रणाचा आढावा घेण्यात आला. बैठकीला संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ

  डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ लोणार - प्रणव वराडे उपमुख्यमंत्री कार्यालय ...