गणेश प्रकाश मापारी यांनी केली गरजू व्यक्ती ला मदत
लोणार 14/12/2020 (प्रणव वराडे)
लोणार येथील छत्रपती शिवराय प्रतिष्ठान मधील युवा नेतृत्व गणेश प्रकाश मापारी हे त्यांच्या कामावरून रात्री च्या सुमारास घरी जात असताना त्यांना एक वृद्ध व्यक्ती रस्त्यावर कडाक्याच्या थंडीत कुडकडत दिसताच त्यांनी स्वतःचे श्वेटर काढून त्या वृद्ध व्यक्ती ला देऊन त्यांना मदत केली येवढेच नाही तर त्यांना भूक लागली असे समजताच त्यांना खाण्यासाठी अन्न व पाण्याची व्यवस्था करून दिली अश्याच प्रकारची मदत या छत्रपती शिवराय प्रतिष्ठान च्यां माध्यमातून या पुढे होत राहील असे या वेळी त्यांनी सांगितले व हे छत्रपती शिवराय प्रतिष्ठान लोणार यांच्या वतीने गरजू लोकांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर राहील असे छत्रपती शिवराय प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री बंडू दादा मापारी यांनी सांगितले . या वेळी छत्रपती शिवराय प्रतिष्ठान मधील विठ्ठल मापारी,महेंद्र मोरे,रितेश फंगाळ,अनुप थोरवे,आकाश मापारी,बाला मापारी,समाधान पवार असे बरेच असे लोक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment