लोणार नगरपरिषद ची धडक कारवाई
लोणार (सतीश मुलंगे)
लोणार नगरपरिषद तर्फे मागील २ दिवसामध्ये जनता कर्फ्यू दरम्यान विविध प्रकारच्या कारवाई करण्यात आल्या. या मध्ये लोणार शहरातील दुकानधारकांनी निर्धारित वेळेपूर्वी व वेळेनंतर दुकान सुरु ठेवले अशी ११ दुकाने सील करण्यात आली
या मध्ये भोलेनाथ किराणा ,दिलीप चोरडिया यांचे दुकान,अविनाश शिंदे,आत्माराम खोटे,अंबादास नेवारे,निलेश कोठारी,यांचा समावेश आहे असेच
दीपक कापड केंद्र यांना ५००० रु चा दंड आकारण्यात आला आहे तसेच मास्क न घालून फिरणारे सोशल डिस्टन्स च पालन न करणारे यांच्या कडून १४००० रुपयांचा दंड वसून करण्यात आला.
नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व कोरोना पासून आपला बचाव करावा असे आपले कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी सांगितले व दुकानाच्या नेमून दिलेल्या कालावधीतच दुकाने सुरु ठेवावी असे हि सांगितले आहे
No comments:
Post a Comment