धाड येथील शेतकऱ्याचा नदीत पडुन दुर्देवी मुत्यू
लोणार :- प्रणव वराडे
लोणार तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या विदर्भ व मराठवाडयाच्या सिमेवरील मौजे धाड येथील शेतकऱ्याचा पाण्यात पडुन दुर्देवी मुत्यू झाल्याची घटना 22 सष्टेबर 2020 रोजी उघडकीस आली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की धाड येथील शेतकरी केशव रामराव ताठे वय 40 वर्षे हे नेहमीप्रमाणे स्वताचे शेतात कामानिमीत्त जात असताना धाड येथील नदीत त्याचा पाय घसरून पाण्यात बुडुन दुर्देवी मुत्यू झाला त्याचे प्रेत तब्बल एक किमी पर्यत वाहत गेले होते गावकऱ्याची शोध मोहीम राबवत तिन घंटयाच्या अथक प्रयत्नाने त्यांचे प्रेत सापडले याबाबत तेजराव अहेलाजी ताठे यांनी पोलीस स्टेशन लोणार ला फिर्याद दिली असता वरिष्ठ पेालीस निरीक्षक रविंद्र देशमुख, त्याचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख, लेखनिक चंद्रशेखर मुरडकर, बिट जमादार बन्सी पवार, पोका भागवत खाडे, यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्नालय येथे पाठविण्यात आला. अकस्मीत मुत्यूची नोद करण्यात आली सदर मृतक शेतकरी याच्या मुत्यू पाश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा मोठा आप्त परिवार आहे या घटनेमुळे धाड गाववर शोककळा पसरली आहे.
No comments:
Post a Comment