Sunday, 9 August 2020
मुख्यमंत्र्यांच्या डिजिटल महाराष्ट्राचे शिलेदार ग्रामपंचायत संगणक परिचालक हे आजरोजी कोरोना महामारीच्या संकटात गावपातळीवर काम करीत असतांना कामाचा मोबदला तीन महिन्यापासून न मिळाल्यामुळे त्यांच्यावर आली उपासमारीची वेळ
लोणार:- तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पा अंतर्गत कंत्राटी स्वरूपात काम करीत असणारे संगणक परिचालक यांच्या कामाचा मोबदला रक्कम ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग निधी मधून जिल्हा परिषदेस धनादेश देणे बाबत शासनाने जिल्हा परिषदेस कळवून सुद्धा ग्रामपंचायतींनी धनादेश न दिल्यामुळे संगणक परिचालक यांच्यासह कुटुंबावर आली उपासमारीची वेळ याबाबत सविस्तर असे की, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून २०११ पासून संग्राम (संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र व सध्या आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात नेमणूक असलेले संगणक परिचालक पंचायत समिती लोणार अंतर्गत ग्रामीण भागातील ग्रामपंचायतस्तरावर जनतेला विविध शासकीय दाखले देण्याचे व माहिती ऑनलाइन प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याचे तसेच वेळोवेळी शासनाने दिलेल्या कामे, सर्व्हे, योजनांची कामे यासह ग्रामपंचायत सांगेल ते काम संगणक परिचालक प्रामाणिकपणे करतात. परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे प्रकल्प सुरू झाले तेव्हा पासून तुटपुंजे मानधन सुद्धा वर्ष-वर्ष मिळाले नाही. तरी देखील शासनाने नेमून दिलेले काम संगणक परिचालक करीत आहे. त्यातच आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पाची मुदत 31 मार्च 2020 रोजी संपलेली आहे, परंतु कोरोनामुळे पुढील निर्णय होईपर्यंत आहे तीच व्यवस्था सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेवून माहे एप्रिल, मे, जुन 2020 या तीन महिन्यांच्या कालावधीची आगाऊ रक्कम ग्रामपंचायतीचे चौदाव्या वित्त आयोगाच्या अखर्चित निधी मधुन जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याच्या सुचना देऊन आज रोजी तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा पंचायत समिती कार्यालय लोणार कडून
Subscribe to:
Post Comments (Atom)
डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ
डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ लोणार - प्रणव वराडे उपमुख्यमंत्री कार्यालय ...

-
डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ लोणार - प्रणव वराडे उपमुख्यमंत्री कार्यालय ...
-
11 ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या बौद्ध समाज संवाद यात्रा निमित्त. हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा, वंचित बहुजन आघाडी मेहकर- लोणार विधानसभा नेते, न...
-
दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र लोणार यांच्यावतीने दत्तजयंती निम्मित अखंड नामजप सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळ संपन्न लोणा...
No comments:
Post a Comment