लोणार शाखेचा भोंगळ कारभार
एक महिन्यापासून सेवा प्रबंधक नाही स्थानिक लोणार शहरात राष्ट्रीयकृत बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेचे एकच शाखा असून लोणार शहरासह 24 खेडे या शाखेला जोडण्यात आलेले आहेत. लोणार शाखेचे शाखा प्रबंधक विवेक इगवे हे सेवा प्रबंधक यांचे काम पाहत असून त्यांच्याकडील ग्राहकांचे असलेली कामे प्रलंबित राहतात तसेच पिक कर्ज नूतनीकरण यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग पूर्ण वेळ उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी ग्राहकांचे अतोनात हाल होताना दिसत आहेत. शेतकरी बांधवाना रात्रीला पिकांना पाणी देण्यासाठी रात्र जागून काढावी लागते आणि बँकेत दिवसभर आपले काम करून घेण्यासाठी रांगेत उभे रहावे लागत आहे. सेवा प्रबंधक कायमस्वरूपी नसल्यामुळे शेतकऱ्याचे अनुदान निराधार अनुदान केवायसी चेक पासिंग नवीन पासबुक व इतर सेवा ग्राहकांना मिळत नसल्यामुळे वयोवृद्ध पासून ते शाळकरी मुलं व्यापारीवर्ग सहित ग्राहकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे तरी या बाबीकडे बँकेचे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
No comments:
Post a Comment