14 वित्त आयोगाच्या कामांना मुदतवाढ मिळण्याची मागणी :- विठठल घायाळ बाजार समिती संचालक
लोणार :- सतीश मुलंगे शहर प्रतिनिधी
14 वित्त आयोगाच्या कामांना मुदतवाढ मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विठठल घायाळ यांनी
एका निवेदनाव्दारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
14 वित्त आयोग निधीचा शेवटचा हप्ता फेब्रवारी 2020 च्या शेवटच्या तारखेला सरपंच / सचिव यांच्य सयुक्त
खात्यात जमा झाला शवेटचा हप्ता जमा होताच सरपंच व सचिव यांनी कृती आराखडयामधील कामाचे अंदापत्रक तयार करून त्या कामांना तांत्रीक व प्रशासकीय मंजुरात त्याच महीण्यात मिळाली कामाला सुरूवात केली असता कामे अर्धवट होत नाही तोच मार्च महीण्याचा लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे सर्व प्रशासकीय कामे बंद करावे लागले याचे कारण असे की लॉकडाउन काळात सिमेंट ,लोखड , इतर मटेरियलचे दुकाने बंद असल्यामुळे मार्च महीन्यात कामे पुर्ण करात आली नाही सरपंच यांनी स्वताचे पैसे गुतवुन बरीच
कामे पुर्ण करण्याचा प्रयत्न केला परंतु मार्च 2020 मध्ये कामे पुर्ण करू शकले नाही व आता शासनाकडुन सदर कामे बंद करण्याचे सांगण्यात आलेले आहे यामुळे महाराष्ट्रातील हजारो सरंपचांनी केलेल्या कामचे बिल निघत नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे तसेच 14 व्या वित्त आयोगाचे कामे बंद केल्याने गावाचा विकास खुटला आहे तरी शासनाने त्वरीत 14 व्या वित्त आयोगाच्या कामांना पुर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक
विठठल घायाळ यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे
रास्त मागणी
ReplyDelete