नादुरुस्त विद्युत डीपी जळाल्यामुळे पाणीपुरवठा बंद
लोणार (किशोर मोरे)
सध्याच्या परिस्थितीत मानव जातीला कोरोना या महाभयंकर आजाराला सामोरे जावे लागतअसून संपूर्ण जग या महाभयंकर आजाराला हतबल झाले असून शहरासह ग्रामीण भाग सुद्धा या परिस्थिती चा सामना करत असतानाच ग्रामीण भागातील विविध समस्या दिवसेन दिवस वाढत अस्तातना दाभा गावात अशीच एक नित्यच समस्या वारंवार होत आहे दाभा गावात
स्वच्छ पाणी पुरवठा करणारी योजना गेल्या काही दिवसांपासून बंद आहे .याचे मुख्य कारण म्हणजे विजपुरवठा काही दिवसांपासून विद्युत डीपी नादुरुस्त असल्याने .दाभा येथील ग्रामस्थना ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे .या पावसाळ्याच्या व रोगराईच्या काळात .पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करवी लागत आहे .आता वीजनादुरुस्त असली तरी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला शेतात वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिनीला जोडला असल्याने शेतातील वीज वारंवार तांत्रिक कारणाने नादुरुस्त होते तर कधी भारनियमन या कारणाने विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने परिणामी दाभा गावाचा पाणीपुरवठा नियमित होत नाही.
दाभा गावाला स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत डीपीचा विद्युत पुरवठा गावठाण विद्युत वाहिनीला जोडण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थाच्या वतीने डॉ मारोती मोरे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.