Sunday, 26 December 2021

लोणार शाखेचा भोंगळ कारभार

 



लोणार शाखेचा भोंगळ कारभार 

लोणार ( प्रफुल पाटोळे ) -

एक महिन्यापासून सेवा प्रबंधक नाही स्थानिक लोणार शहरात राष्ट्रीयकृत बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेचे एकच शाखा असून लोणार शहरासह 24 खेडे या शाखेला जोडण्यात आलेले आहेत. लोणार शाखेचे शाखा प्रबंधक विवेक इगवे हे सेवा प्रबंधक यांचे काम पाहत असून त्यांच्याकडील ग्राहकांचे असलेली कामे प्रलंबित राहतात तसेच पिक कर्ज नूतनीकरण यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग पूर्ण वेळ उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी ग्राहकांचे अतोनात हाल होताना दिसत आहेत. शेतकरी बांधवाना रात्रीला पिकांना पाणी देण्यासाठी रात्र जागून काढावी लागते आणि बँकेत दिवसभर आपले काम करून घेण्यासाठी रांगेत उभे रहावे लागत आहे.    सेवा प्रबंधक कायमस्वरूपी नसल्यामुळे शेतकऱ्याचे अनुदान निराधार अनुदान केवायसी चेक पासिंग नवीन पासबुक व इतर सेवा ग्राहकांना मिळत नसल्यामुळे वयोवृद्ध पासून ते शाळकरी मुलं व्यापारीवर्ग सहित ग्राहकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे तरी या बाबीकडे बँकेचे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

राज्यातही थंडीचा कडाका वाढला असून पारा घसरला आहे. थंडीसोबतच रात्री व पहाटे धुके पडत असल्याने शहरासह ग्रामीण भागात





लोणार किशोर मोरे   : राज्यातही  थंडीचा कडाका वाढला असून  पारा घसरला आहे. 
थंडीसोबतच रात्री व पहाटे धुके पडत असल्याने शहरासह ग्रामीण भागात  

 रस्ते धुक्यात हरविल्यासा आभास होत 
आहे. यामुळे वाहनधारकांना सकाळच्या प्रहरी  दिवे 
लावून वाहने चालविण्याची वेळ आली आहे.
डिसेंबर महिन्याच्यासुरुवातीला पाहिजे तशी थंडी 
नव्हती, मात्र गत ५ ते ६ दिवसांपासून ग्रामीण व  शहर व भागात 
थंडीचा चांगलाच जोर वाढला. तापमानात घट होऊन थंडीचा 
जोर कायम असून   संपूर्ण शहर धुक्यात गडप 
झालेले दिसून आले. १०० मिटर अंतरावरीलही या 
धुक्यामुळे काही दिसेनासे झाले होते. थंडीचा कडाका 
वाढल्याने रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकासाठी हे 
वातावरण फायदेशीर ठरणार असल्याचे जाणकार बोलत 
असले तरी धुक्याचा पिकांवर परिणाम होण्याची शक्यताही 
वर्तविली जात आहे. गत ५ ते ६ दिवसांपासून वातावरणात 
परिणामकारक बदल झाला असून दिवसागणिक वाढत 
चालेली थंडी, सकाळ व सायंकाळच्या सुमारास पडत 
असलेले धुके आणि ढगाळी वातावरणामुळे गहू, हरभरा, 
कपाशी या पिकांसोबतच भाजीपालावर्गीय पिकांनाही जबर फटका बसत आहे.


 

Friday, 24 December 2021

लोणार सेंट्रल पब्लिक स्कूल मध्ये राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणित प्रदर्शन उत्साहात साजरा...

 


लोणार सेंट्रल पब्लिक स्कूल मध्ये राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणित प्रदर्शन उत्साहात साजरा...

लोणार - (प्रफुल पाटोळे)

स्थानिक लोणार सेंट्रल पब्लिक स्कूल येथे राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने दिनांक २२ डिसेंबर रोजी शाळेत गणित विभागातर्फे गणित विषयाचे प्रदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन, गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.कार्यक्रमास श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री बायस्कर सर उद्घाटक म्हणुन लाभले तर प्रमुख उपस्थिती श्री. नखाते सर, श्री परसुवाले सर, श्री अकील सर, श्री बचाटे सर, श्री शेवाळे सर, उपप्राचार्य श्री शेख सर, व श्री चव्हाण सर यांची होती तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री कुळकर्णी सर होते. श्रीनिवासन यांच्या जीवनावर प्रकाश टाकत बायसकर सरांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले आणि गणितज्ञ श्रीनिवास यांनी जवळपास ३००० हून अधिक प्रमेय लिहून गणित क्षेत्रात मोठे कार्य केले असे सांगितले तसेच आपल्या दैनंदिन जीवनात गणिताचे महत्त्व सरांनी आपल्या भाषणातून पटवून दिले.अध्यक्षिय भाषणातून प्राचार्य कुळकर्णी सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, यावेळी त्यांनी विद्यार्थांचे भरभरून कौतुक केले. कोरोनाच्या भीषण परिस्थितीनंतर सुध्दा विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात सहभाग घेतला आणि विविध प्रकारचे गणित साधने, प्रोजेक्ट, उपकरण आदी कौतुकास्पदरित्या तयार केले.यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक संचालक श्री फैसल सरांनी करत आम्ही शाळेत नेहमी विद्यार्थ्यासाठी नवनवीन उपक्रम राबविल्याचे सांगितले.या कार्यक्रमाचे संचालन कु. अनुष्का विभुते आणि कु. जान्हवी कांबळे यांनी केले, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गणित शिक्षक पऱ्हाड सर आणि कुळकर्णी मॅडम यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी गणित विभाग आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गणित प्रदर्शनाची जबाबदारी साळवे सर व सोसे सर यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली. पालकांनी देखील मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमास उपस्थिती नोंदविली

Monday, 15 November 2021

लसीकरण मोहिमेत सहभागी व्हा - मुख्याधिकारी केदारे

 



लसीकरण मोहिमेत सहभागी व्हा - मुख्याधिकारी केदारे

लोणार - ( प्रणव वराडे )

महसूल, आरोग्य व नगरपरीषदेच्या वतीने १५ नोहेंबर रोजी श्री मंगल कार्यालयात लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त बैठीकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी त्यांनी नागरींनी लसीकरण मोहीमेत सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हाण मुख्यधीकारी विठ्ठल केदारे तसेच तहसीलदार सैफन्न नदाफ यांनी केले.यावेळी श्री शिवाजी संस्थेचे अध्यक्ष डॉ. खुशालराब मापारी , सामाजीक कार्यकर्ते प्रकाशरावजी मापारी, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीरामजी मापारी राष्ट्रवादी जिल्हास्तर चिटणीस किशोर पाटील मापारी, ठाणेदार प्रदीप ठाकुर वैद्यकीय अधीकारी डॉ. फिरोज शहा, नगरसेवक डॉ. अनील मापारी , तौफीक सेठ कुरेशी, बिलाल सेठ, रौनकअल्ली, सरपंच भगवानराव कोकाटे, डॉ. भाष्कर मापारी, तलाठी विजय पोफळे, तलाठी अशोक सौदर, अशोक निचंग यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थीती होती.

Friday, 8 October 2021

जिल्हास्तरीय बँक लोन मेळाव्यात PMFME योजना अंतर्गत कर्ज मंजुरी लाभार्थ्यास मंजुरी पत्र प्रदान करण्यात आले

 

जिल्हास्तरीय बँक लोन मेळाव्यात PMFME योजना अंतर्गत कर्ज मंजुरी लाभार्थ्यास मंजुरी पत्र प्रदान करण्यात आले



जिल्हास्तरीय बँक लोन मेळाव्यात PMFME योजना अंतर्गत कर्ज मंजुरी लाभार्थ्यास मंजुरी पत्र प्रदान करण्यात आलेआज दिनांक 7 ऑक्टोबर 2021 रोजी वित्त मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय बँक लोन मिळवायचे आयोजन माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अग्रणी बँक, बुलढाणा यांच्यावतीने नगरपरिषद हॉल, बुलढाणा येथे करण्यात आले.सदर बँक लोन मेळावा दरम्यान केंद्र सरकार सहाय्यित व महाराष्ट्र शासन विभागांतर्गत आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे उन्नयन योजना ( PMFME) अंतर्गत सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग करिता लोणार येथील प्रयाग गृह उद्योग यांच्या कडून सौ. सीमा विनोद वराडे यांनी प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाला विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक, लोणार यांचेमार्फत बँक कर्ज प्रकरणस मंजुरी प्रदान करण्यात आलेली होती. सदरील लाभार्थ्यास माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमांमध्ये बँक कर्ज मंजुरी पत्र माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.सोबतच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सदर योजने बदल उपस्थितांना माहिती दिली. सादर योजनेचे जास्तीत लाभ घ्यावा असे नमुद केले. या योजने अंतर्गत जर नवीन प्रकल्प चालू करचे असेल तर पेरू या फळावर प्रक्रिया उद्योग सुरू करू शकतात किंवा सध्या चालू असणारे सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (वैयक्तिक, पार्टनरशिप, गट व फार्मर प्रोड्यूसर कंपनी) योजनेअंतर्गत आपला उद्योग वाढवण्याकरिता पात्र आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी ऑफिसमध्ये संपर्क साधावा असा आव्हान करण्यात आला आहे किंवा ऑनलाइन अर्ज सादर करण्यात यावे.ऑनलाईन अर्ज www.pmfme.mofpi.gov.in या वेबसाइटवर सादर करावा.या योजने अंतर्गत ३५% अनुदान देण्यात येते आहे. सोबतच प्रकल्प अडाखडा, कर्ज मंजुरी करता व आवश्क परवाने जसे की FSSAI, GST व उद्यम नोदणी करण्यास मदत करण्यात येते. या योजने मुळे जास्तीत जास्त शेत मालाचे पक्रिया करण्यास मदत होईल व भविष्यात चांगले रोजगानिर्मिती होईल अशी शासनस अपेक्षा आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब माननीय श्री. एस. राममूर्ती सोबतच प्रमुख उपस्थिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. नरेंद्र नाईक, कृषी उपसंचालक श्री. विजय बेतीवार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री नरेश हेडाऊ व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.सदरील प्रकल्प आराखडा तयार करण्यास श्री. विशाल बुरेवार सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) व जिल्हा संसाधन व्यक्ती श्री. गौरवकुमार म. कुंकूलोळ यांनी सहकार्य केले.

Monday, 20 September 2021

लोणार तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शे समद शे अहमद तर कार्यध्यक्षपदी प्रमोद वराडे यांची बिनविरोध निवड (सचिव पदी पवन शर्मा तर उपाध्यक्ष पदी संदीप मापारी )

 लोणार तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शे समद शे अहमद तर कार्यध्यक्षपदी प्रमोद वराडे यांची बिनविरोध निवड (सचिव पदी पवन शर्मा तर उपाध्यक्ष पदी संदीप मापारी )



लोणार:- प्रणव वराडे 

लोणार तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शे समद शे अहमद तर कार्यध्यक्षपदी प्रमोद वराडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली  दिनांक 19 सप्टेंबर 2021 रोजी स्थानिक विश्रामगृह वर पत्रकार संघटनेची सभा बोलवण्यात आली सर्वप्रथम संघटनेचे दिवंगत अध्यक्ष सिद्धेश्वर दहातोंडे याना पत्रकार संघटने कडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली या वेळी कार्यक्रमा च्या अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ पत्रकार डॉ अनिल मापारी तर प्रमुख उपस्थिती मध्ये श्याम सोनुने, उमेश कुटे हे होते नवीन कार्यकरणीची एक मताने निवड करण्यात आली ती खालील प्रमाणे

ध्यक्ष- शेख समद शेख अहमद

कार्यध्यक्ष-प्रमोद वराडे

उपाध्यक्ष-संदीप मापारी

सचिव - पवन शर्मा 

कोषाध्यक्ष-श्याम सोनुने

सहसचिव - नंदकुमार डव्हळे

सह कोषाध्यक्ष- अशोक इंगळे

प्रसिद्धी प्रमुख -अनिल वायाळ

जेष्ठ सदस्य- अनिल मापारी

सदस्य - उमेश कुटे,विठ्ठल घायाळ,अविनाश शुक्ला,गोपाल तोष्णीवा,लराहुल सरदार,रेहमान नवरंगाबादी,उमेश पटोकार,किशोर मापारी,मयूर गोलेछा,सुनील वर्मा,किशोर मोरे,संतोष पुंड,सचिन गोलेछा,प्रणव वराडे,शेख यासीन,लक्ष्मण खरात. आदी निवड करण्यात आली असून सदर निवड खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या सभेचे सूत्र संचालन गोपाल तोष्णीवाल यांनी ,प्रस्तावना राहुल सरदार तर आभार रेहमान भाई यांनी मानले

Thursday, 16 September 2021

त्या घटनेचा लोणार तालुका पत्रकार संघाच्या वतीने निषेध दोषी पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी

 


त्या घटनेचा लोणार तालुका पत्रकार संघाच्या वतीने निषेध 
दोषी पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी
 

लोणार - प्रणव वराडे
चिखली येथील पत्रकार समाधान गाडेकर यांच्यावर स्थानिक गुन्हेशाखेचा उर्मट पोलीस उपनिरीक्षकांनी केलेली असभ्य वर्तनाच्या लोणार तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने निषेध करून कडक कारवाई ची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे तहसीलदार सैफन नदाफ यांच्या मार्फत एका निवेदनाद्वारे केली आहे 
निवेदनात नमूद प्रमाणे चिखली येथील पत्रकार समाधान गाडेकर हे वार्तांकनासाठी गेले असताना तेथे उपस्थीत स्थानिक गुन्हेशाखेचे उर्मट पोलीस उपनिरीक्षकानी गाडेकर यांच्या सोबत असभ्य वर्तन केले लोकशाहीचा चौथा आधारस्थंभ असलेल्या पत्रकाराची मुस्कटदाबी करणाऱ्या उर्मट अधिकाऱ्यावर लोणार तालुका पत्रकार संघ निषेध नोंदवत असून या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी व पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी अशी हि मागणी निवेदनात नमूद आहे सदर निवेदनात डॉ. अनिल मापारी प्रमोद वराडे शेख समद शेख अहमद संदीप मापारी अनिल वायाळ राहुल सरदार सुनील वर्मा आसाराम जायभाय श्याम सोनोने अशोक इंगळे पवन शर्मा किशोर मोरे प्रणव वराडे संतोष पुंड आदी पत्रकार बांधवांच्या सह्या आहेत

Tuesday, 10 August 2021

सिमेंट कॉंग्रेटरोड व नाली करण्यात यावी - सरपंच वर्षा मोरे याची मागणी

 


सिमेंट कॉंग्रेटरोड व नाली करण्यात यावी - सरपंच वर्षा मोरे याची मागणी

लोणार (दाभा) - किशोर मोरे

लोणार तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या दाभा पहुर रास्ता मजबुतीकरण बऱ्याच दिवसपासून प्रलंबित आहे .दर रस्ता प्रदीर्घ कालावधीनंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत लोणार रिसोड प्रमुख जिल्हा मार्ग 44आरडव पासून ते पहुर पर्यंत 4.60कि.मी रस्ता डांबरीकरणं मंजूर करण्यात आला असून काम सुरू आहे .परंतु दाभा गावा जवळ साखळी क्र.2300ते साखळी क्र2750मध्ये अंतर 450मीटर लांबी मध्ये गाव वसलेले असून पावसाचे पाणी याच अंतरावर वाहत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने साईट शोल्डर वाहून जाते परिणामी सदर रस्ता मधोमध खराब होऊन भयावह परिस्थिती निर्माण होते त्यासाठी दाभा गावाजवळील संबंधित अंतराच्या उल्लेखनीय रस्यावर डांबरी रस्ता न करता यांच्या सिमेंट कॉंग्रेट रस्ता तयार करून दोन्ही बाजूला सिमेंट कॉंग्रेट नाली करण्यात यावी .अशी मागणी दाभा येथील सरपंच वर्षा किशोर मोरे सह ग्रामस्थांनी एक निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यांच्या कडे केलीआहे .सदर निवेदनाची प्रतिलीपी खा.जाधव . मेहकर मतदारसंघाचे आमदार डॉ .संजय रायमूलकर यांना देण्यात आली आहे.

Thursday, 22 July 2021

लोणार मधील मुख्य चौकातील अकोला जनता कमर्शियल को-ऑप बँकेला आग.

 



लोणार मधील मुख्य चौकातील अकोला जनता कमर्शियल को-ऑप बँकेला आग.


लोणार - प्रणव वराडे
लोणार शहरातील मुख्य चौकातील बसस्थानक भागातील अकोला जनता कमर्शियल को-ऑप. बँकेला २२ जुलैच्या रात्री साडे नऊच्या सुमारास लागली आग
 बँकेतून धूर निघत असल्याने अकोला जनता बँकेच्या एटीएम वर असलेल्या वॉचमन ने तातडीने  रहिवाशांच्या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केला होता तेवढ्यात लोणार मधील काही टँकर च्या सहाय्याने आग वझविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले अखेर  सव्वा दहा वाजे पर्यंत आग विझवणे सुरूच होते १०:२० पर्यंत संपूर्ण आग ही आटोक्यात आलेली होती शॉर्टसर्कीटमुळे आग लागलेली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे या वेळी लोणार तहसील चे कर्तव्यदक्ष तहसीलदार सैफन नदाफ नायब तहसीलदार हेमंत पाटील लोणार पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार देशमुख साहेब व नगर पालिका कर्मचारी उपस्थित होते

Monday, 19 April 2021

सौ . सुवर्णा सुजित मोरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटी अनुसूचित जाती महिला विभाग कमिटीच्या बुलढाणा जिल्ह्य कार्य अध्यक्ष पदि नियुक्ती


 सौ . सुवर्णा सुजित मोरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटी अनुसूचित जाती महिला विभाग कमिटीच्या बुलढाणा जिल्ह्य कार्य अध्यक्ष पदि नियुक्ती




लोणार (प्रणव वराडे):-

सौ . सुवर्णा सुजित मोरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटी अनुसूचित जाती महिला विभाग कमिटीच्या बुलढाणा जिल्ह्य कार्य अध्यक्ष पदि नियुक्ती करण्यात आली आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अनु.जाती विभागाचे सन्माननीय अध्यक्ष मा . श्री . नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली व अ . भा . कॉ . क . अनु . जाती चे महाराष्ट्राचे प्रभारी श्री.मनोज बागडी व महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अनूसुचित जाती विभागाचे अध्यक्ष मा . श्री . विजय अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती करण्यात आली, तसेच सौ,सुवर्णा सुजित मोरे हे पक्षाचे काम सक्षमपणे कराल असा विश्वासने जबाबदारी महत्वाची असून संघटन विकास व काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त जनाधार प्राप्त होईल असेच आपले कार्य असावे ही अपेक्षा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती महिला विभाग व राज्य समन्वयक प्रतिमा उके यांनीी केली

Saturday, 17 April 2021

डॉ. निलेश किनगेचा बाजार आवरला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची मान्यता निलंबितनवे कोविड रूग्ण भरती करायला केली मनाई




डॉ. निलेश किनगेचा बाजार आवरला
डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची मान्यता निलंबित
नवे कोविड रूग्ण भरती करायला केली मनाई



डॉ. निलेश किनगेचा बाजार आवरला
डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची मान्यता निलंबित
नवे कोविड रूग्ण भरती करायला केली मनाई

जळगाव -
डॉ. निलेश किनगे यांच्या डेडिकेटीड कोविड हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्याचा आदेश जिल्हा शल्यचिकित्सक व नोडल आॕफिसर डॉ. नागेश चव्हाण यांनी दिले आहेत. गेले २ दिवस किनगे यांचा कोविड रुग्णांची लूट करण्याचा बाजार सध्या आवरला आहे. पुढील चौकशी होऊन त्यांचा बाजार उठणे निश्चित होईल. 
किनगे यांनी कोविड रुग्णांना आकारलेल्या अवास्तव व अवाजवी बिलांची, चिटोऱ्यांची सोशल मीडियात चर्चा होती. याची दखल कोविड प्राधिकरण अध्यक्ष, जिल्हाधिकारी व नोडल आॕफिसर यांनी घेतली. त्यानंतर  किनगे यांच्या हॉस्पिटलची चौकशी करण्यासाठी समिती पाठविण्यात आली. या समितीने केलेल्या पाहणीत अनेक तृटी आढळल्या. 
पाहणीत आढळलेले आक्षेपार्ह मुद्दे असे - १) परवानगी १५ खाटांसाठी असताना तेथे प्रत्यक्षात २४ रुग्ण आढळले. २) कर्मचारी पीपीई किट वापरत नसताना दिसले. ३) हॉस्पिटलमध्ये आॕक्सिजनचा वापर जास्त होत होता. ४) किनगेंच्या हॉस्पिटलची मान्यता १७ जानेवारीला रद्द केलेली होती. तरीहे हे सेंटर सूरू होते. ५) दि. १७ जानेवारी ते २१ फेब्रुवारीपर्यंत विना मान्यता रुग्ण भरती केलेले दिसले.
वरील कारणे लक्षात घेऊन किनगे यांच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचा रवाना पुढील आदेश होईपर्यंत निलंबित केला आहे. आज पासून कोविडचेनवे रूग्ण दाखल करायला मनाई केली आहे. आहे ते रुग्ण उपचार करून डिस्चार्ज करावे असे आदेशात म्हटले आहे.
कोणाचीही गय नाही - गुलाबभू
डॉ. किनगेवरील कारवाईचे स्वागत आहे. रुग्णांना छळणाऱ्या कोणाचीही गय प्रशासनाने करू नये. रूग्णांच्या अवास्तव बिल तपासणीसाठी पुरसे सरकारी आॕडीटर नेमायची सूचना केली आहे असे जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. 

Monday, 15 March 2021

ग्रामीण भागात Covid-19 कोरोनाची लस देण्याची प्रक्रिया सुरू पहिल्या दिवशी 80ते 100 नागरिकांनी घेतली लस.


 ग्रामीण भागात Covid-19 कोरोनाची लस देण्याची प्रक्रिया सुरू पहिल्या दिवशी 80ते 100 नागरिकांनी घेतली लस.


लोणार - (प्रणव वराडे)
          ग्रामीण भागात Covid-19 कोरोनाची लस देण्याची प्रक्रिया सुरू पहिल्या दिवशी 80ते 100 नागरिकांनी घेतली लस.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यामधील रायगाव येथे प्राथमिक केंद्र आरोग्य रायगाव येथे covid-19 कोरोना च्या लस ला सुरुवात
तसेच गावातील सुपर स्पेडर कोव्हिड केअर सेंटर लोणार यांनी Rt-Pcr टेस्ट केल्या.सोनल घोडगे व यांची टीम सोबत.
 ग्रामीण भागात लसीकरण सुरू करण्यात आले गजानन बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून सौ,गोदावरी भगवान कोकाटे जिल्हा परिषद परिषद सदस्या यांच्या हस्ते उद्घाटन करून लसीकरणाला सुरुवात तसेच गावातील दुकानदार, व नागरिकांनी अंगणवाडी केंद्र येथे कॅम्प मध्ये Rt-Pcr टेस्ट घेतल्या प्राथमिक केंद्र रायगाव या ठिकाणी दवाखान्यामध्ये नागरीकांनी आधार कार्ड, मतदानकार्ड, पॅन कार्ड, ओळख पत्र देऊन नोंदणी करून रस घेऊन लस घेतलेल्या व्यक्तीला वीस ते तीस मिनिटं बेड वरती आराम करून त्यांना गोळ्या देऊन घरी पाठवण्यात आले यामध्ये आरोग्य विभागाचे डॉक्टर मंगेश सानप डॉक्टर सचिन मापारी डॉक्टर अविनाश वाघ डॉक्टर संतोष नागरे डॉक्टर तनवीर शेख आरोग्य सुपरवायझर गायकवाड व प्राथमिक आरोग्य केंद्र रायगाव चे पूर्ण कर्मचारी आणि गावातील सरपंच उपसरपंच सदस्य गावातील उपस्थित होते

Friday, 12 March 2021

लोणार येथील शासकीय गोडाऊन मधील ज्वारीच्या काही कट्टयाना सायंकाळी 5 वाजता किरकोळ आग

 

लोणार येथील शासकीय गोडाऊन मधील ज्वारीच्या काही कट्टयाना सायंकाळी 5 वाजता किरकोळ आग

            लोणार - प्रणव वराडे 
लोणार येथील शासकीय गोडाऊन मधील ज्वारीच्या काही कट्टयाना सायंकाळी 5 वाजता किरकोळ आग लागल्याचे निदर्शनास आले. आग लागलेल्या कट्ट्यामधून ज्वारी खाली करण्यात आली असून धान्याचे नगण्य नुकसान झाले आहे. सध्या गोडाऊन पूर्णतः सुरक्षित असून आगीने प्रभावित कट्टे खाली करून बाहेर ठेवण्यात आले आहे. आगीने प्रभावितअसलेल्या कट्या पासून सुरक्षित असलेले अंदाजे 1200 कट्टे तात्काळ सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्यामुळे मोठे नुकसान टाळण्यात यश आले. यामध्ये गोडाऊन येथील हमाल सोबतच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील हमाल व स्थानिक स्वयंसेवकांनी मदत प्रशासनाला मदत केली.

Thursday, 11 March 2021

भरधाव वेगात जाणारे रेतीचे टिप्पर उलटलेचालक जखमी


भरधाव वेगात जाणारे रेतीचे टिप्पर उलटले
चालक जखमी


लोणार :- प्रणव वराडे

भरधाव वेगात जास्तीत जास्त रेतीच्या फेऱ्या व्हाव्या या उददेशाने अनेक रेती वाहने शेंगाव ते पंढरपुर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने वाहत
असतात असाच अपघात दि 11 मार्च20201 रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान लोणार ते मंठा रस्त्यावरील बायपास रोडवर असलेल्या अर्थव हॉटेल समोर असलेल्या वळणावर रेतीने भरलेले टिप्पर उलटल्याची घटना घडली सुदैवाने समोरून कोणतेच वाहन वा पादचारी नसल्याने मोठा अनर्थ टळला याबाबत सविस्तर वृत्त असे की,मराठवाडयातील पुर्णा नदीपात्रातील वाळु उपसा सुरू झाल्याने रेतीघाटातुन तसेच रेतीघाटाकडे जाणारे रेतीवाहतुक संख्येत मेाठया प्रमाणात वाढ झाली असे असताना आपल्या वाहनाच्या दिवसभरात जास्तीत जास्त रेती फेऱ्या व्हाव्या या उददेशाने हे रेतीवाहन चालक निष्काळजीपणे भरधाव वेगाने आपले वाहन चालवित असल्याचे दिसुन येत आहे याचे उदाहरण 11 मार्च 2021 रोजी घडले रेती घाटातुन भरधाव वेगाने येणारे 10 टायर टिप्पर क्रं एम एच 28 एबी 4888 नुकतेच पासींग झालेले व नंबर सुध्दा चुन्याने टाकलेले टिप्पर दुपारी 4 वाजेच्या दरम्यान भरधाव वेगाने येत मंठा नाक्याजवळ असलेल्या वळणावर पलटी झाले यामधील ड्रायव्हर व आत मध्ये असलेले दोन व्यक्ती काचा फुटुन बाहेर पडत टिप्पर पलटी झाले यामध्ये चालक जखमी झाला असुन या टिप्पर मध्ये तळणी वरून लोणार येथे येणारा एक प्रवासी सुध्दा जखमी झाला या टिप्परच वेग भयानक होता त्यामुळे टिप्पर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टिप्पर पलटी झाले मागील महीन्यापासुन वायुवेगाशी स्पर्धा करीत रेती टिप्पर चालक बेभानपणे शहरातुन रात्रदिवस रेती वाहतुक करत आहे यामध्ये महसुल विभागाचा तपासणी नाका आहे महसुल प्रशासन त्याचे काम चोखपणे बजावत आहे मात्र ज्या भागातुन सदर रेती वाहतुक बरणारे बेभान बेकरदरपणे चालणारे टिप्पर याला संबधीत पोलीस प्रशासन बिट जमादार यांचाकडुन अभय मिळत आहे एरव्ही दुचाकीस्वावार कारवाई करणारे पोलीस प्रशासन रेती माफीयावर व टिप्पर चालाकावर कारवाई का करत नाही हा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थीत करीत आहे.भरधाव वेगाने रेती वाहतुक करणाऱ्यावर कारवाई होणे गरजेचे असताना सुध्दा पोलीस प्रशासनाकडुन कारवाई होत नसल्यामुळे सर्वसामन्य नागरिकामध्ये पोलीस प्रशासनाविरोधात रोष निर्माण झालेला आहे.या घटनेत जखमी झालेल्या चालकास उपचारासाठी खाजगी रूग्नालयात घेउन गेले असुन वृत्त लिहेपर्यत घटनास्थळी पोलीस प्रशासन पोहचले नाही.

Wednesday, 3 March 2021

लोणार नगरपालिका काच्या वतिने टाकाऊ पाण्याच्या बाटल्या पासून सेल्फी पॉइंट




 लोणार नगरपालिका काच्या वतिने टाकाऊ पाण्याच्या बाटल्या पासून सेल्फी पॉइंट

लोणार - (प्रणव वराडे) 
                                        लोणार सरोवर हृदयात सामावून घेण्यासारखे असून येणाऱ्या पर्यटकाने लोणार सरोवराकाठी I love lonar हे स्लोग्गन असलेल्या सेल्फी पॉईंट वर सेल्फी काढत लोणार सरोवर हृदयात कायम  आठवन घेत जातील असे लोणार तहसील चे कर्तव्यदक्ष तहसीलदार सैफन नदाफ यांनी सेल्फी पॉईंट च्या लोकार्पना प्रसंगी मनोगत व्यक्त केले.यामध्ये प्रामुख्याने लोणार न.प चे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे,नगरअध्यक्ष पूनम मनीष पाटोळे,उपद्य्क्ष नूर मोहम्मद खान (बादशह खान)  आरोग्य निरीक्षक अशोक निचंग यांच्या संकल्पनेतून सदर सेल्फी पॉईंट अस्तित्वात आले असुन या मान्यवरांचे काम प्रशंसनिय असल्याचे तहसीलदार सैफन नदाफ यांनी सागितले या वेळी प्रमुख उपस्थिती मध्ये पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, नगरपालिका मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, नगरपालिका उपाध्यक्ष बादशाह खान, नगरसेवक संतोष मापारी,नगरसेवक डॉ अनिल मापारी, गजानन खरात,काॅग्रेसचे शहर अध्यक्ष नितीन शिंदे , गजानन जाधव, पत्रकार प्रमोद वराडे,संदीप मापारी, राहुल सरदार,आशोक इंगळे,संतोष पुंड,प्रणव वराडे आरोग्य विभागाचे प्रमुख अशोक निंचग, संजीवकुमार ऐन्नैवार,माजी नगरपालिका उपाध्यक्ष शे समद आदि मान्यवर उपस्थित होते.या वेळी नागरीकांचा उत्साह ओसांडून वाहत होता. तहसीलदार व मुख्याधिकारी यांच्या कन्येला सुद्धा सेल्फी चा मोह आवरला नाही या वेळी लोणार तहसीलदार यांची सुकन्या कु.सेहरीश व न.प मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांची सुकन्या कु.रुही या दोघीना I love lonar  या सेल्फी पॉईंट वर सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही दोघींनी एकत्र येत सेल्फी घेत मनमुराद आनंद लुटला यां सोहळ्यातील ती सेल्फी अविस्मरणीय व आकर्षित सेल्फी ठरली 

Tuesday, 2 March 2021

लोणार शहरातील मेन रोडवरील तिन दुकानास आग लागुन लाखो रूपयाचे नुकसान

 




लोणार शहरातील मेन रोडवरील तिन दुकानास आग लागुन लाखो रूपयाचे नुकसान

लोणार :- प्रणव वराडे

लोणार शहरातील मुख्य रस्त्यावरील तिन दुकानास आग लागुन लाखो रूपयाचे नुकसान झाल्याची घटना 2 मार्च 2021 च्या  सायंकाळी 6वाजेच्या दरम्यान घडली असनु अदयापपर्यत आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही यामध्ये कपडा दुकान, स्टेशनरी, व किराणा दुकानाचा समावेश आहे लोणार ते लोणी रोडवर हिरडव चौकामध्ये शरद किराणा , जैन कलेक्शन, शुभमंगल कापड केंद्र या तिन दुकानास अचानक 2मार्च च्या सायंकाळी6 वाजेच्या दरम्यान शरद किराणा यांच्या दुकानास प्रथम आग लागली आगीचे रोद्र रूप पाहाता सर्वत्र हाहाकार झाला पाहता पाहता आगीने मोठा भडका घेत शेजारीअसलेल्या जैन कलेकशन व शुभमंगल कापड केंद्रावर ही आपला हल्ला चढविला आगीचे बातमी शहराभर पसरताच सर्वत्र नागरिकाची आग विझविण्यासाठी जिवाचेरान करित होते लोणार नगरपालीका अग्नीशामक दल तसेच शहरातील खाजगी पाणी ट्रकर आग विझविण्यास व्यस्त होते मात्र आगीचे रौद्र रूप पाहता आगवि झविण्यारे सुध्दा कमी पडले सदर आग तब्बल दोन तासापासुन सुरू असताना सुध्दा आग विझविण्यामध्ये वृत्त लिहेपर्यत आटोक्यात आली नव्हती या आगीमध्येत तब्बलतिन्ही दुकानाचे सर्व साहीत्य जळुन अंदाजे 60 ते 70 लाखाचे नुकसान झाले यावेळी नागरिकाची एकच गर्दी केली होती यामध्ये अग्नीशामक दलाचे शेख खालीक हा अग्नीशामक गाडीवरून पडल्याने गंभीर जखमी झाला आहे मात्र आगी मध्ये कोणत्याही प्रकारची जिंवीत हानी झाली नाही




Monday, 8 February 2021

महर्षी वाल्मिक क्रीडा संघातर्फे क्रिकेट सामन्या चे आयोजन


महर्षी वाल्मिक क्रीडा संघातर्फे क्रिकेट सामन्या चे आयोजन 


लोणार ( सतीश मुलंगे )
                                  
                                    महर्षी वाल्मिक क्रीडा संघातर्फे क्रिकेट सामन्या चे आयोजन  लोणार शहरातील वाल्मिक संघटातर्फे  क्रिकेट चे सामने आयोजित करण्यात आले अनेक टीम स्पर्धेत सहभागी झाले आहेत विजेत्यांना पारितोषिक देण्यात येणार आहेत या सामन्याचे उत्घाटन लोणार शिवसेना उपशहर प्रमुख शुभम देसाई यांच्या हस्ते करण्यात आले आहे जिंकणाऱ्या टीम ला प्रथम बक्षीस रोख रक्कम ५००० रुपये देण्यात येईल व दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम ३००० रुपये देण्यात येईल महर्षी वाल्मिक क्रीडा संघातर्फे क्रिकेट सामन्याचे उत्घाटन डॉ प्रवीण नेवरे व शिवसेना शहर उप अध्यक्ष शुभम देसाई यांच्या अद्य्क्षेते खाली पार पडले 

लोणार युवक शहर अध्यक्ष पदी अक्षय मापारी पाटील


लोणार युवक शहर अध्यक्ष पदी अक्षय मापारी  पाटील 


लोणार (सतीश मुलगे ) 
                                    राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश  अध्यक्ष मा.महेबूबभाई यांच्या मान्यतेने  राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस लोणार युवक शहर अध्यक्ष पदी माननीय अक्षय मापारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे 
आदरणीय शरदचंद्रजी  पवार साहेब यांच्या विचारानुसार व बुलढाणा जिल्ह्याचे पालक मंत्री . डॉ  राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुढील काळात  राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस च्या माध्यमातून सर्व सामान्य युवकांच्या विकासात भरीव कार्य कराल व पक्ष संघटना मजबूत उभी कराल हि अपेक्षा करत  राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस लोणार युवक शहर अध्यक्ष पदी माननीय अक्षय मापारी पाटील यांची नियुक्ती शेखर विनायकराव बोंद्रे  राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली  


Friday, 5 February 2021

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वनकुटी व्ह्यू पॉईंट येथून केली लोणार सरोवराची पाहणी


मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी  वनकुटी व्ह्यू पॉईंट येथून केली लोणार सरोवराची पाहणी

लोणार - (प्रणव वराडे) - मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज वनकुटी व्ह्यू पॉईंट येथून लोणार सरोवराची पाहणी केली. यावेळी त्यांनी लोणार सरोवराची माहिती जाणून घेतली. लोणार सरोवर हे जैवविविधतेचे भांडार आहे. या सरोवराचा विकास करताना एक निश्चित नियोजन तयार करावे, त्यानुसार आराखडा तयार करावा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तरच हे सरोवर पर्यटनासाठी नावारूपास येईल, असे मत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केले.याठिकाणी मंदिरांची संख्या अधिक असल्याने वन पर्यटन किंवा मंदिराच्या भेटी यापैकी एका पर्यायाची निवड करून त्याच प्रस्तावावर काम करावे. येथील वनसंपदा धोक्यात येऊ नये,यासाठी मर्यादित प्रवेश ठेवावा. लोणार सरोवराचा विकास रणथंबोरच्या धर्तीवर करू शकतो का याची पडताळणी करावी,असे ते म्हणाले.

Wednesday, 3 February 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शुक्रवारी लोणार येथे दौरा

 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शुक्रवारी लोणार येथे दौरा 

लोणार ( प्रणव वराडे ) ०३/०२/२०२१

  लोणार पर्यटनदुष्ट्या  महत्वपूर्ण ठरलेल्या मात्र विकासात तेवढ्याच दुर्लक्षित असलेल्या लोणार सरोवराची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी येणार आहेत. या अनुषगाने अधिकार्यांनी लोणार येथे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी स्थळाची पाहणी केली. कोरोना काळानंतर लोणारच्या विकास कामाचा आढावा घेण्यासाठीच मुख्यमंत्री येत आहेत त्यांच्या  कडून  विशेष घोषणेची अपेक्षा लोणारकराणा आहे 

                

डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ

  डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ लोणार - प्रणव वराडे उपमुख्यमंत्री कार्यालय ...