डॉ. निलेश किनगेचा बाजार आवरला
डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची मान्यता निलंबित
नवे कोविड रूग्ण भरती करायला केली मनाई

जळगाव -
डॉ. निलेश किनगे यांच्या डेडिकेटीड कोविड हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्याचा आदेश जिल्हा शल्यचिकित्सक व नोडल आॕफिसर डॉ. नागेश चव्हाण यांनी दिले आहेत. गेले २ दिवस किनगे यांचा कोविड रुग्णांची लूट करण्याचा बाजार सध्या आवरला आहे. पुढील चौकशी होऊन त्यांचा बाजार उठणे निश्चित होईल.
किनगे यांनी कोविड रुग्णांना आकारलेल्या अवास्तव व अवाजवी बिलांची, चिटोऱ्यांची सोशल मीडियात चर्चा होती. याची दखल कोविड प्राधिकरण अध्यक्ष, जिल्हाधिकारी व नोडल आॕफिसर यांनी घेतली. त्यानंतर किनगे यांच्या हॉस्पिटलची चौकशी करण्यासाठी समिती पाठविण्यात आली. या समितीने केलेल्या पाहणीत अनेक तृटी आढळल्या.
पाहणीत आढळलेले आक्षेपार्ह मुद्दे असे - १) परवानगी १५ खाटांसाठी असताना तेथे प्रत्यक्षात २४ रुग्ण आढळले. २) कर्मचारी पीपीई किट वापरत नसताना दिसले. ३) हॉस्पिटलमध्ये आॕक्सिजनचा वापर जास्त होत होता. ४) किनगेंच्या हॉस्पिटलची मान्यता १७ जानेवारीला रद्द केलेली होती. तरीहे हे सेंटर सूरू होते. ५) दि. १७ जानेवारी ते २१ फेब्रुवारीपर्यंत विना मान्यता रुग्ण भरती केलेले दिसले.
वरील कारणे लक्षात घेऊन किनगे यांच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचा रवाना पुढील आदेश होईपर्यंत निलंबित केला आहे. आज पासून कोविडचेनवे रूग्ण दाखल करायला मनाई केली आहे. आहे ते रुग्ण उपचार करून डिस्चार्ज करावे असे आदेशात म्हटले आहे.
कोणाचीही गय नाही - गुलाबभू
डॉ. किनगेवरील कारवाईचे स्वागत आहे. रुग्णांना छळणाऱ्या कोणाचीही गय प्रशासनाने करू नये. रूग्णांच्या अवास्तव बिल तपासणीसाठी पुरसे सरकारी आॕडीटर नेमायची सूचना केली आहे असे जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

No comments:
Post a Comment