लोणार नगरपालिका काच्या वतिने टाकाऊ पाण्याच्या बाटल्या पासून सेल्फी पॉइंट
लोणार - (प्रणव वराडे)
लोणार सरोवर हृदयात सामावून घेण्यासारखे असून येणाऱ्या पर्यटकाने लोणार सरोवराकाठी I love lonar हे स्लोग्गन असलेल्या सेल्फी पॉईंट वर सेल्फी काढत लोणार सरोवर हृदयात कायम आठवन घेत जातील असे लोणार तहसील चे कर्तव्यदक्ष तहसीलदार सैफन नदाफ यांनी सेल्फी पॉईंट च्या लोकार्पना प्रसंगी मनोगत व्यक्त केले.यामध्ये प्रामुख्याने लोणार न.प चे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे,नगरअध्यक्ष पूनम मनीष पाटोळे,उपद्य्क्ष नूर मोहम्मद खान (बादशह खान) आरोग्य निरीक्षक अशोक निचंग यांच्या संकल्पनेतून सदर सेल्फी पॉईंट अस्तित्वात आले असुन या मान्यवरांचे काम प्रशंसनिय असल्याचे तहसीलदार सैफन नदाफ यांनी सागितले या वेळी प्रमुख उपस्थिती मध्ये पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, नगरपालिका मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, नगरपालिका उपाध्यक्ष बादशाह खान, नगरसेवक संतोष मापारी,नगरसेवक डॉ अनिल मापारी, गजानन खरात,काॅग्रेसचे शहर अध्यक्ष नितीन शिंदे , गजानन जाधव, पत्रकार प्रमोद वराडे,संदीप मापारी, राहुल सरदार,आशोक इंगळे,संतोष पुंड,प्रणव वराडे आरोग्य विभागाचे प्रमुख अशोक निंचग, संजीवकुमार ऐन्नैवार,माजी नगरपालिका उपाध्यक्ष शे समद आदि मान्यवर उपस्थित होते.या वेळी नागरीकांचा उत्साह ओसांडून वाहत होता. तहसीलदार व मुख्याधिकारी यांच्या कन्येला सुद्धा सेल्फी चा मोह आवरला नाही या वेळी लोणार तहसीलदार यांची सुकन्या कु.सेहरीश व न.प मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांची सुकन्या कु.रुही या दोघीना I love lonar या सेल्फी पॉईंट वर सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही दोघींनी एकत्र येत सेल्फी घेत मनमुराद आनंद लुटला यां सोहळ्यातील ती सेल्फी अविस्मरणीय व आकर्षित सेल्फी ठरली
No comments:
Post a Comment