Thursday, 24 February 2022

कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालयात संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी




 कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालयात संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी 

लोणार (प्रणव वराडे)

स्थानिक लोणार येथील कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय, लोणार जि. बुलढाणा दि. २३ फेब्रुवारी २०२२ बुधवार ला राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने संत गाडगे बाबा यांच्या जयंती उत्सवात साजरा करण्यात आला. सर्व प्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू यांनी संत गाडगे बाबा यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू यांनी आपल्या मार्गदर्शनात संत गाडगे बाबा यांच्या दशसुत्री बद्दल माहिती दिली, तसेच आताच्या काळात गाडगे बाबा त्यावेळी दिलेली दशसुत्री किती महत्वाची आहे हे सांगितले.विद्यार्थ्यांना संत गाडगे बाबा यांच्या कार्याची माहिती व्हावी तसेच त्यांनी दिलेल्या दशसुत्री संदेश प्रत्येकापर्यंत जावा यासाठी राष्ट्रीय सेवा योजने च्यावतीने संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त संत गाडगे बाबा यांच्या जीवन कार्यावर online प्रश्न मंजुषेचे  आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू यांच्या मार्गदर्शनात  राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमधिकारी डॉ. सुर्यकांत भा. बोरूळ यांनी केले.  सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील रासेयो स्वंयसेवक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते

Monday, 21 February 2022

बनमेरू महाविद्यालयात शिवजन्मोत्सव साजरा


बनमेरू महाविद्यालयात शिवजन्मोत्सव साजरा

लोणार - (प्रणव वराडे)स्थानिक लोणार येथील कै. कु. दुर्गा क.बनमेरू विज्ञान महाविद्यालय व कै.कमलाबाई महिला महाविद्यालय लोणार येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी महाविद्यालयात शिवजन्मोत्सव साजरा  करण्यात आला. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन अमृत सेवाभावी संस्था सचिव डॉ. संतोष बनमेरू व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.सुर्यकांत बोरुळ यांच्या  हस्ते करण्यात आले. डॉ.संतोष बनमेरू यांनी आपल्या भाषणात सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराजांच्या विचारांची खास गरज आहे, तसेच त्यांनी दिलेली एकात्मतेची शिकवण व सर्व धर्म समभाव ही आता काळाची गरज आहे असे विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क.बनमेरू यांच्या मार्गदर्शनात रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.सुर्यकांत बोरुळ यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


 

Wednesday, 9 February 2022

नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावल्या बद्दल टिटवी येथील श्रावण जाधव चा सत्कार


 नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावल्या बद्दल टिटवी येथील श्रावण जाधव चा सत्कार

लोणार - प्रणव वराडे

लोणार तालुक्यातील टिटवी येथील श्रावण जाधव हा बिकट परिस्थितीवर मात करून गोवा येथे झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये दुस-या क्रमांकाच्या रौप्य पदकाचा मानकरी ठरला. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. श्रावण भिकाजी जाधव हा भूमिहीन शेतमजूर कुटूंबातील विद्यार्थी असून लहानपणीच त्यांचे पितृछत्र हरवल्याने अत्यंत गरिब परिस्थितीत शिक्षण घेत आहे. घरात आईच मोलमजुरी करून प्रपंच सांभाळते. तो बी. कॉमचा विद्यार्थी आहे. त्याला खेळाची सुध्दा आवड आहे. नुकत्याच गोवा येथे झालेल्या नॅशनल चॅम्पियन शिप १०० मिटर धावण्याच्या स्पर्धेत त्याने दुस-या क्रमांकाचे रौप्य पदक पटकावले असून इन्टरनॅशनल स्पर्धेसाठी जम्मू येथे होणाऱ्या निवड चाचणीसाठी जावे लागणार आहे. टिटवी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच भगवानराव कोकाटे यांनी श्रावण जाधवचा सत्कार करुन १ हजार ५०० रुपये आर्थिक मदत केली असल्याची माहिती ७ फेब्रुवारी रोजी देण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर डोळे, एकनाथ घाटे, बबन कोकाटे, भगवान नामदेव कोकाटे, फकिरा तनपुरे,गेंदु राऊत,विशाल राऊत, संतोष राऊत,राम तनपुरे व ग्रामस्थ उपस्थित होते

मोका पाहणी झालेल्या रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावावेस्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष संजय चाटे यांची मागणी


 मोका पाहणी झालेल्या रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावावेस्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष संजय चाटे यांची मागणी

लोणार - (प्रणव वराडे)

लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे येथील अडवलेल्या शेतरस्त्याची मागील वर्षी मोका पाहणी झाली आहे. तरी सदर रस्ता लवकरात लवकर खुला करून द्यावा. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक आघाडी तालुकाध्यक्ष संजय चाटे यांनी तहसिलदारांना निवेदन दिले आहे. चिंचोली सांगळे येथील गट नंबर ३१८ ते गट नंबर २७० पर्यंतचा संपूर्ण रस्ता काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेला आहे या दोन्ही गटांमधुन जाणारा शेत रस्ता नकाशाप्रमाणे सरकारी आहे. सदर रस्त्यावरून किमान ५० ते ७० शेतकऱ्यांना ये-जा करावी लागते. रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे शेतामध्ये जनावरे, बैलगाडी, खते बी-बियाणे व इतर शेती संबंधी अवजारे नेण्यास शेतकऱ्यांना फार तारेवरची कसरत करावी लागते, तरी सदर रस्त्याची मागील वर्षी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून पाहणी झालेली आहे, तरी यावर्षी सदर रस्ता मोकळा करून सदर रस्त्याचे पांदन रस्ता योजनेमध्ये समावेश करून रस्ता करून द्यावा ही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक आघाडी तालुकाध्यक्ष संजय चाटे यांनी दि. ०८ फेब्रुवारी निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती आज देण्यात आली आहे.

डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ

  डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ लोणार - प्रणव वराडे उपमुख्यमंत्री कार्यालय ...