Wednesday, 31 August 2022

व्हाईस ऑफ मीडियाच्या लोणार तालुकाध्यक्षपदी उमेश कुटे यांची नियूक्ती


व्हाईस ऑफ मीडियाच्या लोणार  तालुकाध्यक्षपदी  उमेश कुटे यांची नियूक्ती 

लोणार - ( प्रणव वराडे )

लोणार-तमाम पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून देशातील १७ राज्यांमध्ये कार्यरत असलेली संघटना म्हणून 'व्हाईस ऑफ मीडिया' या संघटनेची ओळख आहे.संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शणाखाली विदर्भ अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी बुलढाणा जिल्हा कार्यकारिनीला दिलेल्या निर्देशानूसार जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे,कार्यध्यक्ष अरुण जैन,सिद्धेश्वर पवार यांनी बुलढाणा जिल्हातील तालूक्याचे तालूका अध्यक्ष जाहीर केले .त्यामध्ये व्हाईस आँफ  मीडीयाचे  लोणार तालूका अध्यक्ष म्हणून दैनिक देशोन्नतीचे विशेष प्रतिनिधी उमेश कुटे यांची नियूक्ती पञ देऊन नियूक्ती केली आहे.सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. महाराष्ट्रातही पत्रकार आणि पत्रकारीतेच्या सर्वांगिण विकासासाठी ही संघटना अग्रेसर असून या संघटनेच्या जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांची निवड नुकतीच जाहीर झाली आहे 'व्हाईस ऑफ मीडिया' ही ५० ज्येष्ठ संपादकांनी एकत्र येऊन पत्रकारीता आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी निर्माण केलेली संघटना आहे. देशातील १७ राज्यांमध्ये ही संघटना कार्यरत आहे.व्हाईस आँफ मीडीया या पञकार संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष ,विदर्भ अध्यक्ष अनिल म्हस्के व जिल्हा कार्यकारिनीने माझ्यावर विश्वास दाखवून माझी तालूका अध्यक्षपदी नियूक्ती केली भविष्यात पञकारांना विश्वासात घेऊन त्यांच्या न्यायहक्कासाठी लढा देऊ. व नवीन तालूका कार्यकारणी लवकरच घोषीत करु.

 

Friday, 26 August 2022

तांबोळा येथील शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या.

 

तांबोळा येथील शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या.

लोणार तालुक्यातील तांबोळा येथील रहिवासी उत्तम धोंडू चव्हाण शेतकऱ्यांनी सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्रशांन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस झाली आहे.यबाबत सविस्तर असे की उत्तम धोंडू चव्हाण हे तांबोळा येथील अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे अंदाजे पाच एकर कोरडवाहू शेती असुन शेती ही पावसाच्या भरोशावर असून पावसाच्या लहरीपणामुळे पुन्हा एका शेतकन्याला आत्महत्या करून आपली जिवन यात्रा संपवली. 20 ऑगस्ट २०२२ रोजी उत्तम चव्हाण शेतकरी यांनी विष प्राशन केल्याचे उघडकीस आले तात्काळ ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बुलढाणा रुग्णालयात हलविण्यात आले येथून अकोला येथे सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचार दरम्यान 23 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे चार वाजेच्च सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व चार मुली असा आप्त परिवार आहे. उत्तम चव्हाण यांच्या मृत्युनंतर गावात व परिसरातः हळहळ व्यक्त केली जात आहे.

Friday, 12 August 2022

हिरडव येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शेख जावेद तर उपाध्यक्षपदी रुबीना आनिस शेख यांची निवड...



हिरडव येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शेख जावेद तर उपाध्यक्षपदी रुबीना आनिस शेख यांची निवड...


लोणार

लोणार तालुक्यातील हिरडव येथे 10 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती गठन उद्देशाने पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता,या मेळाव्यात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सदस्य यांची निवड करण्यात आली.शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक आघाडी तालुका अध्यक्ष शेख जावेद यांची अध्यक्षपदी तर रुबीना आनिस शेख यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. सोबतच सर्व समितीचे गठन करण्यात आले त्यामध्ये समाधान तेजराव बाजड,नंदा महादेव कळंबे,पूजा परसराम पुरी,प्रताप लक्ष्मण मुंडे, शेषराव नामदेव घायाळ, कल्पना भागवत पोफळे, सुवर्णा संतोष तुरूकमाने, याप्रमाणे समिती तयार करण्यात आली.या निवडीनंतर शेख जावेद यांचा भारतीय जनता पार्टीच्या टीमकडून त्यांचा सत्कार करून पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा महिला प्रदेश कार्यकारी सदस्य मंदाकिनीताई कंकाळ,आध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष सिताराम महाराज ठोकळ,जिल्हा नेते विजय मापारी,तालुका अध्यक्ष भगवानराव सानप,शहराध्यक्ष गजानन मापारी,किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मारोतराव सुरुशे,जिल्हा सचिव भाजयुमो उद्धव आटोळे,प्रकाश नागरे,बाबाराव गीते, प्रकाश महाराज मुंडे,संजय दहातोंडे,गणेश तांगडे, उमाकांत मिसाळ,शंकर गायकवाड,कृष्णा राठोड व इतर कार्यकर्ते पदाधिकारी हजर होते

 

कै. कू.दुर्गा क.बनमेरू विज्ञान महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ 2022सोहळा संपन्न

 



कै. कू.दुर्गा क.बनमेरू विज्ञान महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ 2022सोहळा संपन्न 

लोणार - प्रणव वराडे 

स्थानिक, लोणार येथील बनमेरू महाविद्यालयात तिसरे पदवी दान समारंभ सोहळ्याचे आयोजन, दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश बंनमेरू सर हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गणेशजी परिहार सर, प्राचार्य एम. इ. एस. कला व वाणिज्य महाविद्यालय मेहकर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात ही विद्यापीठ गीताने करण्यात आली या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. कमलाकर वाव्हल सरांनी भारतामधील शिक्षण प्रणालीची निर्मिती कशाप्रकारे करण्यात आली व उच्च शिक्षणाचे महत्त्व देशासाठी किती महत्त्वाचे आहे असे विद्यार्थ्यांना सांगून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या प्राचार्य डॉ. गणेशजी परिहार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःपुरता न ठेवता समाजासाठी त्याचा उपयोग होईल याची काळजी सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावी तसेच ज्या गोष्टी आपण अनुभवातून शिकतो त्या गोष्टींना आपण कधीच विसरत नाही असे विद्यार्थ्यांना आई व बाळाचे उदाहरण देऊन पटवून सांगितले. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दाशेतच आपल्या जास्तीत जास्त पदवी ग्रहण करून समाजामध्ये आपले नाव लौकिक करावे व पुढील भविष्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात महाविद्यालयातील  26 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच हर घर तिरंगा या योजनेअंतर्गत महाविद्यालयातर्फे प्रत्येक विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना तिरंग्याचे वाटप करण्यात आले. महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनी कु. अभिश्री मोरे या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगता मधुन  महाविद्यालयातील जुन्या आठवणी, शिकवण्याची पद्धत व सर्वांचे सहकार्य कसे लाभले असे तिने सर्वांना सांगितले.  हनुमान ताठे या विद्यार्थ्याने आपल्या मनोगतुन महाविद्यालयातून होणाऱ्या स्वतःच्या जडण घडणी बद्दल कसे सर्वांनी मार्गदर्शन केले याबद्दल आपले विचार सर्वांना सांगितले. कु. सिद्धि बनमेरू या विद्यार्थिनींनी महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्याला कसे सांभाळून घेतले व तसेच मा. डॉक्टर प्रकाश बनमेरू सरांनी हे महाविद्यालय उघडून विद्यार्थिनी साठी एक सामाजिक कार्य केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू सरांनी मान्यवरांचे आभार व्यक्त करत विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील पदवी घेतल्यानंतर एक चांगले नावलौकिक कमावे व देशाच्या पायाभरणीत हातभार लावावा तसेच आपल्या महाविद्यालयाचे नाव उच्च पातळीवर न्यावे अशी अपेक्षा त्यांनी विद्यार्थ्याकडून व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कमलाकर वाहल सरांनी केले तर प्रा. सौरभ गायकवाड सर यांनी आभार व्यक्त केले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले.

Wednesday, 10 August 2022

16,ऑगस्ट ला स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर लोणार तालुक्याच्या दौऱ्यावर


 16,ऑगस्ट ला स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर  लोणार तालुक्याच्या दौऱ्यावर

लोणार - प्रणव वराडे 

महाराष्ट्रातील  शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून संबोधल्या जाणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी राज्यमंत्री रविकांत भाऊ तुपकर व जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर टाले हे 16, ऑगस्ट रोजी लोणार तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी दीली आहे,

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर वेगवेगळे आंदोलन करून सरकारला गुडघे टेकण्यास भाग पाडणार्या  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांचे विश्वासू, स्वाभिमानी संघटनेचे नंबर दोन चे फायर ब्रँड नेते म्हणून महाराष्ट्रभर ज्यांच्या नावाची एक वेगळी ओळख आहे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री रविकांत भाऊ तुपकर हे 16 ऑगस्ट रोजी लोणार तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहे तालुक्यामधील,विवीध गावांमध्ये शाखा ऊद्घाटनाचे कार्यक्रम व किनगाव जट्टू येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी दीली

Tuesday, 9 August 2022

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत सामूहिक राष्ट्रगीत तथा हर घर तिरंगा अभियान



आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत सामूहिक राष्ट्रगीत तथा हर घर तिरंगा अभियान

लोणार - प्रणव वराडे

लोणार येथील मेहकर रोड वरील एल सी सी ग्राउंड येथे सामुदायिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम आज ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता  पार पडला आहे.आझादि चां अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन लोणार तहसील  कार्यालय चे तहसीलदार सैफण नदाफ आणि नगर परिषद लोणार च्या वतीने करण्यात आले होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शहरातील विविध शाळांनी सहभाग नोंदवित राष्ट्रगीत सामुदायिक गाऊन सहभाग नोंदविला.  सामुदायिक राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमाला लोणार तहसील चे तहसीलदार सैफन नदाफ,लोणार पोलिस स्टेशन चे ठाणेदार प्रदीप ठाकूर,लोणार नगर परिषद अध्यक्ष सौ.पुनम पाटोळे ,प्रकाश भाऊ मापारी, शंतनु मापारी,प्रा बळीराम मापारी तथा लोणार शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता.शाळेतील विद्यार्थी मित्रांनी हातात तिरंगा घेऊन आज सकाळी ११ वाजता उपक्रमात उत्साहाने सामिल झाले.  'आजादी का अमृत महोत्सव' अभियानांतर्गत दि. ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधी दरम्यान स्वराज्य महोत्सवाच्या पूर्व तयारीसाठी 'हर घर तिरंगा' या  देशपातळीवर,सुरू असलेल्या अमृत महोत्सवाचे महत्व दि.१३ ते १५ या कालावधीत वाढवून यात जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक, स्त्रिया, विद्यार्थी,कसे सहभाग घेतील याबाबत तहसीलदार सैफण नदाफ यांनी आव्हाहन केले

डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ

  डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ लोणार - प्रणव वराडे उपमुख्यमंत्री कार्यालय ...