Tuesday, 18 August 2020
Sunday, 9 August 2020
मुख्यमंत्र्यांच्या डिजिटल महाराष्ट्राचे शिलेदार ग्रामपंचायत संगणक परिचालक हे आजरोजी कोरोना महामारीच्या संकटात गावपातळीवर काम करीत असतांना कामाचा मोबदला तीन महिन्यापासून न मिळाल्यामुळे त्यांच्यावर आली उपासमारीची वेळ
मुख्यमंत्र्यांच्या डिजिटल महाराष्ट्राचे शिलेदार ग्रामपंचायत संगणक परिचालक हे आजरोजी कोरोना महामारीच्या संकटात गावपातळीवर काम करीत असतांना कामाचा मोबदला तीन महिन्यापासून न मिळाल्यामुळे त्यांच्यावर आली उपासमारीची वेळ
लोणार:- तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पा अंतर्गत कंत्राटी स्वरूपात काम करीत असणारे संगणक परिचालक यांच्या कामाचा मोबदला रक्कम ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग निधी मधून जिल्हा परिषदेस धनादेश देणे बाबत शासनाने जिल्हा परिषदेस कळवून सुद्धा ग्रामपंचायतींनी धनादेश न दिल्यामुळे संगणक परिचालक यांच्यासह कुटुंबावर आली उपासमारीची वेळ याबाबत सविस्तर असे की, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून २०११ पासून संग्राम (संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र व सध्या आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात नेमणूक असलेले संगणक परिचालक पंचायत समिती लोणार अंतर्गत ग्रामीण भागातील ग्रामपंचायतस्तरावर जनतेला विविध शासकीय दाखले देण्याचे व माहिती ऑनलाइन प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याचे तसेच वेळोवेळी शासनाने दिलेल्या कामे, सर्व्हे, योजनांची कामे यासह ग्रामपंचायत सांगेल ते काम संगणक परिचालक प्रामाणिकपणे करतात. परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे प्रकल्प सुरू झाले तेव्हा पासून तुटपुंजे मानधन सुद्धा वर्ष-वर्ष मिळाले नाही. तरी देखील शासनाने नेमून दिलेले काम संगणक परिचालक करीत आहे. त्यातच आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पाची मुदत 31 मार्च 2020 रोजी संपलेली आहे, परंतु कोरोनामुळे पुढील निर्णय होईपर्यंत आहे तीच व्यवस्था सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेवून माहे एप्रिल, मे, जुन 2020 या तीन महिन्यांच्या कालावधीची आगाऊ रक्कम ग्रामपंचायतीचे चौदाव्या वित्त आयोगाच्या अखर्चित निधी मधुन जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याच्या सुचना देऊन आज रोजी तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा पंचायत समिती कार्यालय लोणार कडून
100 टक्के ग्रामपंचायतीचे निधीचे धनादेश जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आले नसून आजरोजी 16 ग्रामपंचायतीचे धनादेश पाठविणे बाकी असल्याची धक्का दायक बाब उघडकिस आली आहे. सध्या कोरोना महामारीचे संकट जागतीक स्तरावर सुरू आहे या संकटाचा मुकाबला करण्याकरीता सर्व यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. अश्या परिस्थितीत संगणक परीचालकांना कामाच्या मोबदल्या पासून वंचीत ठेवणे योग्य नाही. शासनाचे निर्देश असतांना सुद्धा पंचायत समितीच्या नियोजनशून्य कारभारामुळे 100 टक्के धनादेश जिल्हा परिषदेकडे जमा न झाल्यामुळे संगणक परिचालक यांचा तीन महिन्यांच्या पगार झाला नाही. यामुळे कुटुंब उदरनिर्वाहसाठी कर्जबाजारी होऊन उपासमारीची वेळ त्यांच्यासह त्यांच्या कटुंबावर आली आहे. आता पुन्हा शासनाने जुलै ते मार्च 2021 या 9 महिने कालावधीची रक्कम पंधराव्या वित्त आयोग निधी ग्रामपंचायत खात्यात जमा झाल्या नंतर निधीचे समायोजन करून तात्काळ जमा करणे बाबत शासनाने ८ जुलै रोजीच्या पत्रात नमूद केले आहे. परंतु शासनाने काढलेल्या पत्रानुसार
कार्यवाही का होत नाही याकडे शासनाचे लक्ष नाही का ? शासनाने पत्र काढले असतांना व चौदावा वित्त आयोगात निधी ग्रामपंचायतीस उपलब्ध असतांना जिल्हा परिषदेकडे वर्ग केला जात नाही तरी सुद्धा शासन चूप का हे शासनास दिसत नाही का ? असा प्रश्न संगणक परिचालक यांच्या मनात उपस्थीत होत आहे. संगणक परिचालक हा नियमीतपणे व आज रोजी कोरोनाच्या काळात ग्रामपंचायत पातळीवर पंचायत समिती, ग्रामसेवक व इतर विभागाने सांगितलेले काम करत असतांना गावातील नागरीक यांच्या सोबत त्यांचा संपर्क होत असतो तरी सुद्धा मनामध्ये कुठलीही भीती न बाळगता तुटपुंज्या 6000 रु. मानधन मिळण्यासाठी काम करीत आहे. पण ते मानधन सुद्धा त्यांना मिळण्यासाठी पंचायत समिती स्तरावरून कुठलेही ठोस पाठपुरावा होत नसल्याने अद्याप धनादेश जमा झाले नसल्याची चर्चा आहे. आज रोजी सन वार करीता तसेच आमचे पोट जगविण्यासाठी आमच्या केलेल्या कामाचा मोबदला मिळवून द्यावा व नियमित दरमहा मानधन मिळावे अशी मागणी संगणक परिचालक यांच्याकडून मागणी होत आहे. आता शासन यामध्ये लक्ष घालून नियमित दरमहा मानधन मिळवून देणार की ग्रामपंचायत आपला कामाचा मोबदला जिल्हा परिषदेस केव्हा पाठवणार याची प्रतीक्षा संगणक परीचालकास अजून करावी लागणार याकडे सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालक यांच लक्ष लागले आहे.
लोणार तालुका प्रतिनिधी:- प्रणव वराडे
बुलडाणा जिल्हयात आदिवासी असलेले गाव म्हणुन ख्याती असलेल्या टिटवी यागावात जागतीक आदीवासी
बुलडाणा जिल्हयात आदिवासी असलेले गाव म्हणुन ख्याती असलेल्या टिटवी यागावात जागतीक आदीवासी
लोणार (प्रणव वराडे)
9 ऑगष्ट हा दिन जागतीक आदिवासी गुणगौरव म्हणुन साजरा केला जातो बुलडाणा जिल्हयातील
लोणार तालुक्यातील बहुसंख्य आदीवासी म्हणुन प्राश्यात असलेल्या टिटवी गावामध्ये असलेले आदीवासी नेते तथा
टिटवी गावचे सरपंच तथा माजी पंचायत समिती सभापती भगवानराव कोकाटे यांनी जागतीक आदिवासी गुणगौरव दिन साजरा केला यावेळी बहुसंख्य आदीवासी बाधव उपस्थीत होते. यावेळी आदिवासी नेते भगवानराव कोकाटे यांनी आपल्या आदीवासी बांधवाना मागदर्शन करताना सांगीतले की आदिवासी या नावाला फार प्राचीन इतिहास आहे. आदिवासी म्हटले की, आपल्यासमोर डोंगर दर्यात राहणारा, जंगलात राहणारा, उघडा, नागडा असणारा, ओबड धोबड चेहर्याचा, जगाशी कुठलाही संपर्क नसणारा समाज येतो. जगाच्या पाठीवर ज्या माणसाने, ज्या जिवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव म्हणजेच आदिवासी. आज जगाच्या पाठीवर ज्या काही कला अस्तित्वात आहेत. त्या सगळ्या कलांचा उद्गाता आदिवासी आहे. आदिवासींची लोककला, चित्रकला, नृत्य, वादन, गायन, शिल्पकला याला तोड नाही. आदिवासी आजही आपली उपजीविका जंगलात मिळणार्या रानमेवाव्यावर करीत आहे. अगदी इतिहासकारांनी देखील अन्याय करण्याचे सोडले नाही. इतिहासाच्या बाबतीत आदिवासी समाजावर झालेला अन्याय अशा प्रकारे जागतिक आदिवासी दिवस ख-या अर्थाने कुठे तरी आदिवासी विचारांनी साजरा करू शकलो या समाधानाने हे सर्व इथे मांडत आहे. हा सर्व सोपस्कार इथे मांडण्यापाठीमागे एकच उद्दिष्ट कि असे उपक्रम अधिकाधिक प्रमाणात सादर झाले त्यासाठी आपल्या मुलांनी पुढाकार घेतला पाहिजे.जगतिक आदिवासी गुणगौरव दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सौ गोदावरी भगवान कोकाटे , सरपंच टिटवी भगवानराव कोकाटे ,ज्ञानेश्वर डोळे उपसरपंच एकनाथ घाटे श्याम तनपुरे शाळा समिती अध्यक्ष राम घोगरे सदस्य एकनाथ तनपुरे शेकडो ग्रामस्थ कार्यक्रमाला हजर होते
डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ
डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ लोणार - प्रणव वराडे उपमुख्यमंत्री कार्यालय ...

-
डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ लोणार - प्रणव वराडे उपमुख्यमंत्री कार्यालय ...
-
11 ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या बौद्ध समाज संवाद यात्रा निमित्त. हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा, वंचित बहुजन आघाडी मेहकर- लोणार विधानसभा नेते, न...
-
दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र लोणार यांच्यावतीने दत्तजयंती निम्मित अखंड नामजप सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळ संपन्न लोणा...