Sunday, 26 December 2021

लोणार शाखेचा भोंगळ कारभार

 



लोणार शाखेचा भोंगळ कारभार 

लोणार ( प्रफुल पाटोळे ) -

एक महिन्यापासून सेवा प्रबंधक नाही स्थानिक लोणार शहरात राष्ट्रीयकृत बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेचे एकच शाखा असून लोणार शहरासह 24 खेडे या शाखेला जोडण्यात आलेले आहेत. लोणार शाखेचे शाखा प्रबंधक विवेक इगवे हे सेवा प्रबंधक यांचे काम पाहत असून त्यांच्याकडील ग्राहकांचे असलेली कामे प्रलंबित राहतात तसेच पिक कर्ज नूतनीकरण यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग पूर्ण वेळ उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी ग्राहकांचे अतोनात हाल होताना दिसत आहेत. शेतकरी बांधवाना रात्रीला पिकांना पाणी देण्यासाठी रात्र जागून काढावी लागते आणि बँकेत दिवसभर आपले काम करून घेण्यासाठी रांगेत उभे रहावे लागत आहे.    सेवा प्रबंधक कायमस्वरूपी नसल्यामुळे शेतकऱ्याचे अनुदान निराधार अनुदान केवायसी चेक पासिंग नवीन पासबुक व इतर सेवा ग्राहकांना मिळत नसल्यामुळे वयोवृद्ध पासून ते शाळकरी मुलं व्यापारीवर्ग सहित ग्राहकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे तरी या बाबीकडे बँकेचे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

राज्यातही थंडीचा कडाका वाढला असून पारा घसरला आहे. थंडीसोबतच रात्री व पहाटे धुके पडत असल्याने शहरासह ग्रामीण भागात





लोणार किशोर मोरे   : राज्यातही  थंडीचा कडाका वाढला असून  पारा घसरला आहे. 
थंडीसोबतच रात्री व पहाटे धुके पडत असल्याने शहरासह ग्रामीण भागात  

 रस्ते धुक्यात हरविल्यासा आभास होत 
आहे. यामुळे वाहनधारकांना सकाळच्या प्रहरी  दिवे 
लावून वाहने चालविण्याची वेळ आली आहे.
डिसेंबर महिन्याच्यासुरुवातीला पाहिजे तशी थंडी 
नव्हती, मात्र गत ५ ते ६ दिवसांपासून ग्रामीण व  शहर व भागात 
थंडीचा चांगलाच जोर वाढला. तापमानात घट होऊन थंडीचा 
जोर कायम असून   संपूर्ण शहर धुक्यात गडप 
झालेले दिसून आले. १०० मिटर अंतरावरीलही या 
धुक्यामुळे काही दिसेनासे झाले होते. थंडीचा कडाका 
वाढल्याने रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकासाठी हे 
वातावरण फायदेशीर ठरणार असल्याचे जाणकार बोलत 
असले तरी धुक्याचा पिकांवर परिणाम होण्याची शक्यताही 
वर्तविली जात आहे. गत ५ ते ६ दिवसांपासून वातावरणात 
परिणामकारक बदल झाला असून दिवसागणिक वाढत 
चालेली थंडी, सकाळ व सायंकाळच्या सुमारास पडत 
असलेले धुके आणि ढगाळी वातावरणामुळे गहू, हरभरा, 
कपाशी या पिकांसोबतच भाजीपालावर्गीय पिकांनाही जबर फटका बसत आहे.


 

Friday, 24 December 2021

लोणार सेंट्रल पब्लिक स्कूल मध्ये राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणित प्रदर्शन उत्साहात साजरा...

 


लोणार सेंट्रल पब्लिक स्कूल मध्ये राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणित प्रदर्शन उत्साहात साजरा...

लोणार - (प्रफुल पाटोळे)

स्थानिक लोणार सेंट्रल पब्लिक स्कूल येथे राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने दिनांक २२ डिसेंबर रोजी शाळेत गणित विभागातर्फे गणित विषयाचे प्रदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन, गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.कार्यक्रमास श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री बायस्कर सर उद्घाटक म्हणुन लाभले तर प्रमुख उपस्थिती श्री. नखाते सर, श्री परसुवाले सर, श्री अकील सर, श्री बचाटे सर, श्री शेवाळे सर, उपप्राचार्य श्री शेख सर, व श्री चव्हाण सर यांची होती तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री कुळकर्णी सर होते. श्रीनिवासन यांच्या जीवनावर प्रकाश टाकत बायसकर सरांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले आणि गणितज्ञ श्रीनिवास यांनी जवळपास ३००० हून अधिक प्रमेय लिहून गणित क्षेत्रात मोठे कार्य केले असे सांगितले तसेच आपल्या दैनंदिन जीवनात गणिताचे महत्त्व सरांनी आपल्या भाषणातून पटवून दिले.अध्यक्षिय भाषणातून प्राचार्य कुळकर्णी सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, यावेळी त्यांनी विद्यार्थांचे भरभरून कौतुक केले. कोरोनाच्या भीषण परिस्थितीनंतर सुध्दा विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात सहभाग घेतला आणि विविध प्रकारचे गणित साधने, प्रोजेक्ट, उपकरण आदी कौतुकास्पदरित्या तयार केले.यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक संचालक श्री फैसल सरांनी करत आम्ही शाळेत नेहमी विद्यार्थ्यासाठी नवनवीन उपक्रम राबविल्याचे सांगितले.या कार्यक्रमाचे संचालन कु. अनुष्का विभुते आणि कु. जान्हवी कांबळे यांनी केले, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गणित शिक्षक पऱ्हाड सर आणि कुळकर्णी मॅडम यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी गणित विभाग आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गणित प्रदर्शनाची जबाबदारी साळवे सर व सोसे सर यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली. पालकांनी देखील मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमास उपस्थिती नोंदविली

डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ

  डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ लोणार - प्रणव वराडे उपमुख्यमंत्री कार्यालय ...