जिल्हास्तरीय खरिप - पीक स्पर्धेत शेतकरी शिवानंद मुंढे सन्मानित
लोणार - प्रणव वराडे
सन २०२१-२२ यावर्षात जिल्हास्तरीय खरीप पीक स्पर्धेत सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी शिवानंद संतोष मुंढे यांना जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सन २०२१-२२ या वर्षात घेण्यात आलेल्या खरीप पीक स्पर्धेत नांद्रा येथील प्रगतीशील शेतकरी शिवानंद संतोष मुंढे यांनी सोयाबीन या पिकाचे हेक्टरी ५२ क्विंटल ७० किलो विक्रमी उत्पादन घेऊन जिल्हास्तरावर दुसरा क्रमांक पटकाविला. त्यामुळे १३ मे २०२३ रोजी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी खा. प्रतापराव जाधव, आ. संजय गायकवाड, आ. संजय रायमुलकर, आ. धीरज लिंगाडे, आ. राजेश एकडे, आ. श्वेता महाले, कृषीसचिव एकनाथ डवले, प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांची उपस्थिती होती. टोकन पध्दतीने सोयाबीनची लागवड करुन त्यांनी हे उत्पादन घेतले असल्याचे शेतकरी मुंढे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.