Thursday, 28 December 2023
दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र लोणार यांच्यावतीने दत्तजयंती निम्मित अखंड नामजप सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळ संपन्न
श्री स्वामी समर्थ महाराज व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ त्र्यंबकेश्वर चे पिठाधीश परमपुज्य श्री गुरूमाऊली यांच्या कृपा आशीर्वादाने व आदरणीय युवासंत चंद्रकांत दादासाहेब यांच्या परवानगीने श्री दत्त जयंती अखंड जप नाम यज्ञ सप्ताह श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र समर्थ नगर लोणार येथे दि.20/12/2023ते 27/12/2023 पर्यंत आयोजित करण्यात आला होता .या सप्ताह मध्ये सामुदायिक गुरूचरित्र पारायण,प्रहर सेवा, गणेश याग, चंडी यांग, रुद्र याग, मल्हारी सप्तशती पठण, दुर्गा सप्तशती पठण, यांसारख्या विविध ग्रंथ पठण सेवा अखंड पन्हे सुरू होत्या. प्रहर सेवेमध्ये दोन सेवेकरी स्वामी चरित्र सारामृत पठण, दोन सेवेकरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप, दोन सेवेकरी विना वादन करून श्री स्वामी समर्थ मंत्र जप सेवा अखंड पणे करत होते .आज या सप्ताहाची समाप्ती झाली आहे. लोणार शहरातील सामुदायिक श्री गुरुचरीत्र पारायणास सुरूवात झाली तेव्हा पासून 141 पारायण करणारे सेवेकरी यांनी सहभाग घेतला आहे.प्रहर सेवा देखील सुरू होत्या .या मध्ये सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत महिला सेवेकऱ्यांनी सेवा दिली तर रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत पुरुष सेवेकऱ्यांनी सेवा दिली. या नंतर ही जास्तीत जास्त लोकांनी या सेवेमध्ये सहभाग घेऊन अतिउच्च कोटींची सेवा श्री स्वामी समर्थ महाराज व परमपुज्य श्री गुरूमाऊली यांच्या चरणी रुजू केली . आपली कोणतीही समस्या सोडविण्याचे सामर्थ्य या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्गात असून आपल्या समस्येवरील अध्यात्मिक मार्गदर्शन साठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र समर्थ नगर लोणार येथे डॉ सुशील अग्रवाल यांच्या शी संपर्क साधावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र लोणार यांच्या मार्फत करण्यात आले आहे. खूप कालावधी पासून लोणार परिसरात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सुरू असून हजारो सेवेकरी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाला जोडले गेले आहेत. समस्या अनुरूप मार्गदर्शन घेऊन समस्या सूटल्याचे अनुभव हजारो सेवेकरी घेत आहेत. आज या सप्ताह चा शेवटचा दिवस होता आज सकाळी पासून केंद्र मध्ये गर्दी पहावयास मिळाली 10 ,30 च्या मंगल आरती नंतर महाप्रसाद चे वाटप करण्यात आले त्या मध्ये हजारो भक्तांनी लाभ घेतला. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र लोणार येथे दर गुरुवारी व रविवारी संध्याकाळ च्या आरती नंतर प्रश्न उत्तरी घेण्यात येते ,याचा लाभ सुद्धा जास्तीत जास्त भक्तांनी घ्यावा असे अवाहन लोणार केंद्र कडून करण्यात आले आहे
Tuesday, 18 July 2023
एच डी एफ सी बँकेकडून वारकऱ्यांना प्रसाद व पाणी वाटप
एच डी एफ सी बँकेकडून वारकऱ्यांना प्रसाद व पाणी वाटप
लोणार - प्रणव वराडे प्रतिनिधी
लोणार नगरीत काल दिनांक १८ जुलै रोजी भक्तिमय वातावरनात श्री संत गजानन महाराज पालखी चे आगमन झाले या वेळी श्री संत गजानन महाराज पालखी ही धार रोड , जामा मज्जिद चौक , विनायक चौक , हिरडव चौक ते विसावा ठिकाना पर्यंत जागो जागी श्री संत गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांना जागो जागी महाप्रसाद , पाणी वाटप, करण्यात आले लोणार मधील एच डी एफ सी बँकेतील कर्मचारी प्रेम मापारी यांच्या संकलपनेतून बँके तर्फे वारकऱ्यांना फराळी चिवडा व पाणी वाटपाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी बँकेचे ब्रांच मॅनेजर नागेश सोनवणे,अमोल नागरे,प्रशांत सोनवणे,प्रेम मापारी,वैष्णवी मॅडम असे अनेक बँकेतील कर्मचारी उपस्थित होते
Sunday, 14 May 2023
जिल्हास्तरीय खरिप - पीक स्पर्धेत शेतकरी शिवानंद मुंढे सन्मानित
जिल्हास्तरीय खरिप - पीक स्पर्धेत शेतकरी शिवानंद मुंढे सन्मानित
लोणार - प्रणव वराडे
सन २०२१-२२ यावर्षात जिल्हास्तरीय खरीप पीक स्पर्धेत सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी शिवानंद संतोष मुंढे यांना जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सन २०२१-२२ या वर्षात घेण्यात आलेल्या खरीप पीक स्पर्धेत नांद्रा येथील प्रगतीशील शेतकरी शिवानंद संतोष मुंढे यांनी सोयाबीन या पिकाचे हेक्टरी ५२ क्विंटल ७० किलो विक्रमी उत्पादन घेऊन जिल्हास्तरावर दुसरा क्रमांक पटकाविला. त्यामुळे १३ मे २०२३ रोजी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी खा. प्रतापराव जाधव, आ. संजय गायकवाड, आ. संजय रायमुलकर, आ. धीरज लिंगाडे, आ. राजेश एकडे, आ. श्वेता महाले, कृषीसचिव एकनाथ डवले, प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांची उपस्थिती होती. टोकन पध्दतीने सोयाबीनची लागवड करुन त्यांनी हे उत्पादन घेतले असल्याचे शेतकरी मुंढे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ
डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ लोणार - प्रणव वराडे उपमुख्यमंत्री कार्यालय ...

-
डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ लोणार - प्रणव वराडे उपमुख्यमंत्री कार्यालय ...
-
11 ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या बौद्ध समाज संवाद यात्रा निमित्त. हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा, वंचित बहुजन आघाडी मेहकर- लोणार विधानसभा नेते, न...
-
दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र लोणार यांच्यावतीने दत्तजयंती निम्मित अखंड नामजप सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळ संपन्न लोणा...