Saturday, 12 October 2024

डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ

 


डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ



लोणार - प्रणव वराडे

उपमुख्यमंत्री कार्यालय राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष व सुलतानपूर येथील डॉ. आर. एन. लाहोटी होमोओपॅथीक मेडिकल कॉलेज, रुग्णालय संस्था सुलतानपूर यांच्या द्वारा लोणार, मेहकर, सिंदखेड राजा तालुक्यातील ग्रामीण भागात 20 शिचिरांचे आयोजन केले होते. त्यामध्ये अंगणवाडी परिसर, व जि. प. प्राथमिक शाळा परिसर, उपकेंद्र व प्राथमिक केंद्र सुलतानपूर, अंजनी, बोरखेडी, चायगाव,वडगाव तेजन, पारडी सिरसाट, खळेगाव, कंडारी, भंडारी, डोणगाव, शेंदुर्जन, मेहकर, भानापूर, होमोओपॅथीक मेडिकल कॉलेज सुलतानपूर करण्यात आले असून सदर भव्य मोफत सामयुदायिक आरोग्य शिचिराचे आयोजन प्राचार्य डॉ. मिनल राऊत मॅडमच्या मार्गदर्शनात स्थानिक डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज, रुग्णालय व अनुसंधान संस्था, सुलतानपूर यांच्यावतीने सुरु असून सदर शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळत असून सकाळी 8:00 वाजता सुरु झालेल्या शिचिरांमध्ये रुग्णांची आरोग्य तपासणी सुरु असून रुग्णांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे तसेच रुग्णांची आवश्यक सर्व प्रकारच्या रक्तचाचण्या करण्यात आल्या. या शिचिरासाठी समन्वयक डॉ. अकिच खान, डॉ. संतोष आडे, डॉ. नंदिनी पिसे, डॉ. ममता गणगने, डॉ. काजल वाघेला, डॉ. अश्विनी त्रिकाळ, डॉ. सचिन केदार, डॉ. माधुरी शिंदे व सर्व विद्यार्थीनी यशस्वी करण्यासाठी मोलाचा सहभाग नोंदविला या आरोग्य शिबिराचा गरीच गरजू रुग्णांना लाभ झाला असून उपचार झाल्यानंतर रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य भाव होते.

Friday, 4 October 2024

11 ऑक्टोंबर रोजी बौद्ध समाज संवाद यात्रा

 11 ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या बौद्ध समाज संवाद यात्रा निमित्त. हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा, वंचित बहुजन आघाडी मेहकर- लोणार विधानसभा नेते, नागवंशी संघपाल पनाड



लोणार - प्रणव वराडे - 11 ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या बौद्ध समाज संवाद यात्रा निमित्त. हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा, वंचित बहुजन आघाडी मेहकर- लोणार विधानसभा नेते, नागवंशी संघपाल पनाड...
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने रेखाताई ठाकूर, अशोक सोनोने, धैर्यवर्धन पुंडकर, सविताताई मुंडे, निलेश जाधव, प्रशांत वाघोदे, विष्णू उबाळे, डॉ. प्रा केबी इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली लोणार व मेहकर येथे वडगाव, सुलतानपूर, चिंचोली सांगळे ,लोणार शहर येथे कॉर्नर बैठका घेण्यात आल्या. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून. जिल्हा नेते आद. प्रशांत वाघोदे यांनी आंबेडकरी चळवळी संदर्भात मार्गदर्शन करून समाजाने व्यसनापासून दूर राहून कुटुंबासह समाजाला उंच स्थानावर न्यावे व बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर समाज जागृतिचे, समाज रक्षणाचे,काम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर करत आहेत. त्यामुळे समाजाने कुठल्याही भुलथापांना बळी न पडता बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करावे. येणाऱ्या 11 तारखेला बौद्ध समाज संवाद यात्रेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले. यावेळी प्रस्ताविक डॉ. प्रा. केबी इंगळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन दिपक अंभोरे यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या उषाताई नरवाडे, शाकीरभाई पठाण, महेंद्र मोरे, प्रशिष इंगळे, जेष्ठ नेते सुभाष मोरे,ॲड, बबन वानखेडे,दिपक पाडमूख, प्रदीप सरदार,राहुल सरदार,अनिल प्रधान अचित पाटोळ, मोरे साहेब मिलिट्री मॅन, दिनकर कांबळे, बबन पनाड ,विलास खरात, वसीम भाई यांनी परिश्रम घेतले यावेळी शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते..


Wednesday, 17 April 2024

लोणार शहरातील पटेल नगर वासियांचे स्वप्न भंगले


लोणार शहरातील पटेल नगर वासियांचे स्वप्न भंगले


लोणार - प्रणव वराडे

लोणार शहरातील पटेल नगर भागात रस्त्याची समस्या आहे पटेल नगर वासियांना आता देखील रस्त्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे पटेल नगर भागातील रहिवाश्यांनी वारंवार लोकप्रतिनिधी कडे रस्त्याची माघनी केली असता त्याना फक्त आश्वासन देण्याचे काम प्रशाषण करत आहे आता माघील ६ महिन्या पासून नालीचे काम करण्यात आले आहे नाल्या झाल्यावर लगेच रस्त्याचे काम सुरु करण्यात येणार असे आश्वासन देखील प्रशासनाने पटेल नगर मधील रहिवास्याना दिले आहे पटेल नगर मध्ये रस्ते कधी होणार असा प्रश्न पटेल नगर रहिवास्याना पडला आहे पटेल नगर मधील रस्त्याच्या कामा कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे का असा प्रश्न पटेल नगर वासी याना पडला आहे त्याच प्रमाने गेल्या ६ महिन्या पासून नगर पालिका याच्या मार्फत होत असलेल्या नाली सफाई चे काम देखील पटेल नगर मध्ये ६ महिन्यात झाले नाही लवकरात लवकर पटेल नगर मधील रस्त्याचे काम व नाली सफाई चे काम मार्गी लावावे अन्यथा पटेल नगर वासी नगर पालिका लोणार येथे धडक मोर्चा घेऊन येणार असल्याची चित्र पस्थ दिसून येत आहे वारंवार रस्त्याची माघनी करून सुद्धा प्रशासन पटेल नगर कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे

Thursday, 28 December 2023

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र लोणार यांच्यावतीने दत्तजयंती निम्मित अखंड नामजप सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळ संपन्न

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र लोणार  यांच्यावतीने दत्तजयंती निम्मित अखंड नामजप सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळ संपन्न

 

लोणार (प्रतिनिधी)

श्री स्वामी समर्थ महाराज व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ त्र्यंबकेश्वर चे पिठाधीश परमपुज्य श्री गुरूमाऊली यांच्या कृपा आशीर्वादाने व आदरणीय युवासंत चंद्रकांत दादासाहेब यांच्या परवानगीने श्री दत्त जयंती अखंड जप नाम यज्ञ सप्ताह श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र समर्थ नगर लोणार येथे दि.20/12/2023ते 27/12/2023 पर्यंत आयोजित करण्यात आला होता .या सप्ताह मध्ये सामुदायिक गुरूचरित्र पारायण,प्रहर सेवा, गणेश याग, चंडी यांग, रुद्र याग, मल्हारी सप्तशती पठण, दुर्गा सप्तशती पठण, यांसारख्या विविध ग्रंथ पठण सेवा अखंड पन्हे सुरू होत्या. प्रहर सेवेमध्ये दोन सेवेकरी स्वामी चरित्र सारामृत पठण, दोन सेवेकरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप, दोन सेवेकरी विना वादन करून श्री स्वामी समर्थ मंत्र जप सेवा अखंड पणे करत होते .आज या सप्ताहाची समाप्ती  झाली आहे. लोणार शहरातील  सामुदायिक श्री गुरुचरीत्र पारायणास सुरूवात झाली तेव्हा  पासून 141 पारायण करणारे  सेवेकरी यांनी सहभाग घेतला आहे.प्रहर सेवा देखील सुरू होत्या .या मध्ये सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत महिला सेवेकऱ्यांनी  सेवा दिली तर रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत पुरुष  सेवेकऱ्यांनी सेवा दिली.  या नंतर ही जास्तीत जास्त लोकांनी या सेवेमध्ये सहभाग घेऊन अतिउच्च कोटींची सेवा श्री स्वामी समर्थ महाराज व परमपुज्य श्री गुरूमाऊली यांच्या चरणी रुजू केली . आपली कोणतीही समस्या सोडविण्याचे सामर्थ्य या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्गात असून आपल्या समस्येवरील अध्यात्मिक मार्गदर्शन साठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र समर्थ नगर लोणार  येथे डॉ सुशील अग्रवाल यांच्या शी संपर्क साधावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र लोणार यांच्या मार्फत करण्यात आले आहे. खूप  कालावधी पासून लोणार परिसरात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सुरू  असून  हजारो सेवेकरी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाला जोडले गेले आहेत. समस्या अनुरूप मार्गदर्शन घेऊन समस्या सूटल्याचे अनुभव हजारो सेवेकरी घेत आहेत.  आज या सप्ताह चा शेवटचा दिवस होता आज सकाळी पासून केंद्र मध्ये गर्दी पहावयास मिळाली 10 ,30 च्या मंगल आरती नंतर महाप्रसाद चे वाटप करण्यात आले त्या मध्ये हजारो भक्तांनी लाभ घेतला. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र लोणार येथे दर गुरुवारी व रविवारी संध्याकाळ च्या आरती नंतर प्रश्न उत्तरी घेण्यात येते ,याचा लाभ सुद्धा जास्तीत जास्त भक्तांनी घ्यावा असे अवाहन लोणार केंद्र कडून करण्यात आले आहे

Tuesday, 18 July 2023

एच डी एफ सी बँकेकडून वारकऱ्यांना प्रसाद व पाणी वाटप


 एच डी एफ सी बँकेकडून वारकऱ्यांना प्रसाद व पाणी वाटप

लोणार - प्रणव वराडे प्रतिनिधी

लोणार नगरीत काल दिनांक १८ जुलै रोजी भक्तिमय वातावरनात श्री संत गजानन महाराज पालखी चे आगमन झाले या वेळी श्री संत गजानन महाराज पालखी ही धार रोड , जामा मज्जिद चौक , विनायक चौक , हिरडव चौक ते विसावा ठिकाना पर्यंत जागो जागी श्री संत गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांना जागो जागी महाप्रसाद , पाणी वाटप, करण्यात आले लोणार मधील एच डी एफ सी बँकेतील कर्मचारी प्रेम मापारी यांच्या संकलपनेतून बँके तर्फे वारकऱ्यांना फराळी चिवडा व पाणी वाटपाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी बँकेचे ब्रांच मॅनेजर नागेश सोनवणे,अमोल नागरे,प्रशांत सोनवणे,प्रेम मापारी,वैष्णवी मॅडम असे अनेक बँकेतील कर्मचारी उपस्थित होते


Sunday, 14 May 2023

जिल्हास्तरीय खरिप - पीक स्पर्धेत शेतकरी शिवानंद मुंढे सन्मानित



जिल्हास्तरीय खरिप - पीक स्पर्धेत शेतकरी शिवानंद मुंढे सन्मानित

लोणार - प्रणव वराडे

सन २०२१-२२ यावर्षात जिल्हास्तरीय खरीप पीक स्पर्धेत सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी शिवानंद संतोष मुंढे यांना जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सन २०२१-२२ या वर्षात घेण्यात आलेल्या खरीप पीक स्पर्धेत नांद्रा येथील प्रगतीशील शेतकरी शिवानंद संतोष मुंढे यांनी सोयाबीन या पिकाचे हेक्टरी ५२ क्विंटल ७० किलो विक्रमी उत्पादन घेऊन जिल्हास्तरावर दुसरा क्रमांक पटकाविला. त्यामुळे १३ मे २०२३ रोजी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी खा. प्रतापराव जाधव, आ. संजय गायकवाड, आ. संजय रायमुलकर, आ. धीरज लिंगाडे, आ. राजेश एकडे, आ. श्वेता महाले, कृषीसचिव एकनाथ डवले, प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांची उपस्थिती होती. टोकन पध्दतीने सोयाबीनची लागवड करुन त्यांनी हे उत्पादन घेतले असल्याचे शेतकरी मुंढे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

 

Wednesday, 31 August 2022

व्हाईस ऑफ मीडियाच्या लोणार तालुकाध्यक्षपदी उमेश कुटे यांची नियूक्ती


व्हाईस ऑफ मीडियाच्या लोणार  तालुकाध्यक्षपदी  उमेश कुटे यांची नियूक्ती 

लोणार - ( प्रणव वराडे )

लोणार-तमाम पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून देशातील १७ राज्यांमध्ये कार्यरत असलेली संघटना म्हणून 'व्हाईस ऑफ मीडिया' या संघटनेची ओळख आहे.संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शणाखाली विदर्भ अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी बुलढाणा जिल्हा कार्यकारिनीला दिलेल्या निर्देशानूसार जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे,कार्यध्यक्ष अरुण जैन,सिद्धेश्वर पवार यांनी बुलढाणा जिल्हातील तालूक्याचे तालूका अध्यक्ष जाहीर केले .त्यामध्ये व्हाईस आँफ  मीडीयाचे  लोणार तालूका अध्यक्ष म्हणून दैनिक देशोन्नतीचे विशेष प्रतिनिधी उमेश कुटे यांची नियूक्ती पञ देऊन नियूक्ती केली आहे.सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. महाराष्ट्रातही पत्रकार आणि पत्रकारीतेच्या सर्वांगिण विकासासाठी ही संघटना अग्रेसर असून या संघटनेच्या जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांची निवड नुकतीच जाहीर झाली आहे 'व्हाईस ऑफ मीडिया' ही ५० ज्येष्ठ संपादकांनी एकत्र येऊन पत्रकारीता आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी निर्माण केलेली संघटना आहे. देशातील १७ राज्यांमध्ये ही संघटना कार्यरत आहे.व्हाईस आँफ मीडीया या पञकार संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष ,विदर्भ अध्यक्ष अनिल म्हस्के व जिल्हा कार्यकारिनीने माझ्यावर विश्वास दाखवून माझी तालूका अध्यक्षपदी नियूक्ती केली भविष्यात पञकारांना विश्वासात घेऊन त्यांच्या न्यायहक्कासाठी लढा देऊ. व नवीन तालूका कार्यकारणी लवकरच घोषीत करु.

 

डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ

  डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ लोणार - प्रणव वराडे उपमुख्यमंत्री कार्यालय ...